कंगनाला ट्विटरचा झटका, आक्षेपार्ह ट्विट हटवले; अकाउंट बॅन होणार?

क्रिकेटपटूंविरोधात आपत्तीजनक ट्विट केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना रणौतवर ट्विटरने कारवाई केली आहे. (Kangana Ranaut's Tweets Deleted Again, Twitter Says Rules Violated)

कंगनाला ट्विटरचा झटका, आक्षेपार्ह ट्विट हटवले; अकाउंट बॅन होणार?
Follow us
| Updated on: Feb 04, 2021 | 2:45 PM

नवी दिल्ली: क्रिकेटपटूंविरोधात आपत्तीजनक ट्विट केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना रणौतवर ट्विटरने कारवाई केली आहे. ट्विटरने तिच्या दोन पोस्ट डिलीट केल्या असून सामाजिक तेढ निर्माण होईल, असं ट्विट न करण्याची तंबीही ट्विटरने कंगनाला दिली आहे. त्यामुळे कंगनाचं अकाउंट पुन्हा बॅन केलं जाण्याची जोरदार चर्चा रंगली आहे. (Kangana Ranaut’s Tweets Deleted Again, Twitter Says Rules Violated)

देशात शेतकरी आंदोलन सुरू आहे. त्यावर ट्विटरवरून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. क्रिकेटपटू रोहित शर्मानेही ट्विट करून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. त्यावर कंगनाने आक्षेपार्ह ट्विट केलं होतं. त्यामुळे ट्विटरन कंगनाच्या या ट्विटची दखल घेऊन त्यावर कारवाई केली आहे. ट्विटरने कंगनाच्या दोन्ही पोस्ट डिलीट केल्या आहेत. कंगनाने नियमांचा भंग केल्याचं कारण देत ही कारवाई करण्यात आली आहे. कंगनाने ज्या पद्धतीने भाषेचा वापर केला आहे. ती या प्लॅटफॉर्मसाठी योग्य नाही. आमच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या ट्विट्सवरच आम्ही कारवाई केली आहे, असं ट्विटरने म्हटलं आहे.

काय होते कंगनाचे ट्विट

या ट्विटमधून कंगनाने रोहितवर थेट निशाणा साधला होता. रोहित खूप घाबरला आहे. ते आपलं म्हणणं मांडत आहेत. केंद्र सरकारचं क्रांतीकारक पाऊल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतकरी कायद्याविरोधात शेतकरी का असतील? गोंधळ घालणारे लोक दहशतवादी आहेत. त्यांना भीती वाटत आहे. रोहितनेही ते जाणून घ्यावं, असं कंगनाने म्हटलं होतं.

tweet

रोहित काय म्हणाला होता?

भारत हा एकसंध असून आपण सर्वजण मिळून समस्येवर मार्ग काढणं ही काळाची गरज आहे. आपल्या शेतकऱ्यांचा देशाच्या विकासात महत्वाचा वाटा आहे. देशाच्या भल्यासाठी सर्वजण एकत्रित येऊन त्यांची जबाबदारी पार पाडतील, असं ट्विट रोहित शर्मा यानं केलं होते.

धोबी का…

एका ट्विटमध्ये तर कंगना रणौतनं “हे सर्व क्रिकेट खेळाडू धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का अशा स्वरुपात का बोलत आहेत” असा सवाल उपस्थित केला. याचवेळी तिन पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाबद्दल वादग्रस्त वक्तव्यं केल.”ते दहशतवादी आहेत त्यांच्यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. त्यांची भीती वाटते हे सांगून टाका, असं आव्हान कंगनानं क्रिकेटर्सना दिलं आहे. (Kangana Ranaut’s Tweets Deleted Again, Twitter Says Rules Violated)

संबंधित बातम्या:

कंगना रोहित शर्माच्या ट्विटवर म्हणाली, हे सर्व क्रिकेटर्स म्हणजे धोबी का कुत्ता, घर का ना घाट का!

जगप्रसिद्ध पॉपस्टारच्या ट्विटला उत्तर देताना कंगना म्हणते, आंदोलन करणारे शेतकरी नाहीत तर दहशतवादी !

Farmer Protest: भारतासाठी काय चांगलं हे आम्हाला कळतं, बाहेरच्यांनी नाक खुपसू नये: सचिन तेंडुलकर

(Kangana Ranaut’s Tweets Deleted Again, Twitter Says Rules Violated)

Non Stop LIVE Update
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.