घनदाट जंगलांमध्ये आदिवासी लोक सापांपासून बचाव कसा करतात? ही ट्रिक तुम्हालाही माहिती पाहिजेच, साप कधीच जवळ येणार नाही

अनेकांना सापाची भीती वाटते, उन्हाळ्याच्या दिवसांत तर साप घरात शिरण्याचं प्रमाण वाढतं, अशावेळी आदिवासी लोक जंगलांमध्ये सापापासून बचावासाठी जो उपाय करतात तो आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे.

घनदाट जंगलांमध्ये आदिवासी लोक सापांपासून बचाव कसा करतात? ही ट्रिक तुम्हालाही माहिती पाहिजेच, साप कधीच जवळ येणार नाही
Snake
Image Credit source: Google
| Updated on: Mar 04, 2026 | 11:43 PM

साप मुख्यत: दोन ऋतुंमध्ये आपल्या बिळातून बाहेर पडतात, एक तर पावसाळ्यामध्ये कारण पावसाळ्यात पावसाचं पाणी बिळात घुसतं आणि बिळ ओलं झाल्यामुळे साप बिळाच्या बाहेर पडतात. अशा स्थितीमध्ये ते निवाऱ्यासाठी कोरडी जागा शोधत असतात. घरात कोरडी जागा असते, त्यामुळे जिथे अडगळ असेल किंवा त्यांना लपण्यासाठी सुरक्षित कोरडा निवारा असेल अशा ठिकाणचा या काळात ते आडोसा घेतात. तर उन्हाळ्यामध्ये होतं काय की प्रचंड उष्णता असते, तापमान जसं जसं वाढतं तसं तसं जिमिनीतून देखील वाफा निघतात. साप हा जरी थंड रक्ताचा प्राणी असला तरी देखील त्याला या काळात उष्णतेचा त्रास होतो आणि तो बिळातून बाहेर पडतो. अशा स्थितीमध्ये तो निवाऱ्यासाठी थंड जागा शोधतो. घरात आडोशाला जिथे थंड जागा असते तिथे तो आसारा घेतो. त्यामुळे या दोन ऋतुमध्ये घरात साप दिसण्याचं प्रमाण वाढतं. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की साप हा मुळातच लाजाळू प्राणी आहे, तो स्वत:हून कधीच चावत नाही किंवा फार अपवादा‍त्मक स्थितीमध्ये चावतो. जर त्याला वाटलं की तुम्ही त्याची शिकार आहात, किंवा तुमच्यापासून त्याला धोका आहे, तरच तो तुमच्यावर हल्ला करतो.

त्यामुळे तुम्हाला जर कधीही साप दिसला तर त्याला मारू नका, त्याची माहिती ही सर्पमित्रांना द्या, ते सांपाना रेस्क्यू करून सुरक्षित अधिवासात सोडतील. भारतामध्ये सापांच्या हजारो जाती आढळतात, पण त्यातील अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच जाती या विषारी आहेत. ज्यामध्ये चार जातीचा प्रामुख्यानं उल्लेख होतो. या चार जाती महाराष्ट्रात देखील आढळतात. त्यातील पहिली सापाची जात म्हणजे नाग हा अत्यंत विषारी साप असतो. नागासोबतच मण्यार फुरसे, घोणस या आणखी तीन सापांच्या जाती प्रचंड विषारी आहेत. यापैकी सर्वात जास्त धोका हा घोणसपासून असतो. कारण याचा प्रजनन दर खूप जास्त आहे. त्यामुळे या सापांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहेत. अनेक ठिकाणी घोणस साप निघण्याच्या घटना घडतात. चला तर मग आज आपण सापांपासून संरक्षण कसं करायचं त्याची माहिती जाणून घेऊयात.

आदिवासी समाजाच्या अनेक जाती अशा आहेत, ज्या जंगलांमध्ये राहतात. जंगलांमध्ये साप निघण्याचं प्रमाण हे खूप जास्त असतं, संध्याकाळच्या वेळी जंगलांमध्ये लाईट देखील नसते, त्यामुळे अंधारात साप चावण्याचा धोका असतो. अशा वेळी हे लोक सापांपासून संरक्षण करण्यासाठी नेहमी उंच जागी झोपतात. जसं की बाज किंवा पारंपरीक पद्धतीने गवतापासून आणि बांबूंचा उपयोग करून बनवलेलं मचान अशा ठिकाणी झोपतात. कारण याचा एक फायदा असा होतो, की उंचावर झोपल्यामुळे झोपेत साप चावण्यापासून त्यांचं संरक्षण होतं. त्याचं प्रमाणे ते काही पारंपारिक झाड पाल्यांचा उपयोग देखील करतात, जसं की मोहाच्या झाडाच्या सालीपासून ते विशिष्ट पद्धतीचं द्रव्य तयार करतात, याला तीव्र असा वास असतो. हे द्रव्य घरात ठेवल्यामुळे साप घरात शिरत नाही, आणि सापांपासून बचाव होतो.

 

Follow Us