मुंबईः भारतातील NSE या शेअर बाजाराचे (Stock market) दिवसाचे व्यवहार हे 49 कोटींचे असतानाही त्याचा कारभार एका अज्ञात व्यक्तीच्या इशाऱ्यावर चालतो असे शेअर बाजाराच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण (Chitra Ramakrishna) यांनी सांगितल्या नंतर अनेक जणांचे दाबे दणाणले आहेत. शेअर बाजाराच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांनी आपण अज्ञात व्यक्तील शेअर बाजाराची गोपनीय माहिती (Confidential information) दिल्याचे त्यानीच सांगितले. त्यांनी असे जाहीर केल्यानंतर अनेक तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहेत.