AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“युद्धासाठी तयार राहा, लवकरच…”, कारगिल विजय दिनी संरक्षणमंत्र्यांचा थेट पाकिस्तानला इशारा

Kargil Vijay Diwas 2023: कारगिल विजय दिवसाचं औचित्य साधत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी थेट पाकिस्तानला इशारा दिला आहे. लवकरच नियंत्रण रेषा पार केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

युद्धासाठी तयार राहा, लवकरच..., कारगिल विजय दिनी संरक्षणमंत्र्यांचा थेट पाकिस्तानला इशारा
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला भरला दम, "नियंत्रण रेखा लवकरच..."
| Updated on: Jul 26, 2023 | 4:51 PM
Share

मुंबई : कारगिल विजय दिवसाचं औचित्य साधत देशभरात वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही वीर जवानांच्या आठवणींना उजाला दिला आणि त्यांना नमन केलं. यावेळी त्यांच्यासोबत चीफ ऑफ डिफेंस स्टाफ जनरल अनिल चौहान यांच्यासह तिन्ही दलाचे प्रमुख उपस्थित होते. “1999 मध्ये कारगिल युद्धात देशाच्या सैनिकांनी वीरतेचं प्रदर्शन केलं, शौर्य दाखवलं. हा इतिहास कायम सुवर्ण अक्षरात अधोरेखित असेल. मी त्या वीर जवानांना सलाम करतो आणि त्यांना श्रद्धांजली वाहतो. “, असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं आणि पाकव्याप्त काश्मीरबाबत भाष्य केलं. गरज पडल्यास आम्ही नियंत्रण रेषा पार करू शकतो असंही त्यांनी सांगितलं.

काय म्हणाले संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

कारगिल युद्धात वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं की, “त्या वेळेस आम्ही नियंत्रण रेषा पार केली नाही. याचा अर्थ असा नाही की आम्ही एलओसी पार करू शकत नव्हतो. आम्ही एलओसी पार करू शकत होतो, पार करू शकतो आणि भविष्यात गरज पडली तर एलओसी पार करणार. मी देशातील नागरिकांना याबाबत विश्वास देऊ इच्छितो.”

तुम्हीही युद्धासाठी सज्ज राहा

“सध्या युद्धाचा कालावधी लांबत आहे. त्यामुळे भविष्यात देशातील नागरिकांना थेट युद्धात सहभागी होण्यासाठी सज्ज झालं पाहीजे. जनतेनं मानसिकरित्या यासाठी सक्षम होणं गरजेचं आहे. देशाला याची गरज असून सैनिकांच्या मदतीसाठी सज्ज राहणं आवश्यक आहे.”, असंही त्यांनी पुढे सांगितलं.

पाकिस्तानने केली होती दगाबाजी

‘कारगिल युद्ध भारतावर लादलं गेलं होतं. भारत पाकिस्तानसोबत चर्चेनं प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा त्यांनी पाठीत खंजीर खुपसलं. ऑपरेशन विजयच्या दरम्यान भारतीय सेनेने फक्त पाकिस्तानलाच नाही तर जगाला संदेश दिला. जेव्हा आमच्या देशहिताची बाब समोर येईल तेव्हा आमची सेना मागे हटणार नाही.’

Follow Us
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून...
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून नेमकं काय म्हणाल्या?
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा, नेमकं काय म्हणाले?
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत..
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत केला गंभीर आरोप
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे...
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे आक्रमक
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
पुन्हा महिला आयोगाचं अध्यक्षपद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट म्हणाल्या, सहा महिने...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन