जयंती विशेष : रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजीराजे भोसले (Chhatrapati Shivaji Raje) हे मराठा साम्राज्याचे (Maratha Empire) संस्थापक होते. शिवाजी महाराजांचा जन्म भोसले घराण्यात झाला. शिवाजी महाराजांनी विजापूरच्या (vijapur) आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले.

जयंती विशेष : रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज
Follow us
| Updated on: Mar 21, 2022 | 5:40 AM

छत्रपती शिवाजीराजे भोसले (Chhatrapati Shivaji Raje) हे मराठा साम्राज्याचे (Maratha Empire) संस्थापक होते. शिवाजी महाराजांचा जन्म भोसले घराण्यात झाला. शिवाजी महाराजांनी विजापूरच्या (vijapur) आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले. रायगड ही महाराजांच्या स्वराज्याची राजधानी होती. इ.स. 1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटीत प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. भूगोलाचे सखोल ज्ञान, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले. शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजेंकडून मिळालेल्या 2000 सैनिकांच्या छोट्याशा तुकडीच्या बळावर महाराजांनी एक लाख सैनिकांचे लष्कर उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले. एवढेच नाही तर राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले.

महाराजांचे बालपण

पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या किल्ल्यावर 19 फेब्रुवारी इ.स. 1630 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. दरवर्षी शिवाजी महाराज यांची जयंती तारखेप्रमाणे आणि तिथीप्रमाणे साजरी करण्यात येते. आज शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे शिवजयंती आहे. एका आख्यायिकेनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान आणि तेजस्वी पुत्र व्हावा म्हणून प्रार्थना केली होती. त्यामुळे महाराजांचे नाव शिवाजी ठेवण्यात आले. महाराजांची जडणघडण जिजाऊंच्या संस्कारात झाली. शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळी दख्खनमधील राजसत्ता विजापूर, अहमदनगर आणि गोवळकोंडा या तीन मुसलमानी सल्तनतींमध्ये विभागलेली होती. प्रजेवरील अन्याय अत्याचार वाढले होते. महाराजांनी या तीनही सल्तनतींचा बिमोड करत, महाराष्ट्रात रयतेचं स्वाराज्य निर्माण केलं.

स्वराज्याचे तोरण

इ.स. 1647 मध्ये सतरा वर्षांच्या शिवाजीराजांनी आदिलशहाच्या ताब्यातला तोरणगड जिंकला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. तोरणगड हे स्वराज्याचे तोरणच ठरले. त्याच साली शिवाजी महाराजांनी कोंढाणा (सिंहगड), आणि पुरंदर हे किल्ले आदिलशहाकडून जिंकून पुणे प्रांतावर पूर्ण नियंत्रण मिळवले. या शिवाय तोरणगडासमोरील मुरुंबदेवाचा डोंगर जिंकून त्याची डागडुजी केली व त्याचे नाव त्यांनी राजगड असे ठेवले. इथेच स्वराज्य स्थापनेचा पाया घातला गेला. पुढे महाराजांनी आपल्या अथक प्रयत्न आणि पराक्रमाच्या जोरावर स्वराज्याची निर्मीती केली, स्वराज्यातील जनता महाराजांच्या राजवटीमध्ये सुखी झाली, संपन्न झाली.

इतर बातम्या

Raut on MIM: खरी जनाब सेना कोण, हे महाराष्ट्राला सांगणार; भाजपचा कट उधळला, राऊतांचा घणाघात

Darekar On Raut: खोतकरांची हाताची घडी, सत्तार हिंदुत्वाची भूमिका मांडतात, दरेकरांचं सूचक वक्तव्य

MIM ची तुम्हाला प्रस्ताव देण्याची हिंमतच कशी होते ? मनसे नेते देशपांडेच्या सवालानं शिवसेनेची कोंडी

Non Stop LIVE Update
मोदींमुळे मालवण, तारकर्लीला कुणाला जाता येणार नाही? काय आहे नेमक कारण?
मोदींमुळे मालवण, तारकर्लीला कुणाला जाता येणार नाही? काय आहे नेमक कारण?.
'तो' माणूस नालायक, त्याला सत्तेवर..; ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
'तो' माणूस नालायक, त्याला सत्तेवर..; ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा.
...म्हणून नारायण राणेंचा भाजपमध्ये प्रवेश, ठाकरे गटाच्या नेत्याचा दावा
...म्हणून नारायण राणेंचा भाजपमध्ये प्रवेश, ठाकरे गटाच्या नेत्याचा दावा.
हीच संस्कृती का? सुप्रिया सुळेंचा शिक्षणमंत्र्यांच्या वर्तवणुकीवर सवाल
हीच संस्कृती का? सुप्रिया सुळेंचा शिक्षणमंत्र्यांच्या वर्तवणुकीवर सवाल.
धाक आहे की नाही? मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरे पुन्हा भडकले
धाक आहे की नाही? मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरे पुन्हा भडकले.
नाशिक जिल्ह्यात अवकाळीचा हाहाकार; नागली, उडीद, भुईमूग पीकाला फटका
नाशिक जिल्ह्यात अवकाळीचा हाहाकार; नागली, उडीद, भुईमूग पीकाला फटका.
बळीराजा हतबल, केळीबागांसह आठ एकरावरील पीकं उद्धवस्त झाल्यानं हवालदिल
बळीराजा हतबल, केळीबागांसह आठ एकरावरील पीकं उद्धवस्त झाल्यानं हवालदिल.
6 डिसेंबरनंतर देशात काहीही होऊ शकतं, प्रकाश आंबेडकर यांचा दावा काय?
6 डिसेंबरनंतर देशात काहीही होऊ शकतं, प्रकाश आंबेडकर यांचा दावा काय?.
माझ्यामुळे छगन भुजबळ जेल बाहेर पण.., प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा काय?
माझ्यामुळे छगन भुजबळ जेल बाहेर पण.., प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा काय?.
...पर्यंत सरकार कसं पडेल? तुम्ही ताटाखालचं मांजर, राऊतांचा रोख कुणावर?
...पर्यंत सरकार कसं पडेल? तुम्ही ताटाखालचं मांजर, राऊतांचा रोख कुणावर?.