AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सीमेवर वाढणारी चिनी सैन्याची संख्या चिंतेचा विषय, पण आम्हीही उत्तर देण्यास तयार, सैन्यप्रमुख एमएम नरवणेंचं वक्तव्य

लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यात दीर्घकाळापासून सुरु असलेला वाद लवकरच संपण्याची आशा सैन्यप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी केली आहे. ते म्हणाले की, या महिन्यात दोन्ही देश यावर दीर्घकालीन तोडगा काढू शकतात.

सीमेवर वाढणारी चिनी सैन्याची संख्या चिंतेचा विषय, पण आम्हीही उत्तर देण्यास तयार, सैन्यप्रमुख एमएम नरवणेंचं वक्तव्य
सैन्यप्रमुख मनोज मुकुंद नरवणे
| Edited By: | Updated on: Oct 02, 2021 | 3:18 PM
Share

नवी दिल्ली: लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यात दीर्घकाळापासून सुरु असलेला वाद लवकरच संपण्याची आशा सैन्यप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी केली आहे. ते म्हणाले की, या महिन्यात दोन्ही देश यावर दीर्घकालीन तोडगा काढू शकतात. शनिवारी लेह इथं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, त्याला सैन्यप्रमुखांनी हजेरी लावली. यावेळी ते म्हणाले की, गेल्या 6 महिन्यांपासून भारत-चीन सीमेवरची परिस्थिती अगदी सामान्य आहे. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात दोन्ही देशांमधील चर्चेची 13 वी फेरी होऊ शकते, या बैठकीत डेडलॉक संपवण्याबाबत चर्चा होईल. ( india-china-border-news-army-chief-manoj-mukund-naravane-says-13th-round-of-talks-in-second-week-of-october-and-reach-a-consensus )

सैन्यप्रमुख नरवणे म्हणाले की, सर्व वादग्रस्त मुद्दे एक एक करून सोडवले जात आहेत. जगातील सर्वात मोठा हस्तनिर्मित खादी तिरंगा लेहमध्ये फडकवण्यात आला आहे. याच कार्यक्रमात भाग घेतल्यानंतर सैन्यप्रमुखांनी हे वक्तव्य केलं. ते म्हणाले की, ‘परस्पर संवादाद्वारे हा अडथळा दूर होऊ शकतो यावर माझा नेहमीच विश्वास आहे. मला आशा आहे की, आम्हाला लवकरच हा मुद्दा निकाली काढू.

पूर्व लडाखमध्ये चिनी सैन्य तैनात

पूर्व लडाख आणि आमच्या पूर्व कमांडजवळच्या उत्तर आघाडीवर मोठ्या संख्येने चिनी सैनिक तैनात आहे. या मुद्द्यावर बोलताना सैन्यप्रमुख म्हणाले की, ‘सीमेवर चिनी सैनिकांची वाढती तैनाती ही निश्चितच आमच्यासाठी चिंतेची बाब आहे. आम्ही प्रत्येक हालचालीवर सातत्याने लक्ष ठेऊन आहोत. ” त्यांनी सांगितले की, ‘आम्हीही सीमेवर पायाभूत सुविधा आणि कर्मचारी तैनात करत आहोत, जेणेकरून कोणत्याही प्रकारच्या धोक्याला त्वरित सामोरे जावे लागल्यास, अडचण येऊ नये.

पाकिस्तानकडून घुसखोरी वाढली

सैन्यप्रमुख एमएम नरवणे यांनी पाकिस्तानकडून सीजफायर उल्लंघन होत असल्याचं सांगितलं, ते म्हणाले की, फेब्रुवारी ते जून अखेरपर्यंत पाकिस्तानकडून कोणतेही उल्लंघन झाले नाही. पण त्यानंतर घुसखोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ झाली आहे. गेल्या 10 दिवसात पाकिस्तानकडून दोनदा सीजफायरचं उल्लंघन करण्यात आले आहे. त्यामुळे परिस्थिती पुन्हा एकदा फेब्रुवारी पूर्वीसारखीच होत आहे.

हेही वाचा:

अभ्यासपूर्ण टीकेला मी महत्त्व देतो, पण दुर्दैवाने सध्या चांगले टीकाकार सापडत नाही, पंतप्रधान मोदींकडून मुलाखतीत खंत

PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं नवं मिशन, आता देशातील शहरं कचरामुक्त करण्याचा संकल्प

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.