गॅस नको, केरोसिन हवं; महागाईच्या भडक्यानं पुन्हा पेटणार ‘चुली’!

सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून केरोसिन सर्वसामान्यांना उपलब्ध होत होते. इंधनाचे पर्याय उपलब्ध असले तरी भारतातील काही राज्य आजही केरोसिनच्या मागणीसाठी केंद्र सरकारकडे तगादा लावत आहे.

गॅस नको, केरोसिन हवं; महागाईच्या भडक्यानं पुन्हा पेटणार ‘चुली’!
एलपीजी गॅस
Follow us
| Updated on: Dec 14, 2021 | 11:01 PM

नवी दिल्ली : सीएनजीचा डंका असलेल्या आजच्या काळात केरोसिनचा वापर मंदावल्याचे चित्र पाहायला मिळते. दैनंदिन वापरासाठी पूर्वी केरोसिनचा सर्रास वापर केला जात होता. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून केरोसिन सर्वसामान्यांना उपलब्ध होत होते. इंधनाचे पर्याय उपलब्ध असले तरी भारतातील काही राज्य आजही केरोसिनच्या मागणीसाठी केंद्र सरकारकडे तगादा लावत आहे. केंद्र सरकारने केरोसिनच्या अनुदान बंद केले असले तरी गेल्या आर्थिक वर्षात 2,667 कोटी रुपयांचे केरोसिन वरील अनुदानाचे वितरण करण्यात आले.

पश्चिम बंगाल आघाडीवर

केरोसिनची विक्री सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे केली जाते. सप्टेंबर ते डिसेंबर या तिमाही दरम्यान पेट्रोलियम मंत्रालयाने 44.71 कोटी लीटर केरोसिनचे वितरण राज्यांना केले. केरोसिनचे सर्वाधिक वितरणात पश्चिम बंगाल राज्य आघाडीवर आहे. बिहारचा बंगाल खालोखाल दुसरा क्रमांक लागतो. केंद्र सरकारने रेड सिग्नल दिला असला तरीसर्वसामान्यांच्या केरोसिनसाठीच्या मागणीमुळे राज्यांनी केंद्राकडे तगादा लावला आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात केरोसिनवरील सरकारी अनुदान थांबविण्यात आले. त्यामुळे केरोसिनची खुल्या बाजारात किंमत 23.8 रुपये प्रति लीटर इतकी आहे. मुंबईमध्ये केरोसिनच्या दरात दुप्पटीने वाढ नोंदविली गेली आहे. 15.02 रुपये प्रति लीटर वरुन केरोसिनचे दर प्रति लीटर 36.12 रुपयांवर पोहोचले आहे.

सरकारची डोकेदुखी

पर्यायी इंधन मुबलक प्रमाणात उपलब्ध असताना केरोसिनच्या वाढत्या मागणीमुळे प्रशासनासमोर प्रश्वचिन्ह निर्माण झाले आहे. केरोसिनचा सर्वाधिक वापर ग्रामीण भागात स्वयंपाकासाठी केला जातो. मात्र, सरकारी पातळीवरुन पर्यावरणपूरक सीएनजीच्या वापराकडे नागरिकांना वळविण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. उज्ज्वला योजनेद्वारे सरकारने मोफत गॅस सिलिंडरची योजना हाती घेतली. त्यामुळे, गॅस कनेक्शनच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ नोंदविली गेली.

गॅस नको, केरोसिन हवं

इंधनासोबत घरगुती गॅसच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक गॅस कडून केरोसिनकडे वळले आहे. त्यामुळे केरोसिनचा वापर वाढल्यास पर्यावरण समस्यांत भर पडणार आहे. महागाईमुळे सामान्य नागरिकांसमोर स्वस्त इंधनाचा पर्याय म्हणून केरोसिनशिवाय अन्य पर्याय उपलब्ध नसल्याचे चित्र आहे.

एकाच वेळी 10 हजार एसटी कर्मचाऱ्यांच्या बडतर्फाची तयारी! निलंबित कर्मचाऱ्यांना नोटीस

नांदेडमधील ऑनर किलिंग प्रकरणी आरोपीला फाशीच, हायकोर्टाकडून शिक्षेवर शिक्कामोर्तब

iPhone 14 Pro मध्ये 48MP कॅमेरा आणि 8GB RAM मिळणार, जाणून घ्या कसा असेल नवीन स्मार्टफोन

Non Stop LIVE Update
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.