Greta Thunberg | दिल्ली पोलिसांकडून ग्रेटा थनबर्ग विरोधात FIR, भारताविरोधात प्रचार केल्याचा आरोप

सागर जोशी

|

Updated on: Feb 04, 2021 | 4:44 PM

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भारताविरोधात प्रचार केल्याच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी ग्रेटा थनबर्गविरोधात FIR दाखल केली आहे.

Greta Thunberg | दिल्ली पोलिसांकडून ग्रेटा थनबर्ग विरोधात FIR, भारताविरोधात प्रचार केल्याचा आरोप
Follow us

नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर गेल्या 71 दिवसांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सध्या ट्विटरयुद्ध सुरु आहे. पण शेतकरी आंदोलनाबाबत ग्लोबल सेलिब्रिटिजचे ट्वीट म्हणजे भारताविरोधातील एक विचारपूर्वक रचण्यात आलेला कट असल्याचं दिसून आलं आहे. त्याचे काही पुरावेही मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर भारताविरोधात प्रचार केल्याच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी ग्रेटा थनबर्गविरोधात FIR दाखल केली आहे. ग्रेटा थनबर्ग ही पर्यावरणाशी संबंधित मुद्दे उचलून धरण्यासाठी प्रसिद्ध आहे. पण सध्या भारतात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलना आडून भारताविरोधात प्रचार करण्यासाठी ओळखली जात आहे.(FIR filed in Delhi against Greta Thunberg)

ग्रेटाने नुकतंच केलेल्या एका ट्वीटमुळे ही बाब लक्षात आली आहे की, भारताविरोधात प्रचार करण्यासाठी विचारपूर्वक एक कट रचण्यात आला आहे. त्याचे काही पुरावेही मिळाले आहेत. भारताविरोधात कॅम्पेनिंग राबवण्याबाबतचा एक पूर्ण अॅक्शन प्लॅन तयार करण्यात आल्याचं दिसून आलं आहे. त्यात पोएटिक जस्टिस फाऊंडेशनचंही नाव समोर आलं आहे. ही फाऊंडेशन म्हणजे कॅनडामधील एक NGO आहे.

ग्रेटाने ट्वीट केला अॅक्शन प्लॅन

भारताविरोधात प्रचार करण्यासाठी जो अॅक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे त्याचं एक गूगल डॉक्यूमेंट समोर आला आहे. त्याचबरोबर याचीही माहिती मिळाली आहे की, ट्विटर स्ट्रोम क्रिएट करण्यासाठीच रिहानाचं एक ट्वीट आलं होतं. दरम्यान, ग्रेटाने दोन अॅक्शन प्लॅन तयार केले आहेत. एका प्लॅनमध्ये 26 जानेवारीपर्यंतच्या कॅम्पेनिंगची माहिती देण्यात आली होती. ग्रेटाने हे ट्वीट 3 फेब्रुवारीला केलं होतं. आणि नंतर ते डिलीट केलं. 4 फेब्रुवारीला ग्रेटाने पुन्हा एक ट्वीट केलं, त्यात नव्याने तयार करण्यात आलेला प्लॅन होता.

1984 च्या दंगलीची भीती दाखवली

सोशल मीडियावर या प्लॅनिंगचा पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनही व्हायरल झालं आहे. या PPTमध्ये पोएटिक जस्टिस फाऊंडेशनचा लोगो लावण्यात आला आहे. या फाऊंडेशनच्या वेबसाईटवर शेतकऱ्यांशी संबंधित प्रोपोगँडा मटेरियलही उपलब्ध आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या सोशल मीडिया साईटवर देशविरोधी, प्रो-खलिस्तान साहित्यही उपलब्ध आहे.

प्रोएटिक जस्टिस फाऊंडेशन कशाप्रकारे लोकांना भडकावण्याचं काम करत होते त्याची काही उदारहरणंही आहेत. त्यात लिहिलं आहे की, सरकार शेतकऱ्यांची हत्या करत आहे. 1984 मध्ये झालेल्या दंगलीची भीती दाखवण्यात आली की, सरकार शेतकऱ्यांचं दमन करण्यासाठी असं काही करु शकते.

संबंधित बातम्या :

Farmer Protest : शेतकऱ्यांच्याविरोधात खिळ्यांची स्ट्रॅटेजी सरकारवर बुमरँग? कायमचे उखाडणार की नव्या ठिकाणी ठोकणार?

कंगनाला ट्विटरचा झटका, आक्षेपार्ह ट्विट हटवले; अकाउंट बॅन होणार?

सचिनपासून कोहलीपर्यंत शेतकरी आंदोलनावर क्रिकेटपटूंचे ट्विटस् कसे? काँग्रेस नेता म्हणतो, ‘हे तर बीसीसीआयचे काम!’

सकाळी पॉपस्टार, आता पॉर्नस्टार, मिया खलिफा शेतकऱ्यांसाठी मैदानात, कोण आहे मिया?

FIR filed in Delhi against Greta Thunberg

Non Stop LIVE Update

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI