Video: भाजपचे ‘MP गजब है!’, मोदींनी दाढी झटकली तर 50 लाख घरं पडतात, भाजप खासदाराचं वक्तव्य

एवढ्यावरच जनार्दन मिश्र थांबले नाहीत तर ते पुढं म्हणाले,'जोपर्यंत पंतप्रधान मोदींची दाढी राहिल, तोपर्यंत पीएम आवास योजनेचा लाभ मिळत राहिल. त्यासाठी मोदींच्या दाढीला नेहमी पाहात राहा

Video: भाजपचे 'MP गजब है!', मोदींनी दाढी झटकली तर 50 लाख घरं पडतात, भाजप खासदाराचं वक्तव्य
पंतप्रधान मोदी आणि जनार्दन मिश्र (प्रतिकात्मक फोटो)
Follow us
| Updated on: Nov 26, 2021 | 1:18 PM

भोपाळ: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकदा दाढी झटकली तर त्यातून 50 लाख घरं पडतात, आणि दुसऱ्यांदा झटकली तर त्यातून 1 कोटी घर पडतात, असं वक्तव्य मध्य प्रदेशातील भाजप खासदार महोदयांनी केलं आहे. या खासदारांचं नाव आहे जनार्दन मिश्र, ते मध्य प्रदेशातल्या रिवा मतदारसंघातून भाजपचे खासदार आहे. जनार्दन मिश्र असेही अनेकदा चर्चेत असतात, पण आता त्यांनी केलेल्या या वक्तव्यमुळे सोशल मीडियावर ते धुमाकूळ घालत आहेत. (If Modi shake his beard, 50 lakh houses will fall, says BJP MP from Madhya Pradesh Janardan Mishra)

मध्य प्रदेशातील एका स्थानिक सभेला जनार्दन मिश्र संबोधित करत होते. त्यावेळी पंतप्रधान आवास योजनेबद्दल माहिती देताना त्यांनी त्याचा थेट संबंध मोदींच्या दाढीशी जोडून टाकला. ते म्हणाले की, ‘पीएम आवास योजना ही पंतप्रधान मोदींच्या दाढीतून बाहेर पडते, मोदींनी एकदा दाढी झटकली तर 50 लाख आणि दुसऱ्यांदा झटकली तर 1 कोटी घरं बाहेर पडतात.’ हे ऐकल्यानंतर स्थानिकांमध्ये एकच हशा पिकला.

मोदींची दाढी आहे, म्हणून योजना आहे!

एवढ्यावरच जनार्दन मिश्र थांबले नाहीत तर ते पुढं म्हणाले,’जोपर्यंत पंतप्रधान मोदींची दाढी राहिल, तोपर्यंत पीएम आवास योजनेचा लाभ मिळत राहिल. त्यासाठी मोदींच्या दाढीला नेहमी पाहात राहा आणि घरं मिळवत राहा.’ हे वक्तव्य चर्चेत आल्यानंतर जनार्दन मिश्र यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार लोकांना समजावण्यासाठी त्यांनी मोदींच्या दाढीचं उदाहरण दिलं. त्यांच्या म्हणण्यानुसार, विरोधकांकडून पंतप्रधान आवास योजना बंद होणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत.

पाहा व्हायरल होणारा व्हिडीओ:

जनार्दन मिश्र याआधीही चर्चेत

जनार्दन मिश्र हे नेहमी चर्चेत राहतात. याआधी मे महिन्यात त्यांनी मध्य प्रदेशातील कोविड सेंटरचा आढावा घेतला, पाहणी दरम्यान त्यांना शौचालय अस्वच्छ दिसलं, तर त्यांनी हाताने या शौचालयाची स्वच्छता केली. शौचालय स्वच्छ करतानाचा त्यांचा हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता.

जनार्दन मिश्र यावेळी आपल्या मतदार संघाचा आढावा घेत होते, या दरम्यान स्थानिकांनी शौचालयाची समस्या त्यांना सांगितली, हे कळाल्यानंतर ते शौचालयात पोहचले आणि कुणाला काही आदेश देण्याऐवजी हातात हँडग्लोव्हज घालून त्यांनी शौचालयाची स्वच्छता केली. शौचालयाच्या स्वच्छतेसाठी मिश्र यांनी टॉयलेट ब्रश मागितला, पण ब्रश नसल्याचं कळाल्यावर त्यांनी हातानेच शौचालयाचं भांडं स्वच्छ केलं.

हेही पाहा:

उत्तर कोरियात आता काळ्या लेदर कोटवर बंदी, सनकी किमच्या सरकारने हा निर्णय का घेतला, वाचा सविस्तर!

नशीब असावं तर विलीसारखं, 7 वर्षात दोनदा लॉटरी लागली, मिळाले तब्बल इतके कोटी…!

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.