AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताचा पाकिस्तानला दुहेरी दणका, ‘त्या’ एका फोनमुळे उडाली पाकची झोप

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं सिंधू नदी जल वाटप करार स्थगित करून पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यानंतर भारतानं आता आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानची झोप उडाली आहे.

भारताचा पाकिस्तानला दुहेरी दणका, 'त्या' एका फोनमुळे उडाली पाकची झोप
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 16, 2025 | 7:54 PM
Share

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं सिंधू नदी जल वाटप करार स्थगित करून पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या आहेत. मात्र भारत आता पाकिस्तानला आणखी एक मोठा धक्का देण्याच्या तयारीमध्ये आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि अफगानिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर मुत्ताकी यांचं गुरुवारी फोनवर बोलणं झालं. मात्र या फोनमुळे आता पाकिस्तानची झोप उडाली आहे. त्याला कारण देखील तसंच आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जयशंकर आणि मुत्ताकी यांनी भारताच्या मदतीनं अफगाणिस्तामध्ये सुरू असलेले प्रकल्प पुढे नेण्यास सहमती दर्शविली आहे. या विकास प्रकल्पांमध्ये काबूल नदीवर बांधण्यात येणाऱ्या शहतूत धरण प्रकल्पाचा देखील समावेश आहे. 2021 लाच या संदर्भात भारत आणि अफगाणिस्तानमध्ये एक करार झाला होता, मात्र अफगाणिस्तानमध्ये झालेल्या सत्ताबदलानंतर या कराराला ब्रेक लागला होता.

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पुन्हा एकदा आता या करारावर चर्चा सुरू झाली आहे.काबूल नदीवर हे धरण बांधण्यात येणार आहे, या प्रकल्पासाठी भारत अफगाणिस्तानला 236 मिलियन डॉलर रुपयांची मदत करणार आहे, तसेच तांत्रिक मदत देखील पुरवणार आहे. तीन वर्षांमध्ये हा प्रकल्प पूर्ण होण्याचा अंदाज आहे. या प्रकल्पामुळे काबूल आणि परिसरात राहणाऱ्या तब्बल 20 लाख लोकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळणार आहे, तसेच अफगाणिस्तानची तब्बल चार हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे, मात्र हे धरण अफगाणिस्तामध्ये झालं तर दुसरीकडे पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतामध्ये दुष्काळ पडू शकतो. खैबर पख्तूनख्वामध्ये जाणारं सर्व पाणी या धरणामुळे अडवलं जाणार आहे.

तर दुसरीकडे भारतानं सिंधू पाणी वाटप करार स्थगित केल्यामुळे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये दुष्काळ पडण्याची शक्यता आहे. पाकिस्तानमधील सुमारे 80 टक्के शेती ही सिंधू नदीच्या पाण्यावर अंवलंबू आहे. अशा पद्धतीने आता भारत पाकिस्तानची दुहेरी कोंडी करू शकतो. सिंधू  पाणी वाटप करार स्थगिताचा पुनर्विचार करावा यासाठी पाकिस्तानकडून भारताला एक पत्र देखील पाठवण्यात आलं आहे. करार स्थगिताचा पुनर्विचार करावा अशी विनंती करण्यात आली आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...