आयसिसचे पाच दहशतवादी भारतात घुसले, देशभरात हायअलर्ट!

आयसिसचे पाच दहशतवादी भारतात घुसले, देशभरात हायअलर्ट!

आयसीस (ISIS) या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचे चार दहशतवादी भारतात घुसल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. ही माहिती मिळाल्यानंतर मुंबई, नवी दिल्ली, गुजरात यासह संपूर्ण देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Namrata Patil

|

Aug 20, 2019 | 10:24 AM

नवी दिल्ली : आयसिस (ISIS) या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचे पाच दहशतवादी (Terrorist) भारतात (India) घुसल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. ही माहिती मिळाल्यानंतर मुंबई, नवी दिल्ली, गुजरात यासह संपूर्ण देशभरात हाय अलर्ट (High Alert) जारी करण्यात आला आहे. तसेच राजस्थान आणि गुजरातच्या बॉर्डरवर सतर्कता बाळगली जात आहे. हे पाच दहशतवादी अफगाणिस्तानच्या पासपोर्टच्या मदतीने भारतात घुसले असल्याची माहिती मिळत आहे.

भारतात घुसलेले चार दहशतवादी पाकिस्तानच्या एजेंटसोबत घुसल्याची माहिती राजस्थानचे पोलीस अधीक्षक कल्याणमल मीणा यांनी दिली आहे. याबाबत राजस्थानच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत खबरदारी बाळणगण्याचा इशारा देण्यात आला आहे. भारतात घुसलेले पाचही दहशतवादी आतकंवादी हल्ला करण्यासाठी संधीच्या शोधात असल्याचीही माहिती मिळत आहे.

दरम्यान गुप्तचर यंत्रणेच्या या माहितीनंतर पोलीस आणि सुरक्षा जवानांनी सर्वत्र सावधानतेचा इशारा दिला आहे. हॉटेल, ढाबा, रेल्वे स्टेशन आणि बस स्टेशन या सारख्या गर्दीच्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीची पोलिसांकडून तपासणी केली जात आहे. तसेच वाहनांचीही तपासणी पोलिसांकडून करण्यात येत आहे.

याआधीही 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनी (Independence day) दहशतवादी हल्ला (Terrorist attack) होण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी वर्तवली होती. मोदी सरकारने मास्टरस्ट्रोक मारत कलम 370 हटवल्याने जम्मू काश्मीरचा विशेषाधिकारी काढून टाकला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईसह दिल्ली आणि इतर शहरात हाय अलर्ट (High alert) जारी करण्यात आला होता.


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें