America Tariff : अमेरिकेच्या टॅरिफचा भारताला आतापर्यंतचा सर्वात मोठा दणका, आंतरराष्ट्रीय बाजारातून वाईट बातमी, चिंता वाढली
अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लावला आहे, आता त्या टॅरिफचे परिणाम समोर येण्यास सुरुवात झाली असून, भारताला मोठा दणका बसला आहे, मोठी बातमी समरो आली आहे.

अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लावला आहे, भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून आपण भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफचा दोन्ही देशांवर कमी -अधिक परिणाम झाला आहे. याचा अमेरिकेला देखील मोठा फटका बसला असून, अमेरिकेमध्ये महागाई वाढली आहे, अनेक गोष्टींचे दर वाढले आहेत. तर दुसरीकडे अमेरिकेच्या टॅरिफची झळ आता भारताला देखील बसत असल्याचं दिसून येत आहे. मोठी बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे अमेरिकेनं भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर भारताच्या करन्सीमध्ये सातत्यानं घसरण सुरूच आहे, आता पुन्हा एकदा रुपया त्याच्या निचांकी पातळीवर पोहोचला आहे. टॅरिफच्या दबावामुळे आशिया खंडातील तिसरी सर्वात मोठी इकोनॉमी असलेल्या भारताच्य करन्सीला मोठा फटका बसला आहे. रुपयामध्ये पुन्हा एकदा 0.39 पैशांची घसरण झाली आहे. आता डॉलर रुपयाच्या तुलनेमध्ये 88.4425 वर पोहोचला आहे. गेल्या आठवड्यात देखील रुपयामध्ये मोठी घसरण पहायला मिळाली होती.
रुपयांमध्ये का सुरू आहे घसरण?
असं मानलं जात आहे की, अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफचा सध्या भरतावर दबाव आहे, या दबावामुळे रुपयामध्ये घसरण सुरू आहे, दुसरीकडे महागाईची आकडेवारी येण्यापूर्वीच डॉलर मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे, तसेच निर्यात देखील कमी झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून क्रूर ऑयलच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे, त्यामुळे देखील रुपयावर दबाव पाहायला मिळत आहे. भारतीय व्यापाऱ्यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार जर भारत आणि अमेरिकेत सकारात्मक डील झाली तर त्यानंतर रुपयामध्ये काही प्रमाणात सुधारणा पाहायला मिळू शकते.
दरम्यान भारतासाठी एक सकारात्मक बाब म्हणजे अमेरिकेनं भारतावर लावलेल्या टॅरिफमुळे भारताचा अमेरिकेसोबतचा व्यापार काहीसा थंडावला आहे, मात्र दुसरीकडे आता भारताला रशियाच्या रुपानं नवी बाजारपेठ मिळाली आहे, टॅरिफनंतर रशिया आणि भारताची जवळीक वाढली असून, निर्यात देखील वाढली आहे. याचा भविष्यात टॅरिफ संकटातून सावरण्यासाठी भारताला फायदा होऊ शकतो, असं अंदाज आहे.
