AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेल्वे प्रवाशांना झटका, तिकीट कॅन्सल केल्यास खिशाला बसणार मोठा फटका; किती पैसे कापले जाणार?

भारतीय रेल्वेने १ एप्रिल २०२६ पासून तिकीट रद्द करण्याच्या नियमांत बदल केले आहेत. आता ८ तास आधी तिकीट रद्द केल्यास परतावा मिळणार नाही, तर डिजिटल बोर्डिंग स्टेशन बदलण्याची सुविधा उपलब्ध होईल.

रेल्वे प्रवाशांना झटका, तिकीट कॅन्सल केल्यास खिशाला बसणार मोठा फटका; किती पैसे कापले जाणार?
indian railways
| Updated on: Mar 31, 2026 | 9:02 AM
Share

भारतीय रेल्वेने प्रवासी सेवा अधिक वेगवान आणि पारदर्शक करण्यासाठी तिकीट आरक्षण आणि परतावा नियमावलीमध्ये ऐतिहासिक बदल केले आहेत. येत्या १ एप्रिल २०२६ पासून नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे प्रवासाचे नियोजन अधिक शिस्तबद्ध करण्यासाठी आणि तिकीट काळाबाजाराला आळा घालण्यासाठी प्रशासनाने तिकीट रद्द करण्याच्या वेळेत आणि कपातीच्या दरात मोठे बदल केले आहेत. या नवीन नियमांमुळे प्रवाशांना काही प्रमाणात आर्थिक फटका बसणार असला, तरी प्रवासादरम्यान मिळणाऱ्या सुविधांमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे.

नवीन नियम काय?

भारतीय रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेने तिकीट रद्द करण्याच्या वेळेनुसार परतावा कपातीचे नवे निकष ठरवले आहेत. या बदलांमुळे शेवटच्या क्षणी तिकीट रद्द करणाऱ्या प्रवाशांना मोठा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. जर एखादा प्रवासी गाडी सुटण्याच्या ८ तास आधी तिकीट रद्द करत असेल, तर त्याला तिकिटाचा एकही रुपया परत मिळणार नाही. यापूर्वी ही मर्यादा ४ तासांची होती, ती आता वाढवण्यात आली आहे.

गाडी सुटण्यापूर्वी ८ ते २४ तासांच्या दरम्यान तिकीट रद्द केल्यास एकूण भाड्याच्या ५० टक्के रक्कम प्रशासनाकडून कापली जाईल. यानंतर २४ ते ७२ तास आधी आरक्षण रद्द केल्यास २५ टक्के रक्कम कपात केली जाईल. तसेच ७२ तासांच्या आधी तिकीट रद्द केल्यास केवळ नियमानुसार किमान लिपिकीय शुल्क (Clerkage Charges) आकारले जाईल.

प्रवासादरम्यान आपले सीट अपग्रेड करता येणार

त्यासोबतच प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने तांत्रिक सुधारणा केली आहे. आता प्रवासी आपले बोर्डिंग स्टेशन (प्रवास सुरू करण्याचे ठिकाण) गाडी सुटण्याच्या ३० मिनिटे आधीपर्यंत ऑनलाइन पद्धतीने बदलू शकणार आहेत. या सुविधेमुळे प्रवाशांना शेवटच्या क्षणी दुसऱ्या स्टेशनवरून गाडी पकडणे शक्य होईल. जर ट्रेनमध्ये वरच्या वर्गातील (उदा. स्लीपरमधून थ्री-टायर एसी किंवा टू-टायर एसी) जागा रिकाम्या राहिल्या असतील, तर प्रवाशांना आता प्रवासादरम्यान आपले सीट अपग्रेड करण्याची संधी मिळेल. यासाठी टीटीई (TTE) कडे जाऊन किंवा रेल्वेच्या अधिकृत ॲपवरून अतिरिक्त शुल्क भरून ही सुविधा घेता येईल.

नो रिफंडची मर्यादा वाढवली

ग्रामीण आणि शहरी भागातील प्रवाशांना मोठा दिलासा देत रेल्वेने ‘युनिव्हर्सल कॅन्सलेशन’ सुविधा सुरू केली आहे. आता प्रवासी आपले खिडकीवरून काढलेले तिकीट (Counter Ticket) देशातील कोणत्याही रेल्वे स्टेशनवरून रद्द करू शकतात आणि तिथूनच आपला परतावा मिळवू शकतात. यापूर्वी तिकीट काढलेल्या किंवा बोर्डिंग स्टेशनवरूनच तिकीट रद्द करावे लागत असे.

रेल्वे प्रशासनाच्या मते, या बदलांमुळे तिकीट दलालांवर वचक बसेल आणि ऐनवेळी प्रवास रद्द करणाऱ्यांच्या जागी गरजूंना तात्काळ कन्फर्म तिकीट मिळण्यास मदत होईल. तसेच डिजिटल ट्रान्झॅक्शनला प्रोत्साहन देण्यासाठी नो रिफंडची मर्यादा वाढवण्यात आली आहे.

Follow Us
कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
Siya Goyal Breaking | केतन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पुन्हा चर्चेत; कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय
Tukaram Mundhe | दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय, कोणते आहेत नवे नियम?
राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! खोतांचा घणाघात; महायुतीला सावध...
Sadabhau Khot | राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! सदाभाऊ खोतांचा घणाघात; महायुतीला सावध राहण्याचा इशारा
अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची..
Ram Mandir News | अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची पहिली मोठी प्रतिक्रिया
मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा...
Mumbai | मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा; संदीप देशपांडेंचा भाजपवर घणाघात
काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? ठाकरेंच्या आंदोलनावर...
Breaking | काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनावर उदय सामंतांचा घणाघात!
धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! अन् पुढे जे झालं....
Tree Collapse Mumbai | धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; निष्काळजीपणामुळे आणखी एकाचा बळी
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय