AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monsoon : मान्सूनबाबत IMD कडून सर्वात मोठी अपडेट, या राज्यांना वादळी पावसाचा अलर्ट जारी

Monsoon Latest Update : अद्याप मान्सून केरळमध्ये पोहोचलेला नाही. त्यामुळे आता मान्सून नेमका कधी दाखल होणार, हा प्रश्न वारंवार विचारला जात आहे. आता यावर हवामान विभागाने मोठी अपडेट दिली आहे.

Monsoon : मान्सूनबाबत IMD कडून सर्वात मोठी अपडेट, या राज्यांना वादळी पावसाचा अलर्ट जारी
Monsoon Keral Latest UpdateImage Credit source: Google
| Updated on: May 31, 2026 | 7:26 PM
Share

संपूर्ण देशातील शेतकरी मान्सूनच्या आगमनाकडे डोळे लावून बसलेले आहेत. कारण अद्याप मान्सून केरळमध्ये पोहोचलेला नाही. त्यामुळे आता मान्सून नेमका कधी दाखल होणार, हा प्रश्न वारंवार विचारला जात आहे. यावर आता हवामान विभागाने भाष्य केले आहे. पुढील तीन ते चार दिवसांत नैऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर तो पुढे भारतभर पसरणार आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

मान्सूनबाबत मोठी अपडेट

हवामान विभागाने मान्सूनबाबत म्हटले आहे की, ‘पुढील तीन-चार दिवसांत नैऋत्य मान्सून दक्षिण-पश्चिम आणि दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, लक्षद्वीप, केरळ, तामिळनाडूचे काही भाग, दक्षिण-पश्चिम, पश्चिम-मध्य, पूर्व-मध्य आणि ईशान्य बंगालच्या उपसागरातील आणखी काही भाग तसेच दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागराच्या उर्वरित भागात दाखल होण्याची शक्यता असून त्यानंतर तो पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे.

उत्तर भारतात पावसाची शक्यता

मान्सूनबाबत अपडेट देताना हवामान विभागाने उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये पुढील काही दिवसांसाठी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार उत्तराखंडमध्ये 31 मे तसेच 1, 5 आणि 6 जून रोजी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह हलका ते व्यापक पाऊस पडण्याची शक्यता आहे. पंजाबमध्येही पुढील सहा दिवस, हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीमध्ये 1 ते 4 जूनदरम्यान, उत्तर प्रदेशात 1 जूनला, तर राजस्थानमध्ये पुढील सात दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची पावसाची शक्यता आहे.

त्याचबरोबर 31 मे आणि 3 ते 6 जूनदरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये, 4 ते 6 जूनदरम्यान हिमाचल प्रदेशात, 31 मे आणि 4 जूनला हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीमध्ये, तर 31 मे रोजी उत्तराखंडमध्ये ताशी 70 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याचा आणि पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. आज उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि राजस्थानमध्ये गारपीट होण्याचीही शक्यता आहे.

यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ईशान्य भारतात यंदाच्या मान्सूनमध्ये सामान्य पावसाची शक्यता आहे. तसेच देशाच्या इतर भागातही सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता. आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, ‘देशातील बहुतांश भागात नैऋत्य मान्सूनचा हंगामी पाऊस सामान्यपेक्षा कमी (94 टक्क्यांपेक्षा कमी) राहण्याची शक्यता आहे.’ दरम्यान, या कमी पावसाचा सर्वाधित फटका कृषी क्षेत्राला बसण्याची शक्यता आहे.

Follow Us
केंद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराच्या पर्श्वभूमीवर मोठ्या हालचाली! दिल्ली
केंद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराच्या पर्श्वभूमीवर मोठ्या हालचाली! दिल्ली दौऱ्याआधीच एकनाथ शिंदेंनी...
राजकीय हालचालींना वेग! NCP तील मंत्र्यांची तातडीची बैठक, काय घडणार?
राजकीय हालचालींना वेग! NCP तील मंत्र्यांची तातडीची बैठक, पुढे काय घडणार?
सिया केतन प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर! थेट पंतप्रधानांना पत्र
सिया केतन प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर! थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं पत्र
फक्त चर्चा की सत्य, राष्ट्रवादी पक्ष लवकरच फुटणार? बड्या नेत्याच्या
NCP | फक्त चर्चा की सत्य, राष्ट्रवादी पक्ष लवकरच फुटणार? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
संजय राऊत संतापलेच! 92 लाख लाडक्या बहिणी योजनेतून बाद झाल्यानंतर थेट..
संजय राऊत संतापलेच! 92 लाख लाडक्या बहिणी योजनेतून बाद झाल्यानंतर थेट...
ओमराजे की श्रीकांत शिंदे, अमित शहांचा वरदहस्त नेमका कोणावर? दिल्लीतील
ओमराजे की श्रीकांत शिंदे, अमित शहांचा वरदहस्त नेमका कोणावर? दिल्लीतील बैठकीत...
थेट "भावी कॅबिनेट मंत्री..." बीडमधील मुंडेंच्या बॅनर्सची जोरदार चर्चा,
Dhananjay Munde | थेट
मोठी बातमी! शिवसेनेला लॉटरी लागणार? फुटीर खासदार थेट दिल्लीत...
मोठी बातमी! शिवसेनेला लॉटरी लागणार? फुटीर खासदारांना थेट दिल्लीत... अमित शहांसोबत महत्त्वाची बैठक
अखेर निर्णय होणारच! शरद पवारांचे 10 पैकी 9 आमदार... मोठी राजकीय घडमोड
अखेर निर्णय होणारच! शरद पवारांचे 10 पैकी 9 आमदार... मोठी राजकीय घडमोड
मला महिला आयोगाची अध्यक्ष करा मग... गिरीजा राऊत प्रकरणी बोलताना करुणा
मला महिला आयोगाची अध्यक्ष करा मग... गिरीजा राऊत प्रकरणी बोलताना करुणा मुंडे हे काय बोलून गेल्या?