AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केवळ लग्नासाठी हिंदू करताहेत धर्मांतर, OTT पाहणाऱ्या मुलांवर लक्ष ठेवा: मोहन भागवत

केवळ लग्नासाठी हिंदूंकडून धर्मांतर होत आहे. अत्यंत छोट्या स्वार्थासाठी हिंदू दुसऱ्या धर्मात प्रवेश करण्याची चूक करत आहे. हिंदू कुटुंबीयांकडून मुलांना धर्म आणि त्याच्या परंपरेचे संस्कार दिले जात नाहीत म्हणून अशा घटना घडत आहेत. (Mohan Bhagwat)

केवळ लग्नासाठी हिंदू करताहेत धर्मांतर, OTT पाहणाऱ्या मुलांवर लक्ष ठेवा: मोहन भागवत
Mohan Bhagwat
| Edited By: | Updated on: Oct 11, 2021 | 2:18 PM
Share

डेहराडून: केवळ लग्नासाठी हिंदूंकडून धर्मांतर होत आहे. अत्यंत छोट्या स्वार्थासाठी हिंदू दुसऱ्या धर्मात प्रवेश करण्याची चूक करत आहे. हिंदू कुटुंबीयांकडून मुलांना धर्म आणि त्याच्या परंपरेचे संस्कार दिले जात नाहीत म्हणून अशा घटना घडत आहेत, असं सांगतानाच OTT पाहणाऱ्या मुलांवर लक्ष ठेवा, असं आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे.

मोहन भागवत उत्तराखंडच्या हल्दानी येथे काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. यावेळी त्यांनी हे आवाहन केलं. धर्मांतर कसं होतं? छोट्या छोट्या स्वार्थांसाठी, विवाह करण्यासाठी, आपल्या देशातील मुलं आणि मुली धर्मांतर का करत आहेत? धर्मांतर करणारे चुकीचे आहेत तर हरकत नाही. पण आपल्या मुलांना आपण वाढवत नाही का?, असा सवाल भागवत यांनी केला.

धर्मांतर कसे रोखणार?

हिंदू मुलांचं धर्मांतर रोखण्यासाठी त्यांनी मुलांच्या व्यवहारावर भाष्य केलं. आपल्याला मुलांना घरातच संस्कार द्यावे लागतील. स्वत:चा अभिमान वाटावा, आपल्या धर्मावर अभिमान वाटावा आणि आपल्या प्रार्थना आणि परंपरांबद्दल आदर वाटावा असे संस्कार मुलांना द्यावे लागतील. त्याबाबत मुलांनी सवाल केले तर त्यांना उत्तरे द्या. कन्फ्यूज होऊ नका, असं त्यांनी सांगितलं.

अनेक राज्यात लव्ह जिहाद रोखण्यासाठी कायदे आणण्यात आले आहेत. अशावेळी भागवत यांनी केलेल्या या विधानाला महत्त्व प्राप्त झालं आहे. संघाच्या दबावाखालीच हे कायदे करण्यात आल्याचंही सांगण्यात येत आहे.

कार्यक्रमात 50 टक्के महिला हव्याच

यावेळी त्यांनी कौटुंबीक मूल्य आणि त्याच्या संरक्षणावर विस्तृतपणे मांडणी केली. यावेळी त्यांनी संघात अधिक पुरुषच का आहेत हे सुद्धा सांगितलं. हिंदू समाजाला संघटीत करणं हे संघाचं उद्दिष्ट आहे. परंतु, जेव्हा आपण कार्यक्रमांचं आयोजन करतो तेव्हा कार्यक्रमात पुरुषच दिसतात. आता जर आपण संपूर्ण समाजाला संघटीत करणार आहोत, तर आपल्या कार्यक्रमांना 50 टक्के महिला उपस्थित असल्या पाहिजेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

ओटीटीवर काहीही दाखवलं जातं

यावेळी त्यांनी ओटीटीवरून पालकांना सावध केलं. ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक प्रकारच्या गोष्टी दाखवल्या जात आहेत. हे कंटेट दाखवताना मुलांवर काय परिणाम होईल, आपली परंपरा, संस्कार आणि मूल्यांचं काय होईल याचं ओटीटीला काहीही पडलेलं नसतं. त्यामुळे घरी काय पाहावं आणि काय पाहू नये हे आपण आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे, असं ते म्हणाले.

ड्रग्ज कुठून येतंय?

यावेळी त्यांनी भारतीय कुटुंब पद्धतीचं कौतुक केलं. आता पाश्चिमात्य देशही भारतीय कुटुंब पद्धतीचा अभ्यास करत आहे. अर्थात पूर्वी हीच व्यवस्था आणि मूल्य नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. लोकांना गुलाम करण्यासाठी पश्चिमात्यांनी चीनला अफू पाठवली. तरुणाना अफूची सवय लागली. पिढी बरबाद झाली आणि पाश्चिमात्यांनी चीनवर राज्य केलं. आमच्या देशातही असंच होत आहे. ड्रग्ज कुठून येत आहे हे पाहिल्यावर तुम्हाला कळेल ड्रग्ज कुठून येतं आणि त्याचा कुणाला फायदा होत आहे, असंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

पुंछ सेक्टरमध्ये दहशतवाद्यांशी सामना, कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यासह 4 जवान शहीद

अलमारीत सापडले तब्बल 142 कोटी रुपये! आयकर विभागाचे अधिकारीही चक्रावले

पंतप्रधान मोदींनी केली इंडियन स्पेस असोसिएशनची सुरुवात, अंतराळ विश्वात क्रांती करण्यासाठी भारताचं मोठं पाऊल

(Hindus converting to other religions for marriage are committing wrong, says Mohan Bhagwat)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.