AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युरोपात कोरोना रुग्ण वाढताहेत, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं संकटही घोघावतंय; मोदींचा मुख्यमंत्र्यांना सावधानतेचा इशारा

युरोपात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. पूर्वेकडील देशातही कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. हा आपल्यासाठी धोक्याचा इशाराच आहे. (Prime Minister Narendra Modi)

युरोपात कोरोना रुग्ण वाढताहेत, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं संकटही घोघावतंय; मोदींचा मुख्यमंत्र्यांना सावधानतेचा इशारा
pm modi
| Edited By: | Updated on: Jul 16, 2021 | 1:00 PM
Share

नवी दिल्ली: युरोपात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. पूर्वेकडील देशातही कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. हा आपल्यासाठी धोक्याचा इशाराच आहे, असं सांगतानाच कोरोनाची तिसरी लाट आपल्याही दाराशी आली आहे. त्यामुळे सावध राहा. काळजी घ्या, उपाययोजना करा, असा सतर्कतेचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिला आहे. (If the corona crisis not controlled the situation will be frightening, says Prime Minister Narendra Modi)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी, कर्नाटक बी. एस. येडियुरप्पा, केरळचे मुख्यमंत्री पीनराई विजयन आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला. याप्रसंगी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंहही उपस्थित होते. यावेळी त्यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. कोरोना संकटाच्या काळात सर्वच राज्य सरकारांनी एकमेकांपासून अनेक गोष्टी शिकण्याचा प्रयत्न केला. आता आपण तिसऱ्या लाटेच्या टप्प्यावर उभे आहोत. तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या अजूनही वाढत आहे. हा चिंतेचा विषय आहे, असं मोदी म्हणाले.

महाराष्ट्र आणि केरळात सर्वाधिक रुग्णसंख्या

गेल्या आठवड्याभरात 80 टक्के केसेस आजच्या बैठकीत सामिल झालेल्या सहा मुख्यमंत्र्यांच्या राज्यातील आहेत. महाराष्ट्र आणि केरळातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय आहे. त्यामुळे पुन्हा एकदा टेस्ट, ट्रॅकिंग आणि लसीकरणावर भर दिला पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.

23 हजार कोटींचा निधी दिला

ज्या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग अधिक आहे. तिथे लसीकरणावर भर दिला पाहिजे. टेस्टिंगमध्ये आरटीपीसीआर चाचणीवर अधिक भर दिला पाहिजे. सर्व राज्यांमध्ये आयसीयू बेड्स, टेस्टिंगची क्षमता वाढवण्यासाठी निधी दिला जात आहे. केंद्राने आतापर्यंत 23 हजार कोटींचा निधी दिला आहे. त्याचा वापर केला गेला पाहिजे, असं ते म्हणाले.

सार्वजनिक ठिकाणची गर्दी रोखा

तिसऱ्या लाटेपासून लहान मुलांचं संरक्षण करण्यासाठी पावलं उचलली पाहिजे. गेल्या आठवड्यात युरोपात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली. अमेरिकेतही रुग्ण संख्या वाढत आहे. हा आपल्यासाठी इशारा आहे, असं सांगतानाच सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी रोखण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, अशी सूचनाही त्यांनी केली.

उद्धव ठाकरेंनी दिली नियोजनाची माहिती

दरम्यान, कोविडच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्राने उचललेली ठोस पाऊले आणि तिसऱ्या संभाव्य लाटेसाठी नियोजन याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिली. तसेच कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी आवश्यक गोष्टींचीही मोदींकडे मागणी करण्यात आली आहे.

गर्दी रोखण्यासाठी केंद्राने धोरण आणावे

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करताना वाढणारी गर्दी हे एक मोठे आव्हान आहे. या दृष्टीने विविध धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कारणांसाठी होणारी गर्दी थांबविण्यासाठी केंद्र सरकारनेच आता त्यांच्या स्तरावरून देशपातळीवर व्यापक धोरण आणावे, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. (If the corona crisis not controlled the situation will be frightening, says Prime Minister Narendra Modi)

संबंधित बातम्या:

शरद पवार आज राजनाथ सिंह यांची भेट घेणार; संरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा होणार

मधुमेह होण्यापूर्वीच ‘हे’ आयुर्वेदिक उपाय करा अन् मधुमेहापासून दूर राहा!

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये घट, कोरोनाबळींचा आकडाही कमी

(If the corona crisis not controlled the situation will be frightening, says Prime Minister Narendra Modi)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.