ऑपरेशन सिंदूरमध्ये वापरलेल्या तोफेचं नवीन व्हर्जन आलं, आता शत्रुवर होणार आणखी घातक प्रहार
Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरमध्ये वापरलेल्या तोफेचं आता आणखी एक व्हर्जन आलं आहे. ही तोफ अजून घातक बनली आहे. शत्रूवर अजून खोलवर, घातक प्रहार होईल.

भारतीय सैन्याच्या महत्वपूर्ण 155mm शारंग आर्टिलरी तोफेला पूर्णपणे युद्धासाठी तयार करण्यात आलय. 506 आर्मी बेस वर्कशॉपच्या टीमने पूर्णपणे स्वदेशी टेक्निकने ही तोफ तयार केली आहे. तोफेचं पूर्णपणे ओव्हरहॉल नवनीकरण करण्यात आलं आहे. या तोफेची ताकद, विश्वास आणि युद्धातील उपलब्धता वाढली आहे. तोफेची टेक्निकल तपासणी करुन त्याच्या मुख्य भागांच नवीनीकरण आणि दुरुस्ती करण्यात आली आहे. गन बॅरल (तोफेची नळी), रिकॉइल मॅकेनिज्म (मागे बसणारे झटके नियंत्रित करणारा भाग) फायर कंट्रोलशी संबंधित भाग (गोळा अचूकतेने जाणारा भाग). या प्रक्रियेमुळे तोफेचं आयुष्य वाढलं आहे. दीर्घकाळापर्यंत तोफगोळा माऱ्याची अचूकता आणि मजबुती कायम राहिलं.
शारंग तोफ जुन्या बोफोर्स तोफेचं अपग्रेडेड व्हर्जन आहे. याची खासियत काय?
155mm कॅलिबरची तोफ
रेंज : 35 किलोमीटरपेक्षा जास्त.
वेगवान आणि अचूक हल्ला करण्याची क्षमता.
हाय-एक्सप्लोसिव आणि खास गोळे डागण्याची क्षमता.
शत्रुवर खोलवर आणि घातक प्रभाव टाकू शकतात.
सामान्य मैदानी भाग आणि उंचावरील युद्ध क्षेत्रात लढण्यासाठी सुद्धा प्रभावी.
ही तोफ भारतीय सैन्याच्या आर्टिलरीमध्ये खूप महत्वपूर्ण आहे. कारण याची अचूकता आणि मजबुती सिद्ध झाली आहे.
मे 2025 मध्ये ऑपरेशन सिंदूरच्यावेळी शारंग तोफेचा वापर झाला होता. दूरवर अचूक हल्ला करण्याची क्षमता या तोफेने दाखवून दिली. या ऑपरेशनमधून मिळालेल्या अनुभवाचा फायदा आता देखभाल आणि अपग्रेडसाठी केला जातोय. ही तोफ अजून घातक झालीय.
तांत्रिक कौशल्य आणि मेहनत दिसून येते
506 आर्मी बेस वर्कशॉपच्या जवानांचं आणि अधिकाऱ्यांचं तांत्रिक कौशल्य आणि मेहनत दिसून येते. महत्वाचं म्हणजे हे सगळं काम भारतातच झालं आहे. कुठल्याही दुसऱ्या कंपनीच्या मदतीशिवाय.
आत्मनिर्भरतेच्या दिशेने महत्वाचं पाऊल
या तोफेमुळे सैन्याची तयारी अधिक मजबूत झालीय. तोफेचं आयुष्य वाढलं आहे. परदेशी कंपन्यांवर अवलंबित्व कमी झालय. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या दिशेने महत्वाचं पाऊल आहे. सैन्याच्या सूत्रांनी सांगितलं की, असे स्वदेशी प्रयत्न पुढे सुद्धा सुरु राहतील. त्यामुळे नेहमीच आपली आर्टिलरी तयार आणि बलशाली राहिलं.
