AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जर तुमचा चेक बाऊन्स झाला, तर दुसऱ्या खात्यातून कापले जातील पैसे!

चेक बाउन्सचे वाढते प्रकार लक्षात घेता यावर चाप लावण्यासाठी सरकार यावर कडक पाऊलं उचलण्याच्या तयारीत आहे.

जर तुमचा चेक बाऊन्स झाला, तर दुसऱ्या खात्यातून कापले जातील पैसे!
धनादेश Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 09, 2022 | 9:06 PM
Share

मुंबई, चेक बाऊन्सच्या (check bounce) प्रकरणांना चाप लावण्यासाठी वित्त मंत्रालय जारीकर्त्याच्या इतर खात्यांमधून पैसे कापून घेणे आणि अशा प्रकरणांमध्ये नवीन खाती उघडण्यास प्रतिबंध करणे यासारख्या अनेक उपायांवर  विचार करत आहे. चेक बाऊन्सची वाढती प्रकरणे पाहता मंत्रालयाने नुकतीच एक उच्चस्तरीय बैठक बोलावली होती, ज्यामध्ये अशा अनेक सूचना प्राप्त झाल्या आहेत. हे कायदे अमंलात आणल्यास  कायदेशीर व्यवस्थेवरचा भार वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा काही सूचना देण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये कायदेशीर प्रक्रियेपूर्वी काही पावले उचलावी लागतील जसे की चेक जारी करणाऱ्याच्या खात्यात पुरेसे पैसे नसल्यास त्याच्या इतर खात्यांमधून रक्कम वजा करणे समाविष्ट आहे.

व्यवसाय करण्यास सुलभता

पीटीआय अहवालानुसार, सूत्रांनी सांगितले की, इतर सूचनांमध्ये चेक बाऊन्सचे प्रकरण कर्ज डिफॉल्ट म्हणून हाताळणे आणि क्रेडिट माहिती पुरविणाऱ्या कंपन्यांना अहवाल देणे याचा समावेश आहे.जेणेकरून त्या व्यक्तीचा क्रेडिट स्कोर कमी करता येतील. या सूचना स्वीकारण्यापूर्वी कायदेशीर मत घेतले जाईल, असे त्यांनी सांगितले. या सूचनांची अंमलबजावणी झाल्यास पैसे देणाऱ्याला धनादेश द्यायला भाग पाडले जाईल आणि हे प्रकरण न्यायालयात नेण्याची गरज भासणार नाही. यामुळे व्यवसाय करणे सुलभ होईल आणि खात्यात पुरेसे पैसे नसतानाही जाणीवपूर्वक धनादेश जारी करण्याची पद्धत बंद होईल.

कोर्टात केस दाखल करता येते

चेक जारीकर्त्याच्या इतर खात्यातून रक्कम स्वत: वजा करण्यासाठी मानक कार्यप्रणाली आणि इतर सूचनांचे पालन करावे लागेल. चेक बाऊन्स झाल्याची केस कोर्टात दाखल केली जाऊ शकते आणि हा दंडनीय गुन्हा आहे जो चेकच्या दुप्पट रकमेपर्यंत वाढू शकतो किंवा दोन वर्षांपर्यंत कारावास किंवा दोन्हीही होऊ शकतो.

इंडस्ट्री बॉडी PHD चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने अलीकडेच वित्त मंत्रालयाला विनंती केली होती की चेक बाऊन्स झाल्यास काही दिवसांसाठी बँकेतून पैसे काढण्यावर बंधनकारक स्थगिती यासारखी पावले उचलावीत, जेणेकरून धनादेश जारी करणार्‍यांना जबाबदार धरता येईल.

सत्ताधाऱ्यांनाच EVM वर भरवसा नाही का? सत्ताधाऱ्यांकडून खासगी पहारा....
सत्ताधाऱ्यांनाच EVM वर भरवसा नाही का? सत्ताधाऱ्यांकडून खासगी पहारा.....
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?.
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन.
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'.
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव....
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'.
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.