AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आभाळ फाटणार, नाशिकमध्ये ढगफुटीचे संकट, 3 वाजल्यापासून हायटाईड, मुख्यमंत्र्यांचा थेट गंभीर इशारा..

राज्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. थेट तीन दिवसांपासून पाऊस सुरू असून काही थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामध्येच अत्यंत मोठा इशारा देण्यात आला. राज्यासाठी पुढील काही तास अत्यंत धोक्याची असणार आहे. याबाबत मुख्यंंत्र्यांनी इशारा दिला.

आभाळ फाटणार, नाशिकमध्ये ढगफुटीचे संकट, 3 वाजल्यापासून हायटाईड, मुख्यमंत्र्यांचा थेट गंभीर इशारा..
Devendra Fadnavis
| Updated on: Jul 06, 2026 | 2:05 PM
Share

राज्यात अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने पुढील काही तासासाठी रेड अलर्ट जारी केला. मुंबईमधील अनेक भागात पाणी साचले आहे. यासोबतच रेल्वे वाहतुकीवर या पावसाचा मोठा परिणाम झाला. पावसाने राज्यात हाहाकार माजवला आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खोळंबा झाला. मोठ्या दरड कोसळल्या आहेत. अनेक ठिकाणी रेल्वे रूळावर दरड कोसळल्या आहेत. काही रेल्वेंच्या मार्गात बदल करण्यात आला. राज्यात पावसाचा हाहाकार सुरू आहे. पुढील काही तासात पाऊस अधिक जोरदार असण्याचा अंदाज आहे. राज्यातील सरकारी यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. आज शाळा, सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली. खासगी कार्यालयांना वर्कफ्रॉम होमचे आदेश देण्यात आले. कुठे घर कोसळत आहेत तर कुठे दरड कोसळत आहेत. स्थिती गंभीर होताना दिसतंय.

त्यामध्येच आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडून आपत्तीव्यवस्थान कक्षाला भेट देण्यात आली. यादरम्यान त्यांनी सर्व पाहणी करत अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, अतिवृष्टी सुरू आहे. काही भागांमध्ये पुरपरिस्थिती आहे. मोठ्या प्रमाणात वारा सुरू आहे. त्यामध्ये दरड कोसळत आहे. यासंदर्भात जो आपत्तीव्यवस्थापन कक्ष आहे. याठिकाणी राज्यातील सर्व प्रमुख अधिकारी आहेत.

आम्ही चर्चा केलेली आहेत. जी काही माहिती आहे, त्यानुसार त्यांच्याकडून प्लान जाऊन घेतले. त्यांच्या काही अडचणीत असतील तर त्याही समजून घेतलेल्या आहेत. विशेष: आज 3 वाजल्यापासून मुंबईमध्ये हायटाईड आहे. भरती येणार आहे. यादरम्यान पाऊस जोरदार होईल. आजही जोरदार वारा असेल. आज कालपेक्षाही जास्त तीव्र गतिचा वारा सुटेल. याचसंदर्भात आपण सूचना जारी केल्या आहेत.

मुंबईकडे येणारी एक लेन सुरू आहे आणि पुण्याकडे येणारी एक लेन सुरू आहे. राज्यात अनेक ठिकाणी दरड कोसळल्या आहेत आणि पाणी साचले आहे. ज्यावेळी 70 च्या वेगाने वारे वाहिल, त्यावेळी वेगवेगळ्या संभावणा आहेत. महिनाभर जितका पाऊस पडतो तो पाऊस केवळ 4 दिवसात मुंबईत झालाय. राज्यात 8 तारखेपर्यंत अलर्ट आहे. काल दिवसभरात 350 झाले पडली. ढग फुटीचीही शक्यता आहे. तसे संदेस आहेत.

उद्याचा नाशिकला अलर्ट आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या भागात उद्या ढगफुटी संभावित आहे उद्या त्या भागात 300 एमएमचा पाऊस पडू शकतो. उद्या तिथे प्रशासकीय पातळीवर योग्य ती खबरदारी घेत आहोत, उपाययोजना करत आहोत. 8 तारखेपर्यंत सातत्याने हे सगळे अलर्ट्स देण्यात आलेले आहेत. पालघर, वसई विरार परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहेत. अनेक रेल्वे ठप्प आहेत लोकांना तिथून बाजूला काढून सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे.

सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. शहरात अद्याप तरी पाणी शिरले नाही खबरदारी घेत आहोत. मुंबई गोवा हायवेला कशेडी घाटात मोठी दरड कोसळली आहे तो मलबा काढण्याचे काम युधपातळीवर सुरू आहे. एकूण या हायवेवर 8 ठिकाणी भुस्कलन झालेले आहे. हायवे लवकरात लवकरात कसा सुरू करण्यात येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. हायवेवर जवळपास 100 टन मलबा घसरून खाली आला आहे तो हटवण्याचे काम सुरू आहे.

पुढे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, कोल्हापुरातही धोक्याची घंटा आहे. अनेक ठिकाणी धोक्याची पातळी नद्यांनी ओलांडली आहे. 8 तारखेपर्यंत ही सगळी परिस्थिती असणार आहे. इंद्रायणी नदीचे सगळे पूल पाण्याखाली जातायत. वारकऱ्यानी देखील काळजी घेतली पाहिजे. वारकऱ्यानी देहू आणि आळंदी परिसरात न जाता थेट पुण्याचे येण्याचे आवाहन. लोकांना आपण अलर्ट करत आहोत लोकानी काळजी घेण्याची गरज आहे.

उद्यासाठी संध्याकाळी आढावा घेऊन सुट्टीबाबत निर्णय घेऊ. खाजगी कार्यालयाच्या बाबतीत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सुट्टीचा निर्णय कार्यालयानी घेण्याची गरज आहे. हा मानवता धर्म आहे तो पाळला जाईल अशी अपेक्षा असते. मेट्रो, रेल्वे पूर्णपणे ठप्प झालेल्या नाहीत काही अडचणी येत आहेत पण सेवा देण्याचे काम सुरू आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

Follow Us
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी