UP Crime : प्रियकराशी भांडण करून प्रेयसी ट्रकमधून खाली उतरली अन् जीवाला मुकली, वाचा नेमके काय घडले?

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथील रहिवासी असलेल्या 55 ​​वर्षीय मुनीरचे 35 वर्षीय महिलेसोबत संबंध होते. मुनीर उदरनिर्वाहासाठी ट्रक चालवतो. दोघेही सिधी जिल्ह्यातील रामपूर नाईकीन पोलीस स्टेशन हद्दीतील बागवार येथे भाड्याच्या घरात राहत होते.

UP Crime : प्रियकराशी भांडण करून प्रेयसी ट्रकमधून खाली उतरली अन् जीवाला मुकली, वाचा नेमके काय घडले?
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 01, 2022 | 8:06 PM

रीवा : प्रियकराशी भांडण झाल्याने रागात ट्रकमधून खाली उतरलेल्या प्रेयसीला प्रियकरानेच अंगावर ट्रक घालून चिरडल्याची घटना मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यात शुक्रवारी घडली. क्रूरतेने सर्व परिसीमा गाठल्याचे चित्र समोर आले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत महिलेचा मृतदेह पंचनामा करण्यासाठी पाठवला. घटनेनंतर ट्रकचालक असलेला प्रियकर तेथून पळून गेला. मात्र पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे.

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथील रहिवासी असलेल्या 55 ​​वर्षीय मुनीरचे 35 वर्षीय महिलेसोबत संबंध होते. मुनीर उदरनिर्वाहासाठी ट्रक चालवतो. दोघेही सिधी जिल्ह्यातील रामपूर नाईकीन पोलीस स्टेशन हद्दीतील बागवार येथे भाड्याच्या घरात राहत होते. आपल्या प्रेयसीचे सहकारी ट्रक चालकाशी संबंध आहेत, असा मुनीरला संशय होता. यावरून दोघांमध्ये रोज वाद होत होते. दोघांनी सामोपचाराने वेगळे राहण्याचा निर्णय घेतला.

मृतदेहाची विटंबना केली

शुक्रवारी रात्री मुनीर महिलेला ट्रकमधून घरी सोडण्यासाठी जात होता. दरम्यान, दोघांमध्ये पुन्हा वाद सुरू झाला. त्यावेळी गोविंदगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चुहिया डोंगराजवळून ट्रक चालला होता. संतापलेली महिला ट्रकमधून खाली उतरली. यानंतर संतापलेल्या मुनीरने महिलेच्या अंगावर ट्रक घालून तिला चाकाखाळी चिरडले. एवढ्यावर मुनीरचा राग शांत झाला नाही. त्याने वारंवार महिलेच्या मृतदेहावर ट्रक चालवून तिची विटंबना केली.

जीपीएस प्रणालीद्वारे आरोपीचा माग काढला

घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला होता. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस रामपूर नाईकीन येथे पोहोचले असता घरमालकाने प्रियकर आणि प्रेयसीमधील वादाची माहिती दिली. पोलिसांनी ट्रकमालकाशी संपर्क साधला असता त्याने जीपीएस प्रणालीचा माग काढला. अशा प्रकारे पोलिसांनी आरोपीचा माग काढला. गुन्हा केल्यानंतर आरोपी सतना जिल्ह्यातील अमरपाटण येथे सापडला, त्यानंतर पोलिसांच्या पथकाने आरोपी ट्रकचालकाला तेथून अटक केली, असे रीवाचे अतिरिक्त एसपी शिवकुमार वर्मा यांनी सांगितले. (In Uttar Pradesh, a lover killed his girlfriend in a dispute)

इतर बातम्या

Pimpri chinchawd crime | पिंपरीत पाण्याच्या टँकर खाली चिरडल्याने दोन वर्षीय बालकाचा दुदैवी मृत्यू

Drug : मुंबईत तीन कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई, तीन आफ्रिकन नागरिक अटक

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.