AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: वरपित्याच्या विनंतीवर पंडितजी लाजत म्हणाले, ‘आता तुम्ही एकमेकांना Kiss करु शकता’, पाहा भन्नाट व्हिडीओ

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, स्टेजवर वरमाला एकमेकांच्या गळ्यात टाकल्यानंतर वधूवर खुर्चीवर बसले आहेत. त्याचवेळी पंडितजी आणि कुटुंबीयही तिथे उपस्थित आहेत. यादरम्यान, मुलाचे वडील हसतात आणि लग्न लावणाऱ्या गुरुजींना म्हणतात - तुम्ही वराला सांगा की, तो आता वधूचे चुंबन घेऊ शकतो.

Video: वरपित्याच्या विनंतीवर पंडितजी लाजत म्हणाले, 'आता तुम्ही एकमेकांना Kiss करु शकता', पाहा भन्नाट व्हिडीओ
पंडितजी जेव्हा वधूवराला किस करण्यास सांगतात...
| Edited By: | Updated on: Nov 25, 2021 | 5:46 PM
Share

सध्या सोशल मीडियावर लग्नाशी संबंधित एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये वर पिता लग्न लावणाऱ्या गुरुजींना असं काही बोलायला लावतात, कि ज्यामुळे गुरुजी लाजतात. हा अतिशय सुंदर व्हिडिओ आतापर्यंत हजारो वेळा पाहिला गेला आहे. काही सेकंदांचा हा व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मंडपापासून काही अंतरावर बसलेले मुलाचे वडील पंडितजींना सांगतात की, आता तुम्ही त्यांना सांगा की ते वधू-वर एकमेकांना किस करु शकतात. यावेळी गुरुजी ज्या प्रकारे रिएक्ट होतात, ते पाहण्यासारखं आहे. (Pandit ask Groom and Bride to kiss each other on Dad’s request Viral Video )

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, स्टेजवर वरमाला एकमेकांच्या गळ्यात टाकल्यानंतर वधूवर खुर्चीवर बसले आहेत. त्याचवेळी पंडितजी आणि कुटुंबीयही तिथे उपस्थित आहेत. यादरम्यान, मुलाचे वडील हसतात आणि लग्न लावणाऱ्या गुरुजींना म्हणतात – तुम्ही वराला सांगा की, तो आता वधूचे चुंबन घेऊ शकतो. हे ऐकून पंडितजींनी जी प्रतिक्रिया दिली ती पाहण्यासारखी आहे. हे ऐकूण पंडितजी लाजले आणि वराच्या वडिलांना सांगतात की तुम्हीच सांगा. हे ऐकून तिथे उपस्थित असलेले सर्वजण जोरजोरात हसू लागतात. यानंतर, इच्छा नसतानाही, पंडितजी संकोचून वराला म्हणतात – तू वधूचे चुंबन घे. यानंतर वधू आणि वर एकमेकांचे चुंबन घेतात.

चला हा व्हिडिओ पाहूया.

हा अतिशय गोंडस व्हिडिओ इंस्टाग्रामवर shutterdownphotography नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. युजरने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘जेव्हा वडिलांनी मुलाला सांगितले – आता तुम्ही वधूला किस करू शकता.’ हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. युजर्सना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. एका यूजरवर कमेंट करताना लिहिले की, ‘खूप क्यूट कपल. तुम्ही दोघे खूप क्यूट आहात.’ या व्हिडिओवर कमेंट करताना नववधूने ‘माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण’ असेही लिहिले आहे.

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केल्यापासून आतापर्यंत सुमारे 27 हजार वेळा पाहिला गेला आहे. ही संख्या सातत्याने वाढत आहे. हा व्हिडिओ बहुतांश लोकांना खूप आवडला आहे. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, ‘देसी वेडिंगला वेस्टर्न टच आहे.’ मात्र, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही यूजर्स संतापले आहेत. काही लोक म्हणतात की हा हिंदू प्रथांचा अपमान आहे. अग्निवेदी हा पवित्र अग्नि आहे, असे करणे अजिबात योग्य नाही.

खरं म्हणजे ख्रिश्चन धर्मियांमध्ये विशेष करुन युरोपीन लग्नांमध्ये ही प्रथा वापरली जाते, ज्यात लग्न झाल्यानंतर पादरी म्हणजेच ख्रिश्चन पुजारीच वधूवराला सांगतात, की तुम्ही आता लग्नबंधनात बांधले गेले आहेत, तुम्ही एकमेकांना किस करु शकता. हाच प्रयोग मुलाच्या वडिलांनी या लग्नात केला, त्यानंतर मांडवात एकच हशा पिकला.

हेही पाहा:

13 वर्षाच्या चिमुरड्याचं कुकिंग स्किल पाहून नेटकरी हैराण, म्हणाले, हाच खरा मास्टरशेफ!

Video: कपडे वाळत घालताना आजीचा पाय सटकला, 19 व्या मजल्यावरुन थेट खाली, पण तितक्यात…पाहा धडकी भरवणारा व्हिडीओ!

 

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.