शत्रूचे रणगाडे उद्ध्वस्त करणारे भारतीय सैन्याचे तोफगोळे चोरीला जातात असं ‘हे’ शहर, काय आहेत कारणं?

चोरांनी सर्वात कडेकोट सुरक्षा असलेल्या भारतीय सैन्याच्या छावणीतून साधीसुधी वस्तू नाही, तर थेट शत्रूचे शक्तीशाली रणगाडे जमिनदोस्त करणारे तोफगोळे (बॉम्ब) चोरल्याचा प्रकार समोर आलाय.

शत्रूचे रणगाडे उद्ध्वस्त करणारे भारतीय सैन्याचे तोफगोळे चोरीला जातात असं 'हे' शहर, काय आहेत कारणं?
Follow us
| Updated on: Apr 11, 2021 | 6:46 PM

भोपाळ : चोरी करणारे अट्टल जोर कधी कुठे आपला हात साफ करतील याचा काही नेम नाही. नुकत्याच समोर आलेल्या घटनेवरुन हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. चोरांनी सर्वात कडेकोट सुरक्षा असलेल्या भारतीय सैन्याच्या छावणीतून साधीसुधी वस्तू नाही, तर थेट शत्रूचे शक्तीशाली रणगाडे जमिनदोस्त करणारे तोफगोळे (बॉम्ब) चोरल्याचा प्रकार समोर आलाय. ही घटना मध्य प्रदेशमधील जबलपूर जिल्ह्यातील सैन्याच्या लाँग प्रूफ रेंजमध्ये घडली. या घटनेनंतर सैन्यासह जबलपूर जिल्हा पोलीस प्रशासनही खडबडून जागं झालंय. चोरांची नजर थेट सैन्याच्या युद्ध सामग्रीवर पडल्याने यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. तसेच या चोरीमागील मास्टरमाईंड कोण याचा शोध घेतला जात आहे. विशेष म्हणजे सुरुवातील ही चौकशी केवळ सैन्याच्या अंतर्गत विभागात सुरु होती, मात्र कोणताही पुरावा न मिळाल्याने हे प्रकरण पोलीस तक्रारीपर्यंत पोहचलंय (Indian Army bombs are stolen from a city of MP investigation ongoing).

साधीसुधी वस्तू नाही तर शत्रूला धडकी भरवणारे तोफगोळेच चोरीला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना यावर्षीचीच आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये जबलपूर जिल्ह्यातील सैन्याच्या छावणीतून रणगाडे उद्ध्वस्त करणारे शक्तीशाली तोफगोळे चोरी केल्याची घटना घडली. याबाबत सैन्यातील अधिकाऱ्यांना माहिती मिळाल्यानंतर सुरुवातील सैन्याने अंतर्गत चौकशी केली. मात्र, या चोरीबाबत त्यांच्या हातात ठोस काही माहिती लागली नाही. साधीसुधी वस्तू नाही तर शत्रूला धडकी भरवणारा रणगाडा उद्ध्वस्त करणारे तोफगोळेच चोरी केल्यानं सैन्यातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आणि नाईलाजाने हे प्रकरण जबलपूर पोलिसांकडे आलं. सैन्याने तक्रार केल्यानंतर पोलीस यंत्रणांनी आपली तपासाची चक्रं फिरवली.

तोफगोळे चोरी प्रकरणी भंगार विक्रेत्याला बेड्या

जबलपूरचे पोलीस अधिक्षक संजय अग्रवाल यांनी या घटनेला दुजोरा दिलाय. ते म्हणाले, “पोलिसांना 24 फेब्रुवारी 2021 रोजी या घटनेबाबत तक्रार मिळाली. त्यानंतर लगेचच तपासाला सुरुवात करण्यात आली. आता या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आलंय. आरोपी एक भंगार विक्रेता आहे. सैन्याच्या लांग प्रूफ रेंजमधील तक्रारीनुसार 3 तोफगोळे चोरीला गेले आहेत. ज्या ठिकाणाहून तोफगोळे चोरीला गेलेत त्याच ठिकाणी सारंग आणि धनुषसारख्या शक्तीशाळी तोफांचीही चाचणी होते.”

तोफगोळ्यांतून टंगस्टन पेनिट्रेटर काढून भंगाराच्या भावात विकलं

जबलपूर पोलिसांनी सांगितलं, “तोफगोळे चोरीला गेले त्या ठिकाणी सैन्याचा 24 तास पहारा असतो. पोलीस तपासात हे तोफगोळे खिडकीचे ग्रिल कापून चोरी करण्यात आल्याचं स्पष्ट झालंय. नंतर या तोफगोळ्यांमधील टंगस्टन पेनिट्रेटर नावाचं उपकरण चोरांनी काढलं आणि भंगाराच्या भावात विकलं. जबलपूरचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक संजय अग्रवाल म्हणाले, “तोफगोळ्यातून ज्या सराईतपणे टंगस्टन पेनिट्रेटर काढण्यात आले त्यावरुन हे काम कुणी सामान्य माणसाने केलेलं वाटत नाही. हे काम करणारा खूप प्रशिक्षित असावा.” पोलिसांनी पकडण्यात आलेल्या आरोपीची ओळख सांगण्यास नकार दिला.

चोरीमागील गँगचा पर्दाफाश आवश्यक

“अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव सांगितल्यास त्याच्या टोळीतील इतर आरोपी फरार होऊ शकतात. त्यामुळे या चोरीमागील गँगचा शोध लावणं कठीण होईल. या गँगचा पर्दाफाश करणं आवश्यक आहे. यात सैन्यातील कुणी व्यक्तीही यात सहभागी आहे का याचाही तपास केला जात आहे,” अशीही माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा :

धूमसते काश्मीर, 72 तासात 12 दहशतवाद्यांना कंठस्नान, वाचा 4 ऑपरेशन्सची माहिती सविस्तर

TV9 Exclusive : सैन्य भरती घोटाळ्याप्रकरणी सीबीआयकडून FIR दाखल, कर्नलपासून कुणाकुणाची गुपितं उघड होणार?

गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या कर्नल संतोष बाबू यांना मरणोत्तर महावीर चक्र

व्हिडीओ पाहा :

Indian Army bombs are stolen from a city of MP investigation ongoing

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.