AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jaishankar On Tariff Row : दादागिरी करणाऱ्या ट्रम्पना जयशंकर यांचं सडेतोड प्रत्युत्तर, ‘आम्हाला आमची ताकद माहितीय, ट्रम्प यांची…’

Jaishankar On Tariff Row : सध्या अमेरिकेसोबतच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. त्यावर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर पहिल्यांदाच इतक्या मोकळेपणाने बोलले आहेत. दादागिरी करणाऱ्या ट्रम्पना समजेल अशा भाषेत सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. भारत-अमेरिका ट्रेड डील बद्दलही त्यांनी महत्त्वाची माहिती दिलीय.

Jaishankar On Tariff Row : दादागिरी करणाऱ्या ट्रम्पना जयशंकर यांचं सडेतोड प्रत्युत्तर, 'आम्हाला आमची ताकद माहितीय, ट्रम्प यांची...'
s jaishankar-donald trump
| Updated on: Aug 23, 2025 | 2:20 PM
Share

भारत-पाकिस्तान सीजफायर आणि टॅरिफ वॉर नंतर नवी दिल्ली- वॉशिंग्टनमध्ये अंतर वाढत चाललं आहे. आतापर्यंत अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावण्याबद्दल बरीच वक्तव्य केली आहेत. मागच्याच आठवड्यात त्यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय जाहीर केला. आता अमेरिकेसोबतच्या संबंधांवर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर मोकळेपणाने बोलले आहेत. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर बोलले की, “ऑपरेशन सिंदूरवेळी अमेरिकसोबत चर्चा झाली होती. त्या सोबतच अन्य देशांसोबतही चर्चा झालेली. युद्ध काळात अन्य देशांबरोबर जसं बोलणं होतं, तसं ते अमेरिकेसोबतही झालं”

“अमेरिकेसोबत आम्ही बऱ्याच पर्यायांवर चर्चा करत आहोत. आतापर्यंत असा एकही अमेरिकी राष्ट्रपती नव्हता, ज्याने विद्यमान राष्ट्राध्यक्षांइतक परराष्ट्र धोरण सार्वजनिक रित्या मांडलं असेल. हा एक बदल आहे, त्याचे परिणाम फक्त भारतापुरतेच मर्यादीत नाहीत, तर जगातील अन्य देश, ट्रम्प यांची स्वत:च्या देशात सुद्धा व्यवहार करण्याची पद्धत वेगळी आहे” असं जयशंकर म्हणाले.

कोणीही असं म्हटलेलं नाही, की चर्चा बंद झालीय

“भारत-अमेरिकेमध्ये ट्रेड डीलवर चर्चा अजूनही सुरु आहे. पण मूळ विषय हा आहे की, आमच्यासमोर काही रेड लाईन्स आहेत. चर्चा अशा स्तरावर आहे की, कोणीही असं म्हटलेलं नाही, की चर्चा बंद झालीय. लोक परस्परांसोबत बोलतात” असं जयशंकर म्हणाले.

भारतासमोरची रेड लाइन काय?

रेड लाइनबद्दल बोलताना जयशंकर म्हणाले की, “रेड लाइन आमचे शेतकरी आणि काही प्रमाणात आमच्या उत्पादकाच्या हिताची आहेत. आम्ही एक सरकार म्हणून आमचे शेतकरी आणि छोट्या उत्पादकांच्या हितासाठी कटिबद्ध आहोत. आम्ही त्यावर ठाम आहोत”

आम्हाला आमची ताकद माहित आहे

पाकिस्तान-अमेरिका संबंधांवर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले की, “त्यांच्यात मैत्रीचा इतिहास आहे. पाकिस्तान आपल्या सोयीनुसार राजकारण करतो. आम्हाला आमची ताकद आणि आमची नाती माहित आहेत. ऑपरेशन सिंदूरवेळी अमेरिकेसह अनेक देशांचे फोन आले होते. आंतरराष्ट्रीय संबंधात असच होतं”

अमेरिकेला पण तशीच किंमत चुकवावी लागेल

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे. भारतावर 25 टक्के टॅरिफ अमेरिकन धोरणाचा भाग म्हणून लावलाय तर उर्वरित 25 टक्के टॅरिफ रशियाकडून तेल खरेदीसाठी लावलाय. ट्रम्प यांच्या या निर्णयांबद्दल भारतीयांच्या मनात संतापाची भावना आहे. पण भारताने अजूनपर्यंत संयम बाळगला आहे. अमेरिकेसारखे उत्तराला प्रत्युत्तर देण्याची भूमिका घेतलेली नाही. भारताने उद्या एखादा निर्णय घेतला, तर अमेरिकेला सुद्धा त्याची तशीच किंमत चुकवावी लागेल.

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.