AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पळून कसा जाईल? आरोपीच्या शरीरावर जीपीएस, पोलीस झाले हायटेक; हे कुठे घडलं?

आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आतापर्यंत अमेरिका, ब्रिटन, दक्षिण आफ्रीका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड अशा प्रकारे जीपीएस डीव्हाईस शरीरात बसविण्यात येत होते. आता भारतातही आरोपींना जामीनावर सोडताना हायटेक जीपीएस बॅंड लावला जाणार आहे.

पळून कसा जाईल? आरोपीच्या शरीरावर जीपीएस, पोलीस झाले हायटेक; हे कुठे घडलं?
Image Credit source: TV9MARATHI
| Updated on: Nov 05, 2023 | 3:52 PM
Share

काश्मीर | 5 नोव्हेंबर 2023 : आता आरोपी जामीन किंवा पॅरोलवर असताना फरार होण्याची चिंता नाही. अतिरेकी कारवायात सामील असलेल्या आरोपींची जामिनावर सुटका झाल्यानंतर त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी खास योजना आखली आहे. तुरुंगातून सुटताना आरोपीच्या पायाच्या घोट्यात जीपीएस यंत्रणा बसण्याचा निर्णय जम्मू – काश्मिर पोलिसांनी घेतला आहे. त्यामुळे आरोपीच्या सर्व हालचालींवर पोलिसांचे लक्ष रहाणार आहे. असे तंत्रज्ञान वापरणारे जम्मू-कश्मीर देशातील पहिले राज्य ठरले आहे.

आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आतापर्यंत अमेरिका, ब्रिटन, दक्षिण आफ्रीका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड अशा प्रकारे जीपीएस डीव्हाईस शरीरात बसविण्यात येत होते. या देशात जामीन, पॅरोल आणि घरात नजरकैदेत केलेल्या आरोपीच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी जीपीएस यंत्रणा वापरली जात असते. तसेच तुरुंगात जामीनाअभावी सजा भोगत असलेल्या कच्च्या कैद्यांची संख्या वाढत असल्याने त्यांना ठेवण्याची जागा नसल्याने गर्दी कमी करण्यासाठी देखील हा उपाय केला जातो.

नेहमी दहशतवादाशी सामना करावे लागणाऱ्या जम्मू-काश्मीर राज्यातील तपास संस्थांनी आता या उपायाचा आपल्याकडे वापर करण्यास सुरुवात केली आहे. अतिरेक्यांवर पाळत ठेवण्यासाठी या जीपीएस ट्रॅकर एंकल ब्रेसलेट ( Gps Ankle Bracelet ) वापर केला जात आहे. आरोपीच्या पायात पैंजणाप्रमाणे त्याच्या घोट्याला हे एंकलेट घातले जाणार आहे. जेलमधून आरोपीला पॅरोलवर रजा मिळताच किंवा रितसर जामीन मिळताच हा जीपीएस बॅंड त्याच्या घोट्याला लावला जाईल. त्यामुळे त्याच्या सर्व हालचालींवर लक्ष ठेवणे पोलिसांना सोपे जाणार आहे.

यूएपीएच्या विविध कलमांतर्गत एफआयआर झालेल्या आरोपी गुलाम भट याने जामीनासाठी अर्ज केला होता. जामीनावरील सुनावली लांबल्याने त्याने अंतरिम जामीन मिळावा असा अर्ज केला होता. जम्मू-कश्मीरच्या एनआयच्या विशेष कोर्टाने आदेश दिल्यानंतर अतिरेकी कारवायात सामील असलेल्या या आरोपीला हे जीपीएस उपकरण लावण्याचा आदेश दिला आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.