ज्योती मल्होत्रा पाकशी संबंधीत या 3 प्रश्नांची उत्तरे देणे का टाळते? काय आहेत नेमके प्रश्न?
ज्योती मल्होत्राला अटक करण्यात आली आहे. तिने भारतीय लष्कराची माहिती पाकिस्तानला पोहोचवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

हरियाणातील हिसारच्या सिव्हिल लाइन्स पोलिसांनी ट्रॅव्हल ब्लॉगर आणि यूट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या संशयावरून अटक केली आहे. सध्या तिची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी तिच्याविरुद्ध ऑफिशियल सिक्रेट्स अॅक्ट आणि भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांचा दावा आहे की ती पाकिस्तानी गुप्तचर संस्थेशी सातत्याने संपर्कात होती. तसेच तिने ऑफिशियल सिक्रेट्स अॅक्टचं उल्लंघन केलं आहे, जे राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका निर्माण करते. दरम्यान, ज्योतीचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये तिचं पाकिस्तान प्रेम दिसत आहे. आता चौकशीच्या वेळी ज्योती 3 प्रश्नांची उत्तरे देणे टाळत आहे.
पोलिसांना ज्योतीकडून सगळी गुप्त माहिती काढायची आहे, जेणेकरून तिने पाकिस्तानला कोणती माहिती दिली हे समजेल. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे, पाच दिवसांच्या पोलिस रिमांडमध्ये ती बहुतांश प्रश्नांवर गप्प आहे. ती कोणतंही ठोस उत्तर देत नाही आहे. वाचा: ज्योती मल्होत्रा सोडा… ISIच्या एजंटला हेरगिरी करणाऱ्यासाठी पाकिस्तान किती पैसे देते? वाचून व्हाल चकीत
ज्योतीला पाकिस्तानकडून फंडिंग मिळत होती का?
ज्योती मल्होत्रावर हेरगिरीचा आरोप आहे आणि चार तपास यंत्रणा तिची सतत चौकशी करत आहेत. यामध्ये हरियाणा पोलिसांची STF, NIA, IB आणि मिलिट्री इंटेलिजन्सच्या टीमचा समावेश आहे. या सगळ्या यंत्रणांच्या प्रयत्नांनंतरही ती खरं बोलत नाही आहे. त्या यंत्रणा हेही शोधत आहेत की, ज्योती जेव्हा पाकिस्तानला जायची तेव्हा तिची फंडिंग कशी होत होती. पण ज्योती म्हणते की, भारतातील ट्रॅव्हल सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर्सना पाकिस्तान दूतावासाकडून प्रायोजित ट्रिप दिली जाते. यात फंडिंगचा प्रश्नच येत नाही. तिचं हे उत्तर यंत्रणांना मान्य नाहीये, त्यांना शंका आहे की यामागे काहीतरी लपलं आहे.
‘व्हीजासाठी पाक उच्चायुक्त कार्यालयात गेले होते’
चौकशीदरम्यान ज्योती म्हणते की, ती फक्त व्हीझा काढण्यासाठी पाकिस्तान उच्चायुक्त कार्यालयात गेली होती. तिथे तिची काही अधिकाऱ्यांशी भेट झाली. पण ती चौकशीत इतकी गप्प आहे की जणू तिला काहीच समजत नाही. ती नीट जेवतही नाही आणि रात्री झोपतही नाही. पोलिस तिच्यावर कडक नजर ठेवून आहेत. तिच्या देखरेखीसाठी महिला कॉन्स्टेबल तैनात आहेत.
ज्योती कोणत्या तीन प्रश्नांची उत्तरं टाळतेय?
पहिला प्रश्न: ज्योती मल्होत्राने पाकिस्तान दूतावासातील अधिकारी दानिशबरोबरच्या तिच्या संबंधांबाबत कोणत्याही प्रश्नाचं ठोस उत्तर दिलेलं नाही. ती अनेकदा दानिशला भेटली होती आणि पार्ट्यांमध्येही गेली होती.
दुसरा प्रश्न: तिने पाकिस्तानी हँडलर्सना माहिती देण्याबाबत आणि पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था ISI कडून मिळणाऱ्या फंडिंगबाबतच्या प्रश्नांना कोणतंही स्पष्ट उत्तर दिलेलं नाही. बहुतांश प्रश्नांवर ती गप्प आहे.
तिसरा प्रश्न: भारताच्या लष्करी तळांशी संबंधित गुप्त माहिती शेअर करण्याच्या प्रश्नावर तिने हो किंवा नाही असं काहीच सांगितलं नाही. यावरही ती गप्प आहे.