AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलीच्या लग्नाचे वय आता 18 नाही तर 21, या विधानसभेत विधेयक संमत, निर्णय सर्व धर्मांसाठी

marriage age in himachal pradesh: मुलींच्या लग्नाचे वय २१ करणारे हिमाचल प्रदेश हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. हिमाचल प्रदेशात मुलगा आणि मुलगी यांचे वय २१ वर्षे किंवा त्याहून अधिक असेल तेव्हाच विवाह वैध मानला जाईल.

मुलीच्या लग्नाचे वय आता 18 नाही तर 21, या विधानसभेत विधेयक संमत, निर्णय सर्व धर्मांसाठी
| Updated on: Aug 29, 2024 | 3:19 PM
Share

काँग्रेसचे सरकार असलेल्या हिमाचल प्रदेशमध्ये मुलींच्या लग्नाची वयमर्यादा वाढवण्यात आली आहे. आता २१ वर्षे वयाच्या आधी मुलीचे लग्न करणे गुन्हा ठरणार आहे. येथील काँग्रेस सरकारने मुलींच्या लग्नासंदर्भातील ‘हिमाचल प्रदेश बाल विवाह प्रतिबंध विधेयक-2024’ संमत केले आहे. त्यामुळे सर्व धर्माच्या मुलींसाठी लग्नाचे कायदेशीर वय १८ वरून २१ वर्षे होणार आहे. विधानसभेच मंजूर झालेले विधेयक आता राज्यपालांकडे पाठवण्यात आले आहे. त्या विधेयकाला राज्यपालांनी मान्यता दिल्यास मुलींच्या लग्नाचे कायदेशीर वय २१ वर्षे होईल. मुलींच्या लग्नाचे वय २१ करणारे हिमाचल प्रदेश हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. हिमाचल प्रदेशात मुलगा आणि मुलगी यांचे वय २१ वर्षे किंवा त्याहून अधिक असेल तेव्हाच विवाह वैध मानला जाईल.

काय म्हणाले मुख्यमंत्री

विधेयक सादर करताना हिमाचल प्रदेशाचे आरोग्य आणि महिला सक्षमीकरण मंत्री धनीराम शांडील म्हणाले की, बालविवाह कायदा 2006 मध्ये बालविवाहावर बंदी घालण्यासाठी तरतूद करण्यात आली होती. राज्यात स्त्री-पुरुष समानता आणि उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुलींच्या लग्नाचे किमान वय वाढवणे आवश्यक झाले आहे. यामुळे सध्या राज्यात मुलींच्या लग्नासाठी वयमर्यादा १८ वर्ष आहे. त्यात तीन वर्षांनी वाढ करुन २१ वर्ष करण्यात येणार आहे. यासंदर्भातील निर्णयास मंत्रिमंडळाने सात वर्षांपूर्वी मंजुरी दिली होती.

मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू म्हणाले की, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात आमचे सरकार कठोर कारवाई करणार आहे. आम्ही यासंदर्भात सभागृहात चर्चेसाठी तयार आहोत. परंतु विरोधक चर्चेतून पळ काढत आहेत.

सर्व जाती, धर्मांना लागू होणार कायदा

राज्यपालांनी या विधेयकास मंजुरी दिल्यावर तो राज्यातील सर्व नागरिकांना लागू होणार आहे. कोणत्याही धर्म किंवा जातीचा व्यक्ती असला तरी त्यांच्यासाठी हा कायदा लागू असणार आहे. एखाद्या समाजात कमी वयात लग्नाची प्रथा असेल तर ती त्यांना बंद करावी लागणार आहे. यामुळे आता हिमाचल प्रदेशात मुलगा किंवा मुलगी यांच्या लग्नाचे वय 21 वर्ष असणार आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.