UPSC विद्यार्थी ते ज्येष्ठ नागरिक; सर्व श्रेणींच्या रेल्वे तिकिटावरील सवलती एका क्लिकवर

UPSC विद्यार्थी ते ज्येष्ठ नागरिक; सर्व श्रेणींच्या रेल्वे तिकिटावरील सवलती एका क्लिकवर
संग्रहित छायाचित्र.

विविध 12 श्रेणीतील प्रवाशांना रेल्वे तिकिटात सूट दिली जाते. कोविड लॉकडाउन नंतर रेल्वेकडून काही सुविधांना 'ब्रेक' लावण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिकांना आता तिकिटावर सूट दिली जात नाही. सध्या तीन श्रेणीतील तिकिटांनाच सूट दिली जात आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: राजेंद्र खराडे

Dec 21, 2021 | 3:47 PM

नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कमध्ये भारतीय रेल्वेचा समावेश होतो. भारताची चारही टोकं रेल्वेनं जोडली गेली आहेत. दिवसाला सव्वा दोन कोटी प्रवासी रेल्वेनं प्रवास करतात. तब्बल 800 कोटी हून अधिक लोक वर्षाला रेल्वेचा उपयोग करतात. ही प्रवासी संख्या जागतिक लोकसंख्येहून अधिक ठरते. भारतीय रेल्वेकडून प्रवाशांना विविध सुविधा दिल्या जातात. विविध 12 श्रेणीतील प्रवाशांना रेल्वे तिकिटात सूट दिली जाते. कोविड लॉकडाउन नंतर रेल्वेकडून काही सुविधांना ‘ब्रेक’ लावण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिकांना आता तिकिटावर सूट दिली जात नाही. सध्या तीन श्रेणीतील तिकिटांनाच सूट दिली जात आहे.

रेल्वे तिकिटात यांना सूट:

रेल्वेचे माजी जनसंपर्क अधिकारी एकलव्य चक्रवर्ती यांनी रेल्वे तिकिटावरील सवलतींची माहिती दिली आहे. कोविडमुळे रेल्वेचे उत्पादन घटले. अनावश्यक खर्चात कपातीचे धोरण रेल्वेने स्विकारले. मार्च 2020 मध्ये सर्व प्रकारच्या तिकीट श्रेणीवरील सवलत स्थगित करण्यात आली आहे. सध्या केवळ विद्यार्थी,रुग्ण तसेच दिव्यांग व्यक्तींना रेल्वे तिकीटात सूट दिली जाते. ज्येष्ठ नागरिकांना दिली जाणारी सवलत स्थगित करण्यात आली आहे.

दिव्यांगांना मिळणारी सवलत:

दिव्यांग व्यक्तींना विविध प्रकारच्या रेल्वे गाड्यांसाठी स्वतंत्र सवलत मिळते. दिव्यांग व्यक्तींसोबत असलेल्या व्यक्तींनाही ही सवलत लागू असते. सेकंड स्लीपर,फर्स्ट क्लास,थर्ड एसी आणि एसी चेअर कार तिकिटावर 75% सवलत मिळते. फर्स्ट एसी आणि सेकंड एसी तिकिटावर 50% सवलत आहे. राजधानी आणि शताब्दी गाडीच्या थर्ड एसी आणि एसी चेअर कार साठी 25% सवलत आहे.

कॕन्सरग्रस्तांना सवलत:

कॕन्सरग्रस्तांना सेकंड आणि फर्स्ट क्लास तिकिटावर 75% सवलत दिली जाते. मात्र, स्लीपर आणि थर्ड एसी साठी त्यांना मोफत प्रवासाची मुभा आहे. फर्स्ट तसेच सेकंड एसीवर 50% सवलत दिली जाते. कॕन्सरग्रस्तांसोबत प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीला याप्रमाणेच सवलत लागू आहेत.

विद्यार्थ्यांना रेल्वे तिकिटावर सवलत

शिक्षण संस्थामधून घरी प्रवास करणारे किंवा शैक्षणिक सहलीसाठी विद्यार्थ्यांना स्लीपर क्लास साठी 50% सवलत मिळते. अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांना यासाठी 75% सवलत मिळते. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना सेकंड क्लास प्रवास तिकिटावर 50% सवलतीची तरतूद आहे.

मुलींना विशेष सवलत:

घर ते शिक्षण संस्थेत येणाऱ्या-जाणाऱ्या मुलींना पदवीपर्यंत मोफत प्रवासाची तरतूद आहे. शैक्षणिक सहलीवर जाणाऱ्या ग्रामीण शासकीय विद्यालयातील मुलांना सेकंड क्लास तिकिटावर 75% सवलत दिली जाते. राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परिक्षांसाठी मुलींना सेकंड क्लास तिकिटावर 75% सवलतीची देखील तरतूद आहे.

संबंधित बातम्या :

Indian marriage act : मुलींचे लग्नाचे वय 21 वर्षे करणारे विधेयक संसदीय समितीकडे, विरोधकांची भूमिका पाहून निर्णय बदलला

दिल्लीत आज ओबीसी परिषद, लालू, शरद यादव येणार; भुजबळ राजधानीत शक्तीप्रदर्शन करणार?

खीमपूर हिंसेप्रकरणी गृहराज्यमंत्र्यांच्या राजीनाम्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, राऊतांचा इशारा; विरोधकांचा संसदेबाहेर लाँगमार्च

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें