अंधरुणात बायको आणि बाजारात सोबत असेल तर…, नेत्याच्या वादग्रस्त विधानाने सर्वत्र खबळ, Video
निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या नेत्याने नुकताच वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे... अंधरुणात बायको आणि बाजारात सोबत असेल तर..., असं वक्तव्य केल्यामुळे अनेकांनी नेत्यावर निशाणा साधला आहे...

राजकारणातील व्यक्ती अनेकदा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात. आता देखील असंच काही झालं. एका नेत्याने पत्नी आणि बहिणीसोबत असलेल्या नात्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे नेत्यावर अनेकांनी निशाणा देखील साधला आहे. अंधरुणात असते तेव्हा पत्नी पत्नी असते… बाजारात सोबत असते तेव्हा तिचं बहिणी प्रमाणे रक्षण करता आलं पाहिजे… असं वक्तव्य नेत्याने केलं आहे. ज्यामुळे अनेकांनी निशाणा साधला आहे.
पत्नी आणि बहीण यांच्या नात्यावर मोठं वक्तव्य करणारे नेते दुसरे तिसरे कोणी नाही तर, भोजपुरीचे ट्रेंडिंग सुपरस्टार खेसरी लाल यादव आहेत… भोजपूरी स्टार खेसारीलाल यादव यांनी बिहारात छपराहून आरजेडीने उमेदवार घोषीत केले आहे. पवन सिंह यांच्या पत्नीबाबतच्या वक्तव्यावर खेसारी लाल यादव यांनी प्रतिक्रिया दिली. पाटण्यात आल्यानंतर खेसारी लाल यादव यांनी निरहुआ यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.
खेसरी लाल यादव म्हणाले, ‘बिहारमध्ये चांगल्या व्यवस्थेसाठी माझी लढाई कायम सुरुच राहील… यासाठी माझे सर्व प्रयत्न देखील सुरु आहेत आणि माझं कोणासोबत शत्रुत्व नाही… ‘ पवन सिंह यांच्या वक्तव्यावर खेसरी लाल यादव म्हणाले, ‘घरी बायको आहे… आणि अंथरुणात आहे तर ती बायको आहे… जर माझ्यासोबत ती बाजारात आली असेल तर, बहिणीसारखं तिचं रक्षण करेल… ‘ खेसारी लाल यादव म्हणाले, जेव्हा पत्नी अंथरुणात येते तेव्हा ती पत्नी असते. जेव्हा ती बाजारात जाते तेव्हा ती बहीण बनते. तिला बहिणीचं रूप असते.
अभिनेत्री राणी चटर्जीने साधला निशाणा…
खेसारी लाल यादव यांच्यावर निशाणा साधत राणी म्हणाली, ‘म्हणजे पत्नी म्हणून तम्ही रक्षण करु शकणार नाही? काय बकवास आहे… हे सर्व काय ऐकावं लागत आहे… म्हणते किती बकवास… यांना चांगल्या सल्लागाराची गरज आहे… जो त्यांना सांगू शकेल की, मुलाखतीत काय बोलायला हवं आहे…’
राणी पुढे म्हणाली, ‘ते कायम व्हिक्टिम कार्ड खेळत असतात…’ सांगायचं झालं तर, याआधी खेसारी लाल यादव यांच्यावर पवन सिंह यांनी देखील निशाणा साधला होता. पवन सिंह म्हणालेले, ‘खेसारी लाल यादव यांचा काहीही भरोसा नाही. कधी पत्नीला बहीण करतील आणि बहिणीला बायको…’
