भारता विरोधात रॅली काढत होते पाकिस्तानी नागरिक, बलूच पोरांनी चांगलंच कुटलं, दे दणादण
Balochistan and Pakistan: ‘जश्न-ए-पाकिस्तान’ म्हणत भारता विरोधात रॅली पाकिस्तानी नागरिकांना पडली महागात, झाली वाईट अवस्था, एकाचा मृत्यू तर, अन्य जखमी

Balochistan and Pakistan: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ऑपरेश सिंदूर राबवत भारताने पाकिस्तानचा बदला घेतला. ज्यामध्ये पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं आहे. भारताकडून पराभव झाल्यानंतर, पाकिस्तान सरकार आपल्या लोकांना फसवण्यात व्यस्त आहे. सलग चार दिवस सुरु असलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांनी ‘जश्न-ए-पाकिस्तान’ रॅली काढण्यास सुरुवात केली आहे. पण जेव्हा रॅली बलूचिस्तान येथे काढण्यात आली. तेव्हा बलूच आर्मीने पाकिस्तानी लोकांच्या उत्साहावर हल्ला केला.
बुधवारी क्वेटा येथे सरकार समर्थक रॅलीवर निशाणा साधत शक्तिशाली स्फोटकानंतर गोळीबार केला. ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला आणि किमान दहा जण जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रॅली सरियाब कस्टम्स येथून शहराकडे जात असताना मुनीर मेंगल रोडजवळ हल्ला झाला. सशस्त्र हल्लेखोरांनी रॅलीतील उपस्थित असलेल्या पाकिस्तानी नागरिकांवर ग्रेनेड फेकलं आणि गोळीबार केला.
बलूचिस्तानच्या सुरक्षा दलांनी तात्काळ परिसराला वेढा घातला. बलूच आर्मीच्या या कृतीने एक गोष्ट स्पष्ट झाली आहे आणि ती म्हणजे बलूचिस्तान आता पाकिस्तान सरकारचे राज्य सहन करू शकत नाहीत.
हल्ल्यानंतर, जखमींना क्वेट्टाच्या सिव्हिल हॉस्पिटल आणि बोलन मेडिकल कॉम्प्लेक्समध्ये तातडीने दाखल करण्यात आले. जिथे मेहबूब अली नावाच्या व्यक्तीचा रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची देखील माहिती मिळत आहे.
‘जश्न-ए-पाकिस्तान’ रॅलीचं नेतृत्व पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) खासदार अली मदाद जकात याने केलं. या रॅलीमध्ये मुख्यमंत्री सरफराज बुगतीही उपस्थित होते. पण सुरक्षेच्या कारणास्तव मुख्यमंत्री भाषण दिल्यानंतर कार्यक्रमस्थळावरून निघून गेले.
याप्रकरणी अधिक तपास दहशतवाद विरोधी विभाग आणि क्वेटा पोलिसांनी सुरु केला आहे. बलुचिस्तान आरोग्य विभागाचे प्रवक्ते डॉ. वसीम बेग यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात दहा जण जखमी झाले आहेत. यामध्ये वीस ते पन्नास वयोगटातील लोकांची संख्या अधिक आहे. पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणावाच्या काळात, बीएलएने या भागात आपली पकड मजबूत केली आहे आणि आता ते दररोज हल्ले करताना दिसत आहे.
