AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानी न्यूज चॅनल्सवर भारतात बंदी; शोएब अख्तर-आरजू काझमी यांचे युट्यूब चॅनल्ससुद्धा बंद

भारताविरुद्ध सतत प्रक्षोभक, सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील कंटेट आणि चुकीची माहिती पसरवल्यामुळे अनेक पाकिस्तानी युट्यूब चॅनल्स भारतात ब्लॉक करण्यात आल्याची माहिती गृह मंत्रालयाशी संबंधित एका अधिकाऱ्याने दिली आहे.

पाकिस्तानी न्यूज चॅनल्सवर भारतात बंदी; शोएब अख्तर-आरजू काझमी यांचे युट्यूब चॅनल्ससुद्धा बंद
Shoaib AkhtarImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 28, 2025 | 11:28 AM
Share

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानविरोधात सतत कठोर निर्णय घेतले जात आहेत. आता भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या शिफारशींनंतर पाकिस्तानच्या अनेक युट्यूब चॅनल्सवर बंदी आणण्यात आली आहे. या चॅनल्समध्ये माजी क्रिकेटर शोएब अख्तर आणि आरजू काझमी यांसारख्या मोठमोठ्या युट्यूब चॅनल्सचाही समावेश आहे. त्याचसोबत प्रमुख मीडिया हाऊसच्या युट्यूब चॅनल्सवरही भारतात बंदी घातली आहे. दहशतवाद्यांना उग्रवादी म्हटल्याने बीबीसीला पत्र पाठवलं गेलंय. गृह मंत्रालयाच्या शिफारशींनुसार, भारत सरकारने गेल्या आठवड्यात 22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी घटनेनंतर अनेक पाकिस्तानी युट्यूब चॅनल्सवर बंदी घातली आहे. भारत, भारताचं लष्कर आणि सुरक्षा एजन्सींविरुद्ध प्रक्षोभक आणि सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील कंटेट, खोट्या गोष्टी आणि चुकीची माहिती पसरवल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे.

पाकिस्तानातील ज्या 16 युट्यूब चॅनल्सवर बंदी घालण्यात आली आहे, त्यात शोएब अख्तरचं चॅनल तसंच तिथल्या अनेक प्रमुख मीडिया हाऊसेसचे युट्यूब चॅनल्स यांचा समावेश आहे. डॉन न्यूज, समा टीव्ही, एआरवाय न्यूज, बोल न्यूज, रफ्तार टीव्ही, द पाकिस्तान रेफरन्स, जिओ न्यूज, समा स्पोर्ट्स आणि उजैर क्रिकेट हे त्यात प्रमुख आहेत.

भारत सरकारने बंदी घातलेल्या 16 पाकिस्तानी युट्यूब चॅनल्सचे एकूण 63.08 दशलक्ष म्हणजेच 6.3 कोटींहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत. त्यापैकी जिओ न्यूजच्या युट्यूब चॅनलचे सर्वाधिक 18.9 दशलक्ष म्हणजेच 1.8 कोटी सबस्क्राइबर्स आहेत. त्याचप्रमाणे एआरवाय न्यूजचे सुमारे 14.6 दशलक्ष म्हणजेच 1.4 कोटींहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत. यानंतर समा न्यूजचे सुमारे 12.7 दशलक्ष म्हणजेच 1.2 कोटींहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत.

दरम्यान पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांना उग्रवादी म्हटल्याने भारत सरकारने बीबीसीला पत्र लिहिलं आहे. सरकारने बीबीसीच्या दहशतवाद्यंना उग्रवादी म्हटल्याच्या त्यांच्या रिपोर्टवर औपचारिक पत्र पाठवून उत्तर मागितलं आहे.

22 एप्रिल रोजी पहलगाममधील बैसरन याठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात 26 पर्यटक मारले गेले. एप्रिल आणि मे महिन्यात काश्मीरमध्ये असंख्य पर्यटक फिरायला जातात. याच गोष्टीचा फायदा घेत दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केलं. या घटनेवरून देशभरात संतापाची लाट उसळली आहे.

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत