नशीब असावं तर विलीसारखं, 7 वर्षात दोनदा लॉटरी लागली, मिळाले तब्बल इतके कोटी…!

विलीने ऑक्टोबर महिन्यात शहरातील क्विक स्टार स्टोअरमधून वेगवेगळ्या किंमतीच्या 4 लॉटरी विकत घेतल्या होत्या. ज्या लॉटरीची सोडत नुकतीच पार पडली, या सोडतीत विलीच्या 3 पैकी 1 लॉटरीने कमाल केली

नशीब असावं तर विलीसारखं, 7 वर्षात दोनदा लॉटरी लागली, मिळाले तब्बल इतके कोटी...!
सलग दुसऱ्यांदा लॉटरी जिंकणारा नशीबवान
Follow us
| Updated on: Nov 26, 2021 | 10:51 AM

कधी कुणाचं नशीब पालटेल, आणि त्याला विचारही न केलेली संपत्ती मिळेल हे सांगता येत नाही. कधी कधी छप्पर फाड के मिळतं, ज्यावर विश्वास ठेवणंही कठीण होऊन बसतं. असाच काहीसा प्रकार अमेरिकेतील एका व्यक्तीसोबत घडला, याचं नशीब एवढं भारी आहे, की या माणसाने आतापर्यंत 2 लॉटरी जिंकून लाखो रुपये कमावले आहेत. अमेरिकेच्या आयोवा राज्यात राहणाऱ्या या व्यक्तीने आता $75,000 म्हणजेच जवळपास 55 लाख 88 हजार रुपयांचे लॉटरी जिंकली आहे. पण एवढंच याचं नशीब नाही आहे, याच व्यक्तीने 2014 मध्ये $2,00,000 म्हणजे तब्बल 1 कोटी 49 लाख रुपयांची लॉटरी जिंकली होती. (Willie Tully, from Iowa, USA, won the lottery for the second time in a row, becoming a millionaire)

या नशीबवान व्यक्तीचं नाव आहे विली टुली, तो आयोवा राज्यातील सीडर रॅपिड्स सिटीत राहतो. लॉटरी अधिकाऱ्यांनी टुलीच्या लॉटरी जिंकल्याची माहिती दिली. विलीने ऑक्टोबर महिन्यात शहरातील क्विक स्टार स्टोअरमधून वेगवेगळ्या किंमतीच्या 4 लॉटरी विकत घेतल्या होत्या. ज्या लॉटरीची सोडत नुकतीच पार पडली, या सोडतीत विलीच्या 3 पैकी 1 लॉटरीने कमाल केली, त्याचे नंबर तंतोतंत जुळले, आणि त्याच्या पदरात तब्बल 55 लाख रुपये पडले.

7 ऑक्टोबरला विलीला लॉटरी जिंकल्याचं कळालं, मात्र, लॉटरीचे पैसे नवीन वर्षात स्वीकारायचे असं विलीने ठरवलं. अशीही माहितीही त्याने अधिकाऱ्यांना दिली, मात्र नंतर त्याचा विचार बदलला आणि त्याने पैसे घेण्याचं ठरवलं. मिळालेल्या माहितीनुसार, विलीने 2014 साली 2 मिलियन डॉलरची लॉटरी जिंकली होती.

लॉटरी जिंकल्यानंतर विली म्हणाला, ‘एवढी मोठी रक्कम जिंकून खूप छान वाटतं. मागील वेळेपेक्षा या वेळी मला जास्त आश्चर्य वाटले.’ त्यामुळेच कदाचित मी लॉटरी अधिकाऱ्यांना म्हणालोही की, तुम्ही माझी मस्करी करत आहात!

मात्र, एवढ्या मोठ्या रकमेच्या लॉटरीत जिंकलेली विली टुली ही एकमेव व्यक्ती नाही. अमेरिकेतील मिसुरी राज्यात राहणाऱ्या एका जोडप्याने अलीकडेच लॉटरीच्या तिकिटातून 3 मिलियन डॉलर म्हणजेच 22 कोटी रुपयांहून अधिक रक्कम जिंकली आहे, तर काही वर्षांपूर्वी त्यांनी लॉटरीच्या तिकिटातून 2 लाख 50 हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे एक कोटी ८६ लाख रुपये जिंकले. एवढी मोठी रक्कम जिंकल्यानंतर या जोडप्याचे म्हणणे आहे की त्यांनी लॉटरीत एवढी मोठी रक्कम जिंकली यावर विश्वास बसत नाही.

हेही पाहा:

Video | स्टेजवर येताना नवरी गोंधळली, क्षणात नरवदेव सरसावला, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Video: वरपित्याच्या विनंतीवर पंडितजी लाजत म्हणाले, ‘आता तुम्ही एकमेकांना Kiss करु शकता’, पाहा भन्नाट व्हिडीओ

 

Non Stop LIVE Update
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.