जगातील सर्वात मोठ्या क्षमतेची ऑईल रिग ओएनजीसीकडे सुपुर्द

मेघा इंजीनियरिंग अँड इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेड (MEIL ) ने स्वदेशी अत्याधूनिक तंत्रज्ञानावर आधारीत ऑईल (Oil) ड्रिलिंग रिग नुकतीच आंध्रप्रदेशातील भीमावरम येथे ओएनजीसीकडे सुपुर्द केली.

जगातील सर्वात मोठ्या क्षमतेची ऑईल रिग ओएनजीसीकडे सुपुर्द
Follow us
| Updated on: Mar 09, 2022 | 2:13 PM

आंध्रप्रदेश: गोदावरी जिल्ह्याच्या पश्चिम आणि पुर्व भागातील ओएनजीसीच्या (ONGC) मार्फत तेलासाठी विहीरी खणल्या जात आहेत. सध्याच्या काळात महागलेल्या इंधनदराच्या काळात तर भारतीय भूमीत तेल मिळवण आणि त्याचे उत्पादन वाढवणे हे दोन्ही गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. मेघा इंजीनियरिंग अँड इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेड (MEIL ) ने स्वदेशी अत्याधूनिक तंत्रज्ञानावर आधारीत ऑईल (Oil) ड्रिलिंग रिग नुकतीच आंध्रप्रदेशातील भीमावरम येथे ओएनजीसीकडे सुपुर्द केली. ह्या नवीन ड्रिलिंग रिग मूळे ऑइल आणि गॅसचे उत्पादनाचा वेग तर वाढतोच शिवाय अधिक सुरक्षित प्रणाली असल्याने खर्चात देखिल बचत होते. महत्वाचे म्हणजे या प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप अत्यंत मर्यादित असल्याने वैयक्तिक सुरक्षिततेला प्राधान्य मिळते.

जगात सर्वात मोठ्या क्षमतेची म्हणजेच २००० एचपी क्षमतेची ही ड्रिलीग रिंग जमीनीवरच्या तेल विहीरीसाठी उत्खनन करणार आहे. आता पर्यत MEIL ने १० रीगचा पुरवठा ओएनजीसीला केला आहे. त्यातील तीन कार्यान्वीत सुध्दा झाल्यात तर इतर ७ रीग पुढच्या ४ ते ५ आठवड्यात ओएनजीसीच्या वेगवेगळ्या उत्पादन क्षेत्रात कार्यरत होतील. विविध क्षमतेच्या एकूण ४७ रीग्ज MEIL ओएनजीसीला पुरवणार आहे. कोव्हीड काळात देखील या रीग्जचा पुरवठा शक्य तेवढ्या लवकर करण्यात आला. के. सत्य नारायण, MEIL चे तांत्रिक विभागाचे प्रमुख यांनी सांगतीले की मेक इन इंडिया” आणि “आत्मनिर्भर भारत” उपक्रमांतर्गत स्वदेशी तंत्रज्ञानासह उत्तम कार्यक्षमतेच्या तेल ड्रिलिंग रिग्स तयार करणारी MEIL ही भारतातील पहिली खाजगी कंपनी आहे. ऊर्जेच्या किमती जसजशा वाढत जातात, तसतस आपल्या सर्वाना कळतय की प्रगत रिग भारतीय ऊर्जा क्षेत्रासाठी कीती महत्त्वपूर्ण असतात”

ONGC

ONGC

  1. MEIL ने ओएनजीसीला पुरवलेल्या जगातील सर्वोच्च क्षमतेच्या रिंगची वैशिष्ठ्ये
  2.  C4R1 ही 2,000-HP क्षमतेची प्रगत रिग – MEIL चे ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत उत्पादन
  3.  स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित आणि तयार केली गेली.
  4.  ही रिग स्वयंचलित हायड्रॉलिक प्रणालीवर काम करते.
  5. एकच अभियंता संपूर्ण रिग ऑपरेट करू शकतो.
  6.  देखभाल खर्च मोठ्या प्रमाणात कमी होतो
  7. रिग खूप वेगाने विहिरी ड्रिल करते
  8.  जमीनीत 6,000 मीटर(6 किमी) खालपर्यत खणू शकते.
  9.  रिगचे भाग वेगळे करून दुसरीकडे परत रिग उभारते येते
  10.  उच्च दाब आणि उच्च तापमानात रिग ड्रिल करते.
  11.  संपूर्ण रिग अमेरिकन पेट्रोलियम इन्स्टिट्यूट (API) मानकांशी सुसंगत
  12. उच्च सुरक्षा वैशिष्ट्य असणारी रिंग

संबंधित बातम्या :

या आठवड्यात जनतेवर फुटणार दरवाढीचा बॉम्ब, पेट्रोल-डिझेलच्या किंमती 15 रुपयांनी वाढण्याची शक्यता

म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचा काय आहे पर्याय? SIP की एक रक्कमी गुंतवणूक फायद्याची

Fuel : कच्च्या तेलाचा आगडोंब, भाव 130 डॉलरच्या उंबरठ्यावर! पेट्रोल सव्वाशेपार जाणार?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.