AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Cases in India | एका दिवसात चार लाखाहून अधिक नवे कोरोनाग्रस्त, तब्बल 4092 कोरोनाबळी

देशभरात कालच्या दिवसात तब्बल 4 हजार 92 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागल्याची वाईट बातमी आहे (India COVID19 cases 24 hours)

Corona Cases in India | एका दिवसात चार लाखाहून अधिक नवे कोरोनाग्रस्त, तब्बल 4092 कोरोनाबळी
corona
| Updated on: May 09, 2021 | 9:57 AM
Share

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ (Corona Cases in India) सुरुच आहे. गेल्या 24 तासात पुन्हा एकदा कोरोनाचे चार लाखांहून अधिक नवीन रुग्ण सापडले आहेत. कालच्या दिवसात 4 लाख 3 हजार 738 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर तब्बल 4 हजार 92 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. एका दिवसातील सर्वाधिक कोरोनाबळींचा हा विक्रम मानला जात आहे (India reports 403738 new COVID19 cases in the last 24 hours)

24 तासातील आकडेवारी

गेले काही दिवस 24 तासातील कोरोना रुग्णसंख्या सातत्याने चार लाखांचा टप्पा ओलांडताना दिसत आहे. गेल्या 24 तासात भारतात 4 लाख 3 हजार 738 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 92 रुग्णांना प्राण गमवावे लागले. दिलासादायक बाब ही, की कालच्या दिवसात देशात 3 लाख 86 हजार 444 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. ही संख्या आदल्या दिवसापेक्षा अधिक आहे.

आतापर्यंतची आकडेवारी

आतापर्यंत देशात 1 कोटी  83 लाख 17 हजार 404 रुग्ण बरे झाले आहेत. भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 22 लाख 96 हजार 414 वर गेला आहे. आतापर्यंत 2 लाख 42 हजार 362 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 37 लाख 36 हजार 648 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 16 कोटी 94 लाख 39 हजार 663 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण –4,03,738

देशात 24 तासात मृत्यू – 4,092

देशात 24 तासात डिस्चार्ज – 3,86,444

एकूण रुग्ण – 2,22,96,414

एकूण मृत्यू – 2,42,362

एकूण डिस्चार्ज – 1,83,17,404

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 37,36,648

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 16,94,39,663

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती (India COVID19 cases 24 hours)

संबंधित बातम्या :

नियम डावलून कोरोनाबाधिताच्या मृतदेहाचे दफन, त्यानंतर 21 जणांचा मृत्यू; ‘या’ गावाची झोप उडाली

रुग्ण कमी होत आहे म्हणून सुखावून जाऊ नका, तिसरी लाट दारावर, मास्टर प्लान करा: नितीन राऊत

(India reports 403738 new COVID19 cases in the last 24 hours)

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.