AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aditya L1 : सूर्य नमस्काराने असा येईल पैसा! जगाला हेवा वाटेल अशी होईल Aditya L1 मुळे कमाई

Aditya L1 : भारताने 400 कोटी रुपयांमध्ये आदित्य L1 चे यशस्वी प्रक्षेपण केले. भारताचे हे मिशन येत्या चार महिन्यात इच्छित स्थळी पोहचले तर भारताचा अंतराळातील दबदबा वाढेल. जे चीन करु शकला नाही, ते भारत करुन दाखवेल. त्याचा भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होईल.

Aditya L1 : सूर्य नमस्काराने असा येईल पैसा! जगाला हेवा वाटेल अशी होईल Aditya L1 मुळे कमाई
| Updated on: Sep 02, 2023 | 2:27 PM
Share

नवी दिल्ली | 2 सप्टेंबर 2023 : भारताचे आदित्य एल-1 (Aditya L1) मोहिमे सूर्याला जवळून नमस्कार करण्यासाठी रवाना झाली आहे. या सूर्ययानाचे यशस्वीपणे प्रक्षेपण झाले. आदित्य एल-1 भारताची पहिली स्पेस ऑब्जर्वेटरी असेल. याठिकाणाहून सूर्यावर लक्ष ठेवण्यात येईल. अमेरिकेच्या सूर्य मोहिमेपेक्षा ही मोहिम अत्यंत स्वस्तात उरकण्यात भारताला यश आले. इस्रोने चंद्रयान-3 (ISRO Chandrayaan-3) प्रमाणेच या सूर्य मोहिमेचा खर्च चीन, अमेरिकेपेक्षा कमी ठेवला आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष या सूर्य मोहिमेने खेचले आहे. सूर्य मिशनच्या बजेटची सध्या जगभरात चर्चा आहे. चीनने नुकतीच सूर्य मोहिम आखली. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च आला. पण भारताच्या आदित्य L1 त्यांच्या तुलनेत केवळ 400 कोटींच्या बजेटमध्ये तयार झाले. हे सूर्ययान त्याच्या प्रवासाला निघाले आहे. मिशन यशस्वी झाल्यावर इस्रोचा जगभर डंका वाजेल. भारतीय अंतराळ अर्थव्यवस्था, चंद्र अर्थव्यवस्था, मिशनसाठी ज्या कंपन्यांनी मेहनत घेतली त्यांना मोठा फायदा मिळेल. भारताच्या अर्थव्यवस्थेला विज्ञानामुळे नवीन आर्थिक धुमारे फुटतील.

असे वेगळे आहे आदित्य L1

भारताचे आदित्य L1 चीनच्या सूर्य मोहिमेपेक्षा वेगळे आहे. चीनने 8 ऑक्टोबर 2022 रोजी नॅशनल स्पेस सायन्स सेंटर येथून कुआफू-1 प्रक्षेपीत केला होता. चीनची मोहिम पृथ्वीपासून 720 किमी अंतरावर आहे तर भारताचा आदित्य L-1 हा पृथ्वीापासून 15 लाख किमी दूर असेल. चीनचे यान ASO-S 859 किलोचे आहे. तर भारताच्या आदित्य L1 चे वजन 400 किलो आहे. चीनचे स्पेसक्राफ्ट पृथ्वीच्याच कक्षेत आहे तर आदित्य L1 पूर्णपणे पृथ्वीच्या कक्षेच्या एकदम बाहेर आणि सूर्याच्या जवळ असेल.

378 कोटींचा आदित्य L1

या मोहिमेसाठी इस्रोने कमी खर्च केला आहे. उड्डाणाचा खर्च वगळता या मोहिमेसाठी 378.53 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. यामध्ये प्रक्षेपणाचा खर्च जोडल्यास ही मोहिम जवळपास 400 कोटींच्या घरात पोहचते. आदित्य एल1 चा L1 लग्रेंज पॉईंट 1 दाखवते. हा पृथ्वी आणि सूर्य यांच्यामधील दोन महत्वपूर्ण केंद्र बिंदू आहे. त्यामुळे सूर्याची माहिती मिळण्यास मदत होईल.

125 दिवसांची यात्रा

सूर्ययान L1 बिंदु च्या जवळपास ‘लग्रेंज पॉईंट’ वर पोहचण्याचा प्रयत्न करेल. त्याठिकाणी पोहचण्यासाठी या यानाला 125 दिवस लागतील. इस्रोने यापूर्वी चंद्रयान-3 हे जगातील सर्वात स्वस्ता मून मिशन तयारच केले नाही तर ते दक्षिण ध्रुवावर उतरुन जागतिक रेकॉर्ड पण नावावर नोंदवला आहे. चंद्रयान-3 साठी 615 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला.

अशी बहरणार अर्थव्यवस्था

भारताच्या चंद्रयान-3 यशानंतर आता मिशन सूर्याकडून मोठ्या अपेक्षा आहे. ही मोहिम यशस्वी झाली तर इतर अनेक देश इस्रोकडे त्यांचे उपग्रह आणि त्यांच्या इतर ग्रहावरील मोहिमांसाठी धाव घेतील. त्यासाठी वाटेल ती किंमत पण मोजायला ते तयार असतील. अंतराळ क्षेत्रात भारताचा दबदबा वाढेल. इस्रोला मोठ्या प्रमाणात कमाईची साधनं उपलब्ध होतील. अनेक मोहिमांचा राबता राहील. त्यातून एक मोठी अर्थव्यवस्था उदयास येईल. भविष्यात दुसऱ्या ग्रहावर मानवी वस्तीच्या दृष्टीने इस्रोकडे मोठा पैसा येईल. त्यातून अनेक उलाढाली होतील.

स्टार्टअप्सला प्रोत्साहन

भारत सध्या तांत्रिक, तंत्रज्ञानावर आधारीत विकासावर भर देत आहे. विज्ञान क्षेत्रात नवनवीन प्रयोगासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. देशात अंतराळ आणि दूरसंचार तंत्रज्ञान क्षेत्रात भरीव कार्य होत आहे. त्याचा फायदा अनेक स्टार्टअप्सला होण्याची शक्यता आहे. तसेच विज्ञान, माहिती तंत्रज्ञान, अंतराळ यांच्याशी संबंधित अनेक स्टार्टअप्स सुरु करण्यासाठी सध्या सर्वाधिक संधी उपलब्ध आहेत.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.