अंतराळ क्षेत्रात भारताची मोठी झेप, INSPACE चे अध्यक्ष पवन कुमार गोयंका यांनी सर्व सांगितलं…
भारताचे स्पेश स्टेशन लवकरच अंतराळात जाईल अशी घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली होती. आता INSPACE चे अध्यक्ष पवन कुमार गोयंका यांनी अंतराळ संशोधन संस्थेच्या कामगिरीचे कौतूक केले आहे.

भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे कौतूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्ली येथे श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्सच्या शताब्दी सोहळ्यात बोलताना केले होते. भारताचे स्पेश स्टेशन लवकरच अंतराळात जाईल अशी घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली होती. आता INSPACE चे अध्यक्ष पवन कुमार गोयंका यांनी अंतराळ संशोधन संस्थेच्या कामगिरीचे कौतूक केले आहे.
येथे पोस्ट वाचा –
Five years ago, when India opened up its space sector, we had two clear objectives: enable ISRO to conquer new frontiers and empower our private industry to scale up.
Today, we are seeing both take shape.
EOS-05 is a major achievement by ISRO, and this is just the beginning.…
— Pawan K Goenka (@GoenkaPk) September 6, 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना साल २०४७ भारत हा आत्मनिर्भर होऊन विकसित राष्ट्र होणार यात मला किंचितही शंका नाही असे म्हटले होते. भारताचे स्पेश स्टेशन अंतराळात लवकरच झेपावले असेही त्यांनी म्हटले होते. आज भारत ‘मेक इन इंडिया’ मोहिमेंतर्गत अनेक उत्पादनांची निर्मिती करुन ती निर्यात करत आहे. त्यानंतर आज INSPACE चे अध्यक्ष पवन कुमार गोयंका यांनी आज एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की पाच वर्षांपूर्वी, जेव्हा भारताने आपले अंतराळ क्षेत्र खुले केले, तेव्हा आमची दोन स्पष्ट उद्दिष्टे होती. इस्रोला (ISRO) नवीन क्षितिजे सर करण्यास सक्षम करणे आणि आमच्या खाजगी उद्योगांना त्यांची व्याप्ती वाढवण्यासाठी सशक्त करणे असे गोयंका यांनी म्हटले आहे.
आज आपण ही दोन्ही उद्दिष्टे गोष्टी प्रत्यक्षात उतरताना पाहत आहोत. EOS-05 हे इस्रोचे एक मोठे यश आहे आणि ही तर केवळ सुरुवात आहे. तसेच, पाच वर्षांपूर्वी हाताच्या बोटावर मोजण्याइतपत असलेली अंतराळ क्षेत्रातील स्टार्टअप्सची संख्या आज ४५० च्या वर पोहोचली आहे. भारताचे खाजगी उद्योगाने तयार केलेले रॉकेट अंतराळ कक्षेत पाठवून भारत आता अंतराळ क्षेत्रात खाजगी सहभागाच्या मदतीने अनेक मोहिमा राबवण्यास सक्षम झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
