AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IMD Rain Alert : घराबाहेर पडू नका, देशाच्या या भागात थेट गारांच्या पावसाचा अलर्ट; हवामान विभागाच्या अंदाजाने चिंता वाढली

IMD Weather Alert : पुढील सात दिवस उत्तर भारत आणि मध्य भारतात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र, 29 मेपासून काही भागांमध्ये तापमानात घट होऊन नागरिकांना दिलासा मिळू शकतो.

IMD Rain Alert : घराबाहेर पडू नका, देशाच्या या भागात थेट गारांच्या पावसाचा अलर्ट; हवामान विभागाच्या अंदाजाने चिंता वाढली
HailStrom AlertImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: May 24, 2026 | 5:19 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतासह देशभरातील विविध भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट सुरू असून नागरिक हैराण झाले आहेत. अशातच आता हवामान विभागाने (IMD) रविवारी दिलेल्या माहितीनुसार, पुढील सात दिवस उत्तर भारत आणि मध्य भारतात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र, 29 मेपासून काही भागांमध्ये तापमानात घट होऊन नागरिकांना दिलासा मिळू शकतो. पश्चिम उत्तर प्रदेशात 29 आणि 30 मे रोजी गारांच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पूर्व उत्तर प्रदेशात एक दिवस आधी अशाच हवामानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय केरळ, लक्षद्वीप, तामिळनाडू तसेच ईशान्य आणि पूर्व भारतातील काही भागांमध्ये पुढील पाच दिवस अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

ईशान्य भारतात पावसाचा इशारा

गेल्या 24 तासात मध्य भारत, उत्तर प्रदेश आणि पूर्व भारतात कमाल तापमान 43 ते 47 अंश सेल्सिअस दरम्यान नोंदवले गेले. तर ईशान्य भारत, पश्चिम हिमालयीन क्षेत्र आणि पश्चिम-दक्षिण भारत वगळता इतर भागांमध्ये तापमान 40 ते 43 अंशांच्या दरम्यान राहिले. आता ईशान्य भारतात 24 आणि 25 मे रोजी आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर आणि मिझोराममध्ये मेघगर्जनेसह पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. 24 मे रोजी आसाम आणि मेघालयातील काही भागांत अतिमुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. तसेच 24 ते 26 मेदरम्यान अरुणाचल प्रदेशात, 24 ते 29 मेदरम्यान आसाम-मेघालयात आणि 24, 25, 29 व 30 मे रोजी नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

दक्षिण भारतात पावसाचा जोर वाढणार

दक्षिण भारतातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. 24 ते 28 मेदरम्यान केरळ, माहे आणि लक्षद्वीपमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. तामिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकल आणि अंतर्गत कर्नाटकमध्येही विजांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. किनारी आंध्र प्रदेश, यानम, रायलसीमा आणि तेलंगणामध्येही अशाच प्रकारचे वातावरण राहणार आहे. काही भागांत जोरदार वारे आणि वादळी पावसाचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उत्तर अंतर्गत कर्नाटकमध्ये 24 मे रोजी गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

कसे असेल उत्तर भारतातील हवामान?

उत्तर-पश्चिम भारतातील जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये 24, 25 आणि 28 ते 30 मेदरम्यान हलका ते मध्यम पाऊस, मेघगर्जना आणि जोरदार वाऱ्यांची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि पश्चिम उत्तर प्रदेशातही काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. जम्मू-काश्मीरमध्ये 24 मे रोजी आणि हिमाचल प्रदेशात 29 मे रोजी गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. पूर्व उत्तर प्रदेशात 28 आणि 29 मे रोजी, तर पश्चिम उत्तर प्रदेशात 29 आणि 30 मे रोजी गारपीट होऊ शकते. या काळात नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ