AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी झोपलो होतो, अचानक टायर फुटल्यासारखा आवाज आला… भाजीपाल्याचा ट्रक पलटला, 10 जण जागीच ठार

उत्तर कन्नड जिल्ह्यातील यल्लापूर तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग ६३ वर भीषण अपघात झाला. भाजीपाला वाहतूक करणारा ट्रक गोळापूर घाटात पलटी झाला. यात १० जणांचा मृत्यू झाला, तर १५ जण गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना हुबळीच्या किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली आणि तपास सुरू केला आहे.

मी झोपलो होतो, अचानक टायर फुटल्यासारखा आवाज आला... भाजीपाल्याचा ट्रक पलटला, 10 जण जागीच ठार
कर्नाटकमध्ये मोठा अपघात, 10 ठार
| Updated on: Jan 22, 2025 | 10:43 AM
Share

कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील यल्लापूर तालुक्यातील गुळ्लापूर गावानजीक राष्ट्रीय महामार्ग 63 वर एक भीषण अपघात घडला. या अपघातात गोळापूर घाटात भाजीपाल्याचा वाहतूक करणारा मार्ग पलटी होऊन 10 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ट्रकमधील सर्वजण सावनुरमधून कमेठी येथील भाजी मंडईत जात होते. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 15 पेक्षा जास्त जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना हुब्बळी येथील किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

भाजीपाल्याने भरलेली एक लोडिंग वाहन सवणूर येथून कुमटाकडे जात होती. या वाहनात 25 लोक प्रवास करत होते. मृतांची ओळख हावेरी जिल्ह्यातील सवणूर येथील राहणाऱ्यां म्हणून झाली आहे. सकाळी 3.30 वाजता रस्त्यावर धुके असल्याने या वाहनाचा अपघात झाला. घटनास्थळी यल्लापुर पोलीस स्थानकाचे अधिकारी तपासासाठी पोहोचले असून क्रेनच्या साह्याने मृतदेह बाहेर काढले जात आहेत.

जिल्हा पोलीस प्रमुख नारण यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला आणि अपघाताबद्दल माहिती संकलित केली.

मृत व्यक्तींची माहिती:

फयाज जमखंडी – 45 वर्षे

वसीम मडगेरी – 35 वर्षे

इज्जाज मुळ्ला – 20 वर्षे

सदीक भास – 30 वर्षे

गुलाम हुशेन जवळी – 40 वर्षे

इम्तियाज मुळकेरी – 36 वर्षे

अल्पाज जाफर मडक्की – 25 वर्षे

झीलानी अब्दुल झखाती – 25 वर्षे

अस्लम बाबुली बेणी – 24 वर्षे

मी झोपलो होतो आणि अचानक..

टिव्ही9 शी बोलताना एक जखमी मोहम्मद यांनी सांगितले की, हा अपघात पहाटे 3.30 वाजता झाला. “मी झोपलो होतो, आणि अचानक टायर फुटल्यासारखा आवाज आला, त्यानंतर हा अपघात झाला,” असे त्यांनी सांगितले. “आम्ही सर्वजण प्रत्येक आठवड्यात बाजारात जात असतो. सवणूरहून बाजारासाठी जात होतो आणि आम्ही भाजीपाला आणि फळांचा व्यवसाय करत होतो. अपघात झाल्यावर सर्व भाजी आमच्या अंगावर पडली,” असे ते म्हणाले.

Follow Us
खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन
खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन.
राहुरी पोटनिवडणुकीच्या मतदानापूर्वीच राष्ट्रवादीला मोठा धक्का
राहुरी पोटनिवडणुकीच्या मतदानापूर्वीच राष्ट्रवादीला मोठा धक्का.
राज ठाकरे महापालिका आयुक्तांच्या भेटीसाठी मुंबई महानगरपालिकेत दाखल
राज ठाकरे महापालिका आयुक्तांच्या भेटीसाठी मुंबई महानगरपालिकेत दाखल.
ठाकरेंनी नकार दिला तर या महिला नेत्याला विधान परिषदेत जाण्याची संधी
ठाकरेंनी नकार दिला तर या महिला नेत्याला विधान परिषदेत जाण्याची संधी.
भाजपचं कॅरेक्टर, चरित्र, ढोंग काय आहे हे त्या प्रकरणात दिसतंय
भाजपचं कॅरेक्टर, चरित्र, ढोंग काय आहे हे त्या प्रकरणात दिसतंय.
संसदेत शाब्दिक चकमक; संजय राऊतांचे भाजपवर तीव्र शब्दांत टीकास्त्र
संसदेत शाब्दिक चकमक; संजय राऊतांचे भाजपवर तीव्र शब्दांत टीकास्त्र.
नाशिक धर्मांतर प्रकरणातील 7 जण अटकेत,मुख्य सूत्रधार निदा खान कुठे फरार
नाशिक धर्मांतर प्रकरणातील 7 जण अटकेत,मुख्य सूत्रधार निदा खान कुठे फरार.
नारी शक्ती विधेयकावर लोकसभेत घमासान; अरविंद सावंतांचा सरकारला सवाल
नारी शक्ती विधेयकावर लोकसभेत घमासान; अरविंद सावंतांचा सरकारला सवाल.
महिला आरक्षणावरून कोल्हेंचा हल्लाबोल; सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष टोला
महिला आरक्षणावरून कोल्हेंचा हल्लाबोल; सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष टोला.
विधेयकाचं क्रेडिट तुम्ही घ्या, आम्ही ब्लँकचेक... मोदी असं का म्हणाले?
विधेयकाचं क्रेडिट तुम्ही घ्या, आम्ही ब्लँकचेक... मोदी असं का म्हणाले?.