लहान मुलांना हेल्मेटसक्ती ते वाहनाची वेग मर्यादा; नवीन नियम पाळा, दंडाचा भुर्दंड टाळा

सर्वसाधारणपणे कोणत्याही सुरक्षेविना दुचाकीवरुन लहान बालके प्रवास करत असतात. सोशल मीडियावर एकाच दुचाकीवर 5-10 लहान मुलं स्वार असल्याचेही फोटो व्हायरल झाले होते.

लहान मुलांना हेल्मेटसक्ती ते वाहनाची वेग मर्यादा; नवीन नियम पाळा, दंडाचा भुर्दंड टाळा
प्रातिनिधिक छायाचित्र.
Follow us
| Updated on: Feb 16, 2022 | 10:44 PM

नवी दिल्ली : वाहतूक मंत्रालयाने दुचाकीवरील बालकांसाठी हेल्मेट अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. चार वर्षांहून कमी वयाच्या दुचाकीवरील बालकाला क्रॅश हेल्मेट (Crash Helmet for kids) घालणं आवश्यक ठरणार आहे. हेल्मेट सक्तीसोबत रस्ते सुरक्षेबाबतचे (Road Safety Rules) अन्य काही नियम लागू करण्यात येतील. वाहतूक मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार नवीन नियमांची 15 फेब्रुवारी 2023 पासून अंमलबजावणी (MORTH New Rules) करण्यात येईल. सर्वसाधारणपणे कोणत्याही सुरक्षेविना दुचाकीवरुन लहान बालके प्रवास करत असतात. सोशल मीडियावर एकाच दुचाकीवर 5-10 लहान मुलं स्वार असल्याचेही फोटो व्हायरल झाले होते. बालकांच्या सुरक्षेकडे कानाडोळा करणाऱ्यांना चाप बसविण्यासाठी वाहतूक मंत्रालय नवीन नियम आणले आहेत. जाणून घेऊया वाहतूक मंत्रालयाच्या नवीन नियमांविषयी

क्रॅश हेल्मेट अनिवार्य :

चार वर्षाहून लहान वयाच्या बालकांना दुचाकीवर असताना क्रॅश हेल्मेट आवश्यक ठरणार आहे. संपूर्ण डोक्याला कव्हर करणाऱ्या हेल्मेटला क्रॅश हेल्मेट म्हणून ओळखले जाते. अन्य हेल्मेटप्रमाणं टोपीच्या आकाराचे अर्धाकृती नसते. नव्या नियमामुळे जगात लहान बालकांना दुचाकीवर हेल्मेट सक्ती लागू करणाऱ्या देशांत भारताचा समावेश होणार आहे.

सेफ्टी हार्नेस हवंच :

लहान मुलं दुचाकीस्वाराच्या मागे बसलेले असल्यास सुरक्षेच्या उपायांची कठोर अंमलबजावणी आवश्यकचं ठरते. नवीन सुरक्षा नियमानुसार, सेफ्टी हार्नेस असणं अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरुन वेगवान दुचाकीवरु मुलं गाडीवरुन पडण्याची भीती असणार नाही. सेफ्टी हार्नेस मुळे लहान मुल दुचाकीस्वाराला बांधलेलं असतं आणि 30 किलो पर्यंतचे वजन उचलू शकते. त्यामुळे तुम्ही लहान मुलाला गाडीवरुन बाहेर घेऊन निघाले असल्यास गाडीला सेफ्टी हार्नेस असल्याची निश्चितपणे खात्री करा.

वेगावर मर्यादा :

नवीन नियमामुळे लहान मुलं गाडीवर असताना दुचाकीस्वाराला वेगानं गाडी चालवता येणार नाही. नवीन नियमानुसार, गाडीवर चार वर्षापेक्षा कमी वयाचं मुलं असल्यास वेग 40 किलोमीटर प्रति तासाहून अधिक असू शकणार नाही. मर्यादेच्या बाहेर दुचाकीची गती असल्यास हेल्मेट असूनही मुलगा गंभीर जखमी होऊ शकतो. तसेच वेगवान गाडीवर सेफ्टी हार्नेस असतानाही दुखापत होण्याचा धोका टाळता येणार नाही.

इतर बातम्या :

Weight Loss आणि प्रोटीनची कमी भरुन काढण्यासाठी या हिरव्या भाज्या आहारात असायलाच हव्या

मुलांना रागावणे, धमकावणे म्हणजे शिस्त नव्हे, पालकांनो ‘या’सवयी बदला

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.