Jyoti Malhotra : ना पाक कनेक्शन; ना व्हॉट्सॲप चॅट, हिसार पोलिसांची ज्योती केस प्रकरणात मोठी अपडेट
Jyoti Malhotra espionage : कथित हेरगिरी प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येत आहे. ज्योती मल्होत्रा आणि तिच्या कथित पाकिस्तान कनेक्शनविषयी गेल्या चार पाच दिवसांपासून बातम्या येत असतानाच आता हरयाणातील हिसार पोलिसांना या प्रकरणात हाती काय लागले? सुरुवातीचा अहवाल सांगतो काय?

Haryana Hisar Police : हरयाणातील ज्योती मल्होत्रा हिच्या कथित हेरगिरी प्रकरणाने देशात खळबळ उडवून दिली आहे. तिच्यासोबतच अनेकांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. या कथित हेरगिरी प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येत आहे. ज्योती मल्होत्रा आणि तिच्या कथित पाकिस्तान कनेक्शनविषयी गेल्या चार पाच दिवसांपासून बातम्या येत असतानाच आता हरयाणातील हिसार पोलिसांना या प्रकरणात हाती काय लागले? सुरुवातीचा अहवाल सांगतो काय?
तपासात काय आढळले
हिसार पोलिसांनी या हायप्रोफाईल प्रकरणात पारदर्शक तपास सुरू असल्याचे सांगितले. आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे आणि केंद्रीय तपास यंत्रणा सुद्धा तिच्याकडे वेळोवेळी चौकशी करत आहे. तिच्या सर्व मोबाईल फोन, लॅपटॉप, बँक खाती, तिची सोशल अकाऊंट यांची सुरक्षा एजन्सीने खोलवर जाऊन तपास केला आहे. अजून तिचा ट्रान्सझीट रिमांड कोणीही घेतलेला नाही.




सैन्य अथवा संवेदनशील माहिती नाही
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी, सैन्य तळ, देशातील लष्करी छावण्या, संरक्षण अथवा प्रशासकीय संवदेनशील माहितीपर्यंत पोहचलेली नाही, असे आतापर्यंतच्या चौकशीत हे स्पष्ट झाले आहे. तिने अतिसंवेदनशील माहिती पाकला दिल्याचा कुठलाही ठोस पुरावा अद्याप समोर आलेला नाही. राष्ट्रीय सुरक्षेला धोका होईल असा कोणताही पुरावा तिने दिलेला नाही.
इलेक्ट्रॉनिक पुराव्याची तपासणी
याप्रकरणी पोलीस आणि तपास यंत्रणा सखोल माहिती गोळा करत आहेत आरोपीकडून ताब्यात घेण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक डिवाईसची फॉरेन्सिक तपासणी करण्यात येत आहे. याविषयीचा अहवाल अद्याप हाती आलेला नाही, त्यामुळे पोलिसांनी याविषयी टिप्पणी करण्यास नकार दिला आहे. डिजिटल चॅट्स आणि इतर ऑनलाईन चॅटिंग संदर्भात अद्याप अहवाल प्राप्त नसल्याने पोलिस त्यावर बोलायला तयार नसल्याचे वृत्त पंजाब केसरीने दिले आहे.
ती पानं पोलिसांकडे नाही
विशेष म्हणजे गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडिया आणि काही वृत्तवाहिन्या दावा करत असलेली ज्योतीच्या डायरीमधील पानं पोलिसांकडे नसल्याचे समोर येत आहे. पोलिसांनी स्पष्ट केले की, अशा प्रकारचे कोणतेही दस्तावेज, कागदपत्र त्यांच्याकडे नाही, त्यामुळे सोशल मीडियावरील कथित डायरीतील पानांच्या वैधतेविषयी ते काहीही ठोस सांगू शकत नाहीत.
बँक खात्यात कोणते व्यवहार?
सध्याच्या तपासावरून आरोपीच्या चार बँक खात्यांची सखोल चौकशीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. त्यानुसार, सध्याच्या तिच्या बँक खात्यातील कोणताही व्यवहार संशयाच्या फेऱ्यात नाही. त्यात संशय घेण्यासारखं सध्या तरी काही आढळलेले नाही.
दहशतवादी कनेक्शनला ही दुजोरा नाही
आरोपी ज्योती ही काही संशयास्पद व्यक्तींच्या संपर्कात होती. पण केवळ प्राथमिक चौकशीत तिचे दहशतवाद्यांशी, त्यांच्या संघटनेशी थेट संबंध होते असे म्हणणे घाईचे होईल असे म्हटले आहे. तिचा दहशतवादी कारवायात थेट संबंध असल्याचा, सहभाग असल्याचा कुठलाही ठोस पुरावा मिळाला नसल्याचे समोर येत आहे.