Hassan Constituency Karnataka Election Final Result 2024 : देशातील पहिला निकाल सेक्स स्कँन्डलमधील उमेदवारा विरोधात, नारीशक्तीने दाखवला इंगा
Hassan Constituency Karnataka Lok Sabha Final Election Result 2024 : देशातील लोकसभा निवडणकीचा पहिला निकाल जाहीर झाला आहे. कर्नाटकमधीन हासन लोकसभा मतदार संघातील जेडीएसचे उमेदवार प्रज्वल रेवण्णाचा पराभव झालाय.

देशातील पहिला लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या कथित सेक्स स्कँडलमधील आरोपी असलेल्या जेडीएसचा उमेदवार प्रज्वल रेवण्णा यांचा पराभव झाला आहे. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवण्णा यांचा काँग्रेसच्या श्रेयस पटेल यांनी पराभव केला आहे. हासन लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने 25 वर्षांनंतर विजय मिळवला आहे. हासन मतदार संघामध्ये एकहाती वर्चस्व असलेल्या जेडीएससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
कर्नाटक राज्यामधील जनता दल सेक्युलर पक्षाचे (JDS) हसन लोकसभा मतदरासंघाचे खासदार प्रज्वल रेवण्णा 2976 व्हिडीओ व्हायरल झाले होते. 2019 साली ते उभे राहिले होते. भाजपच्या मंजू ए यांचा पराभव करत विजय मिळवला होता. प्रज्वल रेवण्णा यांचा राजकीय वारसाही मोठा आहे. प्रज्वल रेवण्णा भारताचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा नातू आहे. कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचा पुतण्या आहे.
देशातील दुसऱ्या टप्प्यातील मतदान 26 एप्रिल 2024 रोजी होणार होतं. यामध्ये कर्नाटक राज्यामधील 24 जागांवर मतदान होणार होतं. कर्नाटकमधील हसन मतदारसंघाचाही समावेश होता. मात्र प्रज्वल रेवण्णा उभे राहिलेल्या मतदारसंघात चार दिवसआधी म्हणजेच 24 एप्रिल 2024 या दिवशी काही लोकांनी पेन ड्राईव्ह फेकले होते. या पेन ड्राईव्हमध्ये रेवण्णांचे व्हिडीओ होते, निवडणुकीच्या तोंडावर व्हिडीओ पसरवत रेवण्णांचा गेम केला गेला.
दरम्यान, काँग्रेस पक्षाल हासन मतदारसंघात 25 वर्षांनंतर यश मिळालं आहे. काँग्रेसचे उमेदवार श्रेयस पटेल यांना मतदान करत महिलांनी आरोपी असलेल्या रेवण्णाचा पराभव केलाय. नारी शक्तीने आरोपी रेवण्णाला आता घरी बसवलं आहे.
