AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jyoti Malhotra : NIA, हिच्यावर बारकाईने लक्ष ठेवा.. ‘या’व्यक्तीने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, पोस्ट व्हायरल

भारतात राहूनच पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप असलेल्या हरियाणातील ज्योति मल्होत्राला नुकतीच अटक करण्यात आली. मात्र या कारवाईपूर्वी काही महिने आधीच एका भारतीय व्यक्तीने ट्रॅव्हल व्लॉगर असलेल्या ज्योती बद्दल संशय व्यक्त करत तिच्यापासून सावध राहण्याचा, तिच्यावर लक्ष ठेवण्याचा इशारा दिला होता. सोशल मीडियावरील त्याची पोस्ट आता व्हायरल होत आहे.

Jyoti Malhotra : NIA, हिच्यावर बारकाईने लक्ष ठेवा.. 'या'व्यक्तीने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, पोस्ट व्हायरल
ज्योती मल्होत्रावर हेरगिरी केल्याचा आरोप आहेImage Credit source: social media
| Updated on: May 19, 2025 | 2:52 PM
Share

भारतात राहून, इथलंच मीठ खाऊन, आपल्याच देशाच्या शत्रूसाठी, पाकड्यांशी हातमिळवणी करत त्यांच्यासाठी हेरगिरी केल्याचा आरोप असलेली हरियाणातील रहिवासी, यूट्यूब व्लॉगर ज्योति मल्होत्राच्या अटकेनंतर देशात चांगलीच खळबळ माजली आहे. हेरगिरी करत पाकिस्तानमधील अधिकाऱ्यांना भारताबद्दल गुप्त माहिती पोहोचवल्याचा आरोप असलेली ज्योति मल्होत्रा हिचे एकेक कारनामे ऐकून सामान्य नागिरकच नव्हे तर पोलीसही हैराण झालेत.

आता या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.  गेल्या आठवड्यात तिला हेरगिरीच्या आरोपखाली बेड्या ठोकण्यात आल्या.  मात्र त्याच्या वर्षभरापूर्वीच, साधारण मे 2024 मध्ये एका भारतीय नागरिकानेच ज्योतीबद्दल शंका व्यक्त करत तिच्यापासून सावध राहण्याचा आणि तिच्यावर लक्ष ठेवण्याचा इशारा दिला होता, अशी माहिती आता उघड होत आहे. ज्योतीच्या अटकेनंतर आता त्या व्यक्तीची सोशल मीडिया पोस्टही चांगलीच व्हायरल झाली आहे.

“ट्रॅव्हल विथ जो” हे तिचे ट्रॅव्हल चॅनल प्रसिद्ध असून जवळपास 4 लाख सबस्क्रायबर्स आहेत, मात्र आता तीच ज्योती मल्होत्रा ​​आता फक्त हरियाणात नव्हे तर संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनली आहे, पण अर्थात ती काही सकारात्मक गोष्ट नाहीच. आपल्यच देशात राहून दुसऱ्या देशासाठी हेरगिरी केल्याचा आरोप तिच्यावर आहे.

Pak ने ज्योती-देवेंद्रला कसं बनवलं हेर ? देशात आणखी किती गद्दार ?

हरियाणातील हिसार येथील रहिवासी ज्योती मल्होत्रा ​​हिला गेल्या आठवड्यात पाकिस्तानला संवेदनशील भारतीय लष्करी माहिती शेअर केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काही आठवड्यांनंतर तिची अटक झाली आहे, या हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यामध्ये 25 भारतीय आणि एका परदेशी व्यक्तीचाही समावेश आहे.

ज्योतीबद्दल दिलेली वॉर्निंग आता होत्ये व्हायरल

ज्योती मल्होत्राला गेल्या आठवड्यात म्हणजे मे 2025 मध्ये अटक करण्यात आली असली तरीही, तिच्याबद्दल वॉर्न करणारा, तिच्या पाकिस्तानच्या वाढत्या भेटींबद्दल, पाकिस्तानशी असलेल्या लिंकबद्दल इशारा देणारी एक पोस्ट, साधारण वर्षभरापूर्वीच करण्यात आली होती. मे 2024 मध्ये करण्यात आलेली पोस्ट आता वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाली आहे. 33 वर्षांच्या ज्योती मल्होत्राबद्दल कपिल जैन नावाच्या व्यक्तीने सुमारे वर्षभरापूर्वीच धक्कादायक दावा करत तिच्यापासून सावध राहण्याचा तसेच तिच्यावर लक्ष ठेवण्याचा इशारा दिला होता. ज्योती मल्होत्रा हिच्या संशयास्पद हालचालींबाबत चिंता व्यक्त करत एनआयएने तिची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी केली जैन यांनी केली होती.

Jyoti Malhotra : पाकिस्तानच नव्हे, या सर्वात मोठ्या शत्रू देशाच्याही संपर्कात; ज्योतीच्या हेरगिरीने अधिकारी हैराण

मिळालेल्या माहितीनुसार, ज्योतीने 2023 साली दोनवेळा पाकिस्तानला भेट दिली होती. त्यानंतर तिने काश्मीरलही भेट दिल्याचे समोर आले आहे.

जैन यांनी काय दिला होता इशारा ?

1 मे 2024 रोजी कपिल जैन नावाच्या व्यक्तीने X (पूर्वीचं ट्विटर) या सोशल मीडिया साईटवर एक ट्विट केलं होतं. त्यात त्याने ज्योती मल्होत्रा हिच्या यूट्यूब चॅनेलचे काही स्क्रीनशॉट्सही जोडले होते. ‘ NIA, कृपया या महिलेवर बारकाईने लक्ष ठेवा. ती आधी पाकिस्तानच्या दूतावासात फंक्शनसाठी गेली. त्यानंतर दहा दिवसांसाठी ती पाकिस्तानमध्ये होती. आता ती काश्मीरमध्ये जात आहे. या सर्वांमागे काही कनेक्शन असू शकतं..’असा दावा करत जैन यांनी ट्विट केलं होतं. त्यामध्ये ज्योतीच्या पेजचे स्क्रीनशॉटही पोस्ट केले होते.

आता 2025 मध्ये मल्होत्राच्या अटकेनंतर या जैन यांचा हा इशारा व्हायरल झाला असून त्यालाही अनेक व्ह्यूज मिळाले आहेत.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.