AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrayaan-3 : इस्रोच्या चंद्रयान 3 ने चंद्राच्या परिघात मारली एन्ट्री, पुढे काय ते वाचा

चंद्रयान 3 मोहिमेतील लँडर, रोव्हर आणि प्रोपल्शन मॉडेल आहे. हा आता 16 ऑगस्टपर्यंत चंद्राच्या परिघात भ्रमण करेल. त्यानंतर चंद्राच्या पृष्ठभागाच्या दिशेने प्रस्थान करेल.

Chandrayaan-3 : इस्रोच्या चंद्रयान 3 ने चंद्राच्या परिघात मारली एन्ट्री, पुढे काय ते वाचा
Chandrayaan-3 : इस्रोच्या चंद्रयान 3 ने चंद्राच्या परिघात मारली एन्ट्री, पुढे काय ते वाचा
| Updated on: Aug 05, 2023 | 8:30 PM
Share

मुंबई : भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने आणखी एक यशाचं टप्पा गाठला आहे. 14 जुलैला प्रक्षेपित झालेल्या चांद्रयान 3 नं चंद्राच्या परिघात यशस्वीरित्या प्रवेश केला आहे. जवळपास 22 दिवसानंतर इस्रोच्या मोहिमेला यश मिळालं आहे. 40 दिवसांच्या चंद्रयान मिशनमधील हा महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे आता पुढच्या टप्प्यात चंद्रावर उतरण्यासाठी पुढील 17 दिवस महत्त्वाचे असतील. 23 ऑगस्टला हा इस्रोच्या इतिहासातील महत्त्वाचा दिवस असणार आहे.

चंद्रयानच्या पुढच्या टप्प्यात काय असेल?

स्पेसक्राफ्ट पृथ्वीच्या पाच फेऱ्या पूर्ण केल्या आहेत. चंद्रयान 3 मोहिमेत लँडर, रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्युल आहे. 16 ऑगस्टपर्यंत हे आता चंद्राभोवती भ्रमण करणार आहे. त्यानंतर 17 ऑगस्टला लँडर प्रोपल्शन मॉड्युलपासून वेगळं होईल. ते चंद्राच्या कक्षेत राहून पृथ्वीवरून येणारी रेंजची माहिती घेईल. तर लँडर पुढे जात 23 ऑगस्टला चंद्रावर उतरेल. लँडरचं नाव विक्रम ठेवलं गेलं आहे. लँडर रोव्हरचं नाव मागच्या चंद्रयान 2 मोहिमेत घेतलं आहे. लँडरचं नाव भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक डॉ. विक्रम ए साराभाई यांच्या नावावर आहे. ही मोहीम चंद्राच्या एका दिवसाच्या बरोबर काम करेल. पृथ्वीच्या तुलनेत बोलायचं झालं तर 14 दिवस असतील.

विक्रम लँडरचं वजन किती किलोग्रम आहे?

लँडर सुरक्षितरित्या चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं की नाही यांची शहनिशा करण्यासाठी सेंसर लावण्यात आले आहेत. रोव्हरसह याचं वजन जवळपास 1749 किलोग्राम इतक आहे. यात साईड माउंटेड सौर पॅनेल आहे. त्यातून 738 वॉट पॉवर जनरेट होऊ शकते. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा या माध्यमातून अभ्यास केला जाईल. आता पुढच्या टप्प्यात विक्रम लँडरच्या लँडिंगवर लक्ष असणार आहे. कारण मागच्या वेळेस चंद्रयान 2 मोहिम अपयशी ठरली होती. तेव्हा लँडर व्यवस्थितरित्या चंद्रावर उतरलं नव्हतं आणि संपर्क तुटला होता.

आतापर्यंत चंद्रयान 3 चा प्रवास

  • 14 जुलैला चंद्रयान 3, 170 किमी ते 36500 किमी परिघात सोडलं होतं. चंद्राच्या दिशेने जाताना अंडाकृती फिरत ते जवळ जात होतं.
  • 15 जुलैला चंद्रयान 3 चं परिघ वाढवून 41762 किमी ते 173 किमी केलं गेलं.
  • 17 जुलैला दुसऱ्यांदा परिघ वाढवण्यात आला आमि 41603 किमी ते 226 किमी करण्यात आला
  • 18 जुलैला तिसऱ्यांदा परिघ वाढवून 51400 किमी ते 228 किमी करण्यात आला.
  • 20 जुलै रोजी चौथ्यांदा परिघ वाढवून 71351 किमी ते 233 किमी इतका करण्यात आला.
  • 25 जुलैला पाचव्यांदा परिघ वाढवण्यात आला आणि 1,27603 किमी ते 236 किमी करण्यात आला.
  • 31 जुलै आणि 1 ऑगस्टच्या मध्यरात्री पृथ्वीच्या कक्षेबाहेर जात चंद्राकडे प्रस्थान केलं.
  • 5 ऑगस्टला चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला.
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.