पाकिस्तानचे तुकडे होणार हे निश्चित, अंकगणित समजावत मंत्री अनिल विज म्हणाले की…
हरियाणा सरकारचे मंत्री आणि बीजेपी नेता अनिल विज त्यांच्या तडफदार वक्तव्यांनी कायम चर्चेत असतात.आता त्यांनी आपला शेजारी पाकिस्तान कसा गर्तेत चालला आहे याचे गणितच समजावून सांगितले आहे.

हरियाणाचे कॅबिनेट मंत्री अनिल विज यांनी पाकिस्तानवर जोरदार प्रहार करताना म्हटले आहे कि पाकिस्तानच्या अवस्थेवरुन हा देश लवकरच नष्ट होत जाणार आहे. काँग्रेस अध्यक्षांनी पीएम मोदी यांना सल्ला देऊ नये. ते आणि केजरीवाल स्वत:च पराभूत आहेत त्यांचे कोण ऐकणार असेही अनिल विज यांनी म्हटले आहे. सल्ला विजयी माणसाचा ऐकाला जातो पराभूताचा नव्हे असा टोमणा त्यांनी खरगे आणि केजरीवाल यांना दिला आहे.
पाकिस्तानचा पाय खोलात आहे आणि हा देश काही पुढे येणार नाही. त्याचे पतन होणे हे जणू विधीलिखीत असल्याचे अनिल विज यांच्या म्हणण्याचा रोख आहे. ते पुढे म्हणाले की काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री हे स्वत:च पराभूत आहेत. त्यांनी दुसऱ्यांना सल्ला देण्याच्या भानगडीत पडूच नये. मोदी यांनी त्यांचे ऐकणार नाहीत कारण सल्ला विजयी माणसाचा ऐकायचा असतो. पराभूतांचा नाही, मोदी यांनी जनतेत जाणे थांबवू नये असेही ते म्हणाले. मल्लिकार्जून यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता थांबावे असा सल्ला दिला आहे. याबाबत बोलताना मंत्री अनिल विज यांनी त्यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दात टीका केली आहे.
विज म्हणाले की मल्लिकार्जुन खरगे यांना पाकिस्तानचा अध्यक्ष आणि मार खाल्लेला हा मोहरा असल्याचा टोमणा मारला आहे. त्यांना पाकिस्तानची स्तूती ऐकायला आवडते. आणि अरविंद केजरीवाल यांना तर दिल्लीच्या जनतेने राजकारणातून बाहेर फेकले आहे. आणि उर्वरित त्यांच्यात काही कसर असेल तर भाजपा सांभाळून घेईलच अशा शब्दात विज यांनी दोन्ही नेत्यांवर तोफ डागली आहे.
अंकगणिताद्वारे पाकची भविष्यवाणी केली
विज म्हणाले की पाकिस्तान स्वत:च दुफळी आणि बंडाळीच्या उंबरठ्यावर आहे. त्यांनी अंकगणिताच पाकिस्तानची भविष्यवाणीच केली. ते म्हणाले की पाकिस्तान तुकडे होणार कारण पाकिस्तान हा शब्दच आठ अक्षरापासून तयार झाला आहे. तर हिंदूस्थान हा नऊ अक्षरांचा शब्द आहे. 9 ला कितीही गुणाकार केला तरी तो 9 च राहणार आहे. गेल्या 25 वर्षांत तो अर्धा झाला आहे. आणि येत्या 50 वर्षांत त्यांचा तो आणखी अर्धा होईल. पाकव्याप्त कश्मीर आणि बलूचीस्तानची जी स्थिति आहे त्यावरुन हा अंदाज लावता येऊ शकतो. त्यामुळे पाकिस्तानचा लवकरच विनाश होऊ शकतो असेही ते म्हणाले.
