AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत-पाकिस्तान भीषण युद्धाच्या उंबरठ्यावर, दोन्ही देशांकडून आता मोठ्या क्षेपणास्त्रांचा वापर

शनिवारी सकाळी चवताळलेल्या पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमधील अनेक ठिकाणी हल्ले करण्याचा प्रयत्न केले. जम्मूसह काही ठिकाणी मोठे आवाज ऐकू आले. श्रीनगर, पठाणकोटमध्ये स्फोटांचे आवाज आले.

भारत-पाकिस्तान भीषण युद्धाच्या उंबरठ्यावर, दोन्ही देशांकडून आता मोठ्या क्षेपणास्त्रांचा वापर
पाकिस्तानने केलेला फतह-II बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा हल्ला भारताने उधळून लावला
| Updated on: May 10, 2025 | 8:04 AM
Share

भारत आणि पाकिस्तान दरम्यान तणाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दोन्ही देशांमध्ये भीषण युद्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आतापर्यंत लहान क्षेपणास्त्रांचा वापर केला जात होता. परंतु आता मोठ्या क्षेपणास्त्रांचा वापर होऊ लागला आहे. भारताकडून पाकिस्तानची क्षेपणास्त्र हवेतच उडवून लावली गेली आहे. पाकिस्ताने शनिवारी फतह-II बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने भारतावर हल्ला केला. परंतु हे क्षेपणास्त्र भारताने हवेतच नष्ट केले. फतह-II या क्षेपणास्त्राचा टप्पा 400 किलोमीटरचा आहे. या क्षेपणास्त्राचे लक्ष्य दिल्ली असल्याचे सांगितले जाते. श्रीनगर आणि पठाणकोट एअरबेसवर स्फोटांचे मोठी आवाज ऐकू आले आहे. यामध्ये काही नुकसान झाल्याचे वृत्त नाही.

शनिवारी सकाळी चवताळलेल्या पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमधील अनेक ठिकाणी हल्ले करण्याचा प्रयत्न केले. जम्मूसह काही ठिकाणी मोठे आवाज ऐकू आले. श्रीनगर, पठाणकोटमध्ये स्फोटांचे आवाज आले. पाकिस्तानी माध्यमांनी एक व्हिडिओ जारी केला आहे. त्यात दावा केला आहे की, सकाळी पाच वाजता पाकिस्तानने भारतावर क्षेपणास्त्र हल्ला केला.

भारताने पाकिस्तानचे तीन एअरबेस उडवले

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या तीन एअरबेसवर भारतावर हल्ला केला. भारताच्या या हल्ल्यात पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. भारताकडूनही हा हल्ला बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या माध्यमातून करण्यात आला. दुसरीकडे शुक्रवारी रात्री पाकिस्तानने पंजाब, राजस्थान आणि जम्मू-कश्मीरसह 26 शहरांवर ड्रोन हल्ले केले. अवंतीपुरा एयरफोर्स स्टेशनवर ड्रोनने हल्ला करण्यात आला. पाकिस्तानच्या या हल्ल्यामुळे भारताने चंडीगढ आणि अंबाला येथेही अलर्ट जारी केला आहे.

पंजाबमधील फिरोजपूर येथील एका परिवाराचे काही सदस्य पाकिस्तानकडून झालेल्या हल्ल्यात जखमी झाले. हल्ल्यात जखमी झाल्याचे हे पहिले प्रकरण आहे. पाकिस्तान नियंत्रण रेषेजवळील गावांमध्ये ब्लॅकआऊट सुरु आहे. संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ताने सांगितले की, आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर 26 ठिकाणी ड्रोन दिसले आहे. त्यात संदिग्ध शस्त्र असणारी ड्रोन आहे. बारामूला, श्रीनगर, अवंतीपोरा, नगरोटा, जम्मू, फिरोजपूर, पठाणकोट, जैसलमेर, बाडमेर, भुज आणि लक्खी नाला या ठिकाणी ड्रोन दिसत आहे.

'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.