केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुन्हा रुग्णालयात, 'एम्स'मध्ये दाखल

पोस्ट कोव्हिड लक्षणे दिसत असल्याने अमित शाह यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुन्हा रुग्णालयात, 'एम्स'मध्ये दाखल

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. थकवा आणि अंगदुखीचा त्रास होत असल्याने शाहांना ‘एम्स’मध्ये अ‍ॅडमिट केल्याची माहिती आहे. (Home Minister Amit Shah admitted to AIIMS Hospital)

गेल्याच आठवड्यात शाह यांनी कोरोनावर मात केली. मात्र पोस्ट कोव्हिड लक्षणे दिसत असल्याने अमित शाह यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शाह सध्या ‘एम्स’चे संचालक आर गुलेरिया यांच्या निगराणीखाली आहेत.

“गेल्या तीन-चार दिवसांपासून अमित शाह यांना थकवा आणि अंगदुखीचा त्रास जाणवत आहे. त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. पोस्ट कोव्हिड केअरसाठी शाह यांना ‘एम्स’मध्ये दाखल करण्यात आले आहे. ते स्वस्थ असून रुग्णालयातून कामही करत आहेत” असे ‘एम्स’ रुग्णालयाने म्हटले आहे.

अमित शाह यांनी 14 ऑगस्टला स्वत: ट्विटरवर माहिती देत कोरोनामुक्त झाल्याचे सांगितले. “आज माझा कोरोना टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आला. मी परमेश्वराचा आभारी आहे. यादरम्यान ज्यांनी माझ्या आरोग्यासाठी प्रार्थना केली, मला आणि माझ्या कुटुंबियांना मानसिक पाठबळ दिलं, अशा प्रत्येकाचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. मी आता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणखी काही दिवस आयसोलेशमध्ये राहीन”, असं अमित शाह म्हणाले होते.

अमित शाह यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती 2 ऑगस्ट रोजी समोर आली. अमित शाह यांच्यावर मेदांता रुग्णालयात उपचार करण्यात आले. जवळपास दहा ते बारा दिवसांच्या उपचारानंतर शाह यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला.

Home Minister Amit Shah admitted to AIIMS Hospital

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *