AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोवा मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर, प्रमोद सावंत यांच्याकडे गृह आणि वित्त खातं, राणेंना काय मिळालं?

प्रमोद सावंत यांनी आज गोव्यातील मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर केलं आहे. खातेवाटप जाहीर ( Allocation of portfolios) करताना प्रमोद सावंत यांनी मोठी चाल खेळली आहे.

गोवा मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर, प्रमोद सावंत यांच्याकडे गृह आणि वित्त खातं, राणेंना काय मिळालं?
प्रमोद सावंतImage Credit source: Tv9
| Updated on: Apr 03, 2022 | 5:05 PM
Share

पणजी : गोव्यात प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी 28 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यावेळी भाजप (BJP) आमदारांना देखील मंत्रिपदाची शपथ देण्यात आली होती. प्रमोद सावंत यांनी आज गोव्यातील मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर केलं आहे. खातेवाटप जाहीर ( Allocation of portfolios) करताना प्रमोद सावंत यांनी मोठी चाल खेळली आहे. प्रमोद सावंत यांनी स्वत:कडे गृह आणि वित्त खातं ठेवलं आहे. मुख्यमंत्री पदी कोण असणार याची निश्चिती होण्यापूर्वी नाराज असलेल्या विश्वजित राणे यांच्याकडे आरोग्य खात्यासह नगरविकास खातं देण्यात आलं आहे. तर, मनोहर पर्रिकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर यांचा पराभव करणाऱ्या बाबूश मोन्सेरात यांच्याकडे महसूल खातं देण्यात आलं आहे.

गोव्यातील खातेवाटप

  1. डॉ प्रमोद सावंत: मुख्यमंत्री : गृह, वित्त, दक्षता, कार्मीक, राजभाषा
  2. विश्वजीत राणे : आरोग्य, नगरविकास व नगरनियोजन, महिला व बाल कल्याण आणि वने
  3. माविन गुदिन्हो : उद्योग व कौशल्य विकास, पंचायत, वाहतूक, राज शिष्टचार व संसदीय व्यवहार
  4. रवी नाईक : कृषी, हस्तकला व गॅझेटर, नागरी पुरवठा व ग्राहक व्यवहार
  5. नीलेश काब्राल : संसदीय कार्य, पर्यावरण, विधी व न्याय, सार्वजनिक बांधकाम
  6. सुभाष शिरोडकर : जलस्रोत, प्रोव्हेदोरीया, सहकार
  7. रोहन खंवटे : पर्यटन, माहिती व तंत्रज्ञान, प्रिंटिंग स्टेशनरी
  8. गोविंद गावडे : क्रीडा, कला संस्कृती, आरडीए
  9. बाबुश मोंसेरात : महसूल, कामगार, कचरा व्यवस्थापन

ट्विट

प्रमोद सावंत गोव्याचे 14 वे मुख्यमंत्री

भाजपनं नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत 20 जागांवर विजय मिळवला होता. त्यानंतर गोव्यातील स्थानिक पक्षांच्या मदतीनं गोव्यात भाजपनं सरकार स्थापन केलं आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वानं प्रमोद सावंत यांच्या कामावर विश्वास ठेवत पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदावर संधी दिली आहे. प्रमोद सावंत हे गोव्याचे 14 वे मुख्यमंत्री ठरले आहेत. राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांनी त्यांना 28 मार्चला मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली होती.

विश्वजीत राणे यांच्याकडे नगरविकास आणि आरोग्य खाते

मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या विश्वजीत राणे यांना आरोग्य, नगरविकास व नगरनियोजन, महिला व बाल कल्याण आणि वने ही खाती देण्यात आली आहेत. तर, उत्पल पर्रिकर यांचा पराभव करणाऱ्या बाबुश मोंसेरात यांना महसूल, कामगार, कचरा व्यवस्थापन ही खाती देण्यात आली आहेत.

इतर बातम्या:

मनसे मेळाव्यात प्राजक्ता माळीची हजेरी; म्हणाली ‘जसं फिल्मफेअर जाणं गरजेचं तसंच..’

आता 28 नव्हे 31 दिवसांचा रिचार्जही मिळणार, Vodafone Idea चे कॅलेंडर मंथ व्हॅलिडिटी प्लॅन लाँच

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.