ब्रिटिशांची भारतातील 200 वर्ष जुनी स्मशानभूमी… आजही येतो रहस्यमयी आवाज, जाताच फुटतो दरदरून घाम; काय आहे भानगड?
बरेलीत एक असे ठिकाण आहे, जे ब्रिटिशांशी जोडलेले आहे. येथे एक 200 वर्ष जुनी स्मशानभूमी आहे जी ब्रिटिशांसाठी बांधली गेली होती. या स्मशानभूमीच्या जवळ लोकांनी विचित्र अनुभव आलेले आहेत.

भारतात अशी अनेक रहस्यमयी ठिकाणे आहेत जिथे गेल्यावर एक वेगळाच अनुभव येतो. उत्तर प्रदेशातील बरेली हे भारतातील एक जुने शहर आहे. त्यामुळे या शहराला मोठा इतिहास आहे. बरेलीत सध्या एक असे ठिकाण आहे, जे ब्रिटिशांशी जोडलेले आहे. येथे एक 200 वर्ष जुनी स्मशानभूमी आहे जी ब्रिटिशांसाठी बांधली गेली होती. या स्मशानभूमीच्या जवळ लोकांनी विचित्र अनुभव आलेले आहेत. त्यामुळे इंग्रज भारत सोडून गेल्यानंतरही सामान्य लोक या ठिकाणी जाण्याचे धाडस करत नाहीत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
ब्रिटिशांची स्मशानभूमी
बरेली शहराच्या नाथनगरी कॅन्ट परिसरात एक ब्रिटिशांची स्मशानभूमी आहे. या ठिकाणाला लोक गोऱ्या लोकांची स्मशानभूमी असेही म्हणतात. या ठिकाणी अनेक ब्रिटिश सैनिक आणि अधिकाऱ्यांच्या कबरी आहेत. मात्र यातील काही कबरी गायब झाल्या आहेत. ही स्मशानभूमी 1889 साली बांधण्यात आली होती. त्यानंतर या स्मशानभूमीत शेकडो लोकांचे मृतदेह दफन करण्यात आले आहेत.
अनेक अधिकाऱ्यांच्या कबरी
बरेलीतील ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहासकार डॉ. राजेश शर्मा यांनी या स्मशानभुमीबाबत सांगितले की, ‘ब्रिटिश लोक भारतावर राज्य करायला आले होते, त्यावेळी भारताची परिस्थिती ब्रिटिशांसाठी अनुकूल नव्हती. या भागात नाकटियाची लढाई झाली होती. यात अनेक ब्रिटिश सैनिक आणि अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता. या सैनिकांना दफन करण्यासाठी ब्रिटिश सरकारने एक मोठी जागा विकत घेतली, त्यानंतर तिथे या अधिकारी आणि सैनिकांच्या कबरी बांधण्यात आल्या. आजही या कबरी इथे आहेत. त्यामुळे याला ब्रिटिशांची स्मशानभूमी म्हणतात.
विचित्र आवाज ऐकू येतात
डॉ. राजेश शर्मा यांनी पुढे बोलताना सांगितले की, ‘या स्मशानभुमीबाबत बऱ्याच कथा प्रचलित आहेत. येथे रात्रीच्या वेळी कबरींमधून आवाज ऐकू येतो असं अनेकजण सांगतात. बरेली आणि आसपासच्या लढायांमध्ये मृत्यू पावलेल्या ब्रिटिशांच्या अनेक कबरी येथे आहे. त्यामुळे हे ठिकाण खूपच भयानक वाटते. येथे रात्रीच्या वेळी विचित्र आवाज ऐकू येतात, असं अनेकांनी म्हटलं आहे. मात्र हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र तरीही लोक या ठिकाणी जाण्यास घाबरतात.
