AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पटोलेंच्या राजीनाम्यापाठोपाठ कर्नाटकातही राजकीय घडामोडी, विधानपरिषद सभापती पायउतार

भाजपच्या मदतीने जेडीएसचे ज्येष्ठ आमदार बसवराज होरेट्टी विधानपरिषदेच्या सभापतीपदी निवडले जाण्याची शक्यता आहे. (Karnataka Legislative Council Chairperson resigned)

पटोलेंच्या राजीनाम्यापाठोपाठ कर्नाटकातही राजकीय घडामोडी, विधानपरिषद सभापती पायउतार
| Updated on: Feb 05, 2021 | 8:11 AM
Share

बंगळुरु : महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पदाचा राजीनामा दिला, त्याचवेळी योगायोगाने कर्नाटकातही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कर्नाटक विधान परिषदेचे (Karnataka Legislative Council) सभापती के प्रतापचंद्र शेट्टी (K Prathapachandra Shetty) यांनीही गुरुवारी पदाचा राजीनामा दिला. सदनाच्या पटलावरुनच शेट्टींनी राजीनाम्याची घोषणा केली. त्यामुळे भाजप-जनता दल (सेक्युलर) युतीचा विधानपरिषदेवर ताबा मिळवण्याचा मार्ग सोपा झाला आहे. (Karnataka Legislative Council  Chairperson K Prathapachandra Shetty resigned)

भाजपला जेडीएसची साथ

के प्रतापचंद्र शेट्टी यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव पारित करण्यात आला होता. काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत बुधवारी के प्रतापचंद्र शेट्टी यांच्या राजीनाम्याची चर्चा झाली होती. भाजपने आणलेल्या प्रस्तावाला जेडीएसचे समर्थन मिळाले. अविश्वास प्रस्तावाला सामोरं न जाताच शेट्टींनी राजीनामा दिला. भाजप-जनता दल (सेक्युलर) युतीकडे पुरेसे संख्याबळ असल्यामुळे त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.

विधानपरिषदेच्या सभापतीपदी कोण?

भाजपच्या मदतीने जेडीएसचे ज्येष्ठ आमदार बसवराज होरेट्टी विधानपरिषदेच्या सभापतीपदी निवडले जाण्याची शक्यता आहे. 75 सदस्यीय कर्नाटक विधान परिषदेत दोन्ही पक्षांचे मिळून एकूण 43 आमदार आहेत. भाजपचे गटनेते श्रीनिवास पुजारी यांनी विधानपरिषदेच्या सत्राचा विस्तार करण्याची मागणी केली. 8 किंवा 9 फेब्रुवारीला नव्या सभापतींची निवड व्हावी, यासाठी भाजपतर्फे ही मागणी करण्यात आली आहे.

‘लोकशाहीत निर्णय संख्यात्मक बळावर’

सभापतीपदावरुन पायउतार होताना के प्रतापचंद्र शेट्टी यांनी सर्व विधानपरिषद सदस्यांचे आभार व्यक्त केले. ’15 डिसेंबरला सदनात झालेल्या गोंधळासारख्या घटना रोखण्यासाठी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. लोकशाही व्यवस्थेत सर्व निर्णय संख्यात्मक बळाच्या आधारावर घ्यावे लागतात. पण सभापतीच्या रुपाने घेतलेले निर्णय शेतकरी, महिला आणि सर्व समाजाच्या हिताचे असावेत’ अशी अपेक्षा शेट्टींनी व्यक्त केली.

15 डिसेंबरला काय झाले होते?

कर्नाटक विधानपरिषेदत 15 डिसेंबरला गोरक्षा कायद्यावरुन जोरदार राडा झाला होता. यावेळी काँग्रेसच्या आमदारांनी विधानपरिषेदच्या उपसभापतींना अक्षरश: सभागृहातून खेचून नेत बाहेर काढले. भाजप आणि जनता दलाने (सेक्युलर) असंवैधानिक पद्धतीने उपसभापतींना खुर्चीत बसवले. उपसभापती एसएल धर्मेगौडा यांचा मृतदेह २८ डिसेंबरला रेल्वे रुळांवर आढळल्याने एकच खळबळ उडाली होती.

नाना पटोलेंचा राजीनामा

दुसरीकडे, नाना पटोले यांनी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर महाविकास आघाडीतील घटकपक्ष नाराज असल्याची माहिती मिळतेय. खासकरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पटोले यांच्या राजीनाम्याबाबत नापंसती व्यक्त केल्याचं बोललं जात आहे. महाविकास आघाडीचं सरकार स्थिर होत असतानाच त्यांनी राजीनामा देण्याची गरज नव्हती, अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका असल्याचे कळते.

संबंधित बातम्या :

Karnataka विधानपरिषदेत आमदारांनी खुर्चीवरुन खेचलेले उपसभापती रेल्वे रुळांवर मृतावस्थेत

पवार काय बोलत आहेत त्यावर बोलणार नाही, पण तिघांशी बोलून निर्णय-पटोले

नाना पटोलेंच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नाराज?

(Karnataka Legislative Council  Chairperson K Prathapachandra Shetty resigned)

नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.