AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कश्मीरात केबल कार बिघाड, 300 पर्यटकांचा जीव टांगणीला, अखेर भारतीय सैन्य धावले मदतीला…

जम्मू-कश्मीर येथील प्रसिद्ध गुलमर्ग पर्यटन स्थळावर सोमवारी मोठा तांत्रिक बिघाड झाला. येथील प्रसिद्ध गोंडोला केबल कार सेवा अचानक ठप्प झाल्याने कोचमधील 300 प्रवाशांचा जीव टांगणीला लागला.अखेर भारतीय लष्कर आणि SDRF पथकांनी रेस्क्यू ऑफरेशन केले...

कश्मीरात केबल कार बिघाड, 300 पर्यटकांचा जीव टांगणीला, अखेर भारतीय सैन्य धावले मदतीला...
Gulmarg Ropeway Rescue
| Updated on: May 25, 2026 | 8:46 PM
Share

Jammu and Kashmir News: जम्मू-कश्मीरच्या गुलमर्ग येथे सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ‘गुलमर्ग गोंडोला’ (केबल कार) अचानक तांत्रिक बिघाडाने अडकल्याने त्यात बसलेल्या 300 पयर्टकांचा जीव टांगणीला लागला. प्रवाशांच्या किंचाळण्याने आणि ओरडण्याने हा शांत परिसर हादरुन गेला.एकूण 65 केबल कार अडकल्या त्यात हे 300 पर्यटक बसले होते. रोपवे सिस्टीमचा एक महत्वाचा पार्ट तुटल्याने बेस स्टेशनपासून फेज-1 ( कोंगडोरी ) दरम्यानची केबल कार सेवा अचानक टप्प झाली.या अपघाताची सूचना मिळताच भारतीय लष्कर SDRF, फायर ब्रिगेड आणि पर्यटन विभागाच्या टीम घटनास्थळी पोहचल्या आणि रेस्क्यू ऑपरेशन सुरु झाले. सुमारे सहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर सर्व पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले.

केबल कारमध्ये अडकले प्रवासी

खराब हवामान आणि दुर्गम पर्वतमय क्षेत्र असूनही रेस्क्यू टीमने वेगाने कारवाई करत या केबल कारच्या ठप्प झालेल्या ६५ केबिनमध्ये अडकलेल्या ३०० पर्यटकांना आळीपाळीने बाहेर काढले. रेक्स्यू टीमने फेज -१ च्या दिशेने अडकलेल्या १४ केबल कारमधून ७६ पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढले. तर बेस स्टेशनच्या दिशेने असलेल्या १२ केबल कारमधून ७२ लोकांना बाहेर काढले. अशा प्रकारे एकूण १४८ पर्यटकांना सुरक्षितपणे रेस्क्यू करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की सर्व पर्यटकांना सुरक्षित स्थळी पोहचवण्याची मोहिम सातत्याने राबिवली जात आहे.

३०० पर्यटक अडकले

मिळालेल्या माहितीनुसार ज्यावेळी हा बिघाड झाला त्यावेळी गोंडोला सेवेत एकूण ६५ केबिन ऑपरेशन होत्या. अचानक सिस्टीम बंद झाल्याने सर्व केबिन हवेतच थांबल्या. या केबिनमध्ये देश-विदेशातून आलेले सुमारे ३०० पर्यटक बसले होते. हे पर्यटक गुलमर्ग येथील बर्फाचे डोंगर पाहण्यासाठी आले होते. अचानक गोंडोला थांबल्याने अनेक पर्यटक भीतीने आणि मदतीचा धावा करु लागले.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार काही केबिन खूपच उंचावर अडकल्या होत्या. त्यामुळे प्रवाशात भीती आणि बैचेनी वाढली. लहान मुले आणि महिलांची स्थिती पाहाता घटनास्थळावर उपस्थित लोकांनी मदत आणि बचाव कार्य सुरु केले.

लष्कर, फायर ब्रिगेड आणि पर्यटन विभागाच्या टीम दाखल

घटनेची गंभीरता पाहाता स्थानिक प्रशासन आणि जम्मू-कश्मीर सरकारने लागलीच हालचाली सुरु केल्या. भारतीय सैन्याची विशेष रेस्क्यू टीम, SDRF, फायर ब्रिगेडचे जवान आणि पर्यटन विभागाच्या प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या संयुक्त टीमने बचाव मोहिम सुरु केली. रेस्क्यू टीमचे ऑपरेशन युद्ध पातळीवर सुरु आहे. सर्व पर्यटकांना सुरक्षितपणे खाली उतवरण्याचे काम सायंकाळी उशीरापर्यंत सुरु होते.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा