AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Darekar On Raut: खोतकरांची हाताची घडी, सत्तार हिंदुत्वाची भूमिका मांडतात, दरेकरांचं सूचक वक्तव्य

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी एमआयएमला महाविकास आघाडीत घेण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यावरून राजकीय टोलेबाजी सुरू झाली आहे. आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही सूचक विधान केलं आहे.

Darekar On Raut: खोतकरांची हाताची घडी, सत्तार हिंदुत्वाची भूमिका मांडतात, दरेकरांचं सूचक वक्तव्य
प्रवीण दरेकरImage Credit source: टीव्ही9
| Edited By: | Updated on: Mar 20, 2022 | 1:41 PM
Share

मुंबई: एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (imtiyaz jaleel) यांनी एमआयएमला (mim) महाविकास आघाडीत (mahavikas aghadi) घेण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यावरून राजकीय टोलेबाजी सुरू झाली आहे. आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही सूचक विधान केलं आहे. शिवसेना नेते संजय राऊत जे बोलत आहेत. तो त्यांचा बदललेला हिंदुत्वादी विचार आहे. त्यांना सत्य पचनी पडत नाही. शिवसेना हतबल झाली आहे. त्यांचे हिदुत्वाबद्दलची विधाने गांभीर्याने घेऊ नयेत. शिवसेनेला संगतीचा परिणाम झालेला दिसतोय. शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर हाताची घडी घालून उभे राहतात आणि अब्दूल सत्तार शिवसेनेची हिंदुत्वाची भूमिका मांडतात… यातच सगळं आलं…, असं सूचक विधान करत प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेला डिवचलं आहे. 370 कलम हटवल्याने स्वप्नातला काश्मीर पुन्हा बहाल झाला आहे. तो राऊतांनी पाहावा, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

प्रवीण दरेकर यांनी सहकार क्षेत्रातील घोटाळ्यावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांना काही फरक पडत नसेल पण मी वस्तूस्थिती मांडणार. बोगस सभासद किती, संस्था हायजॅक कशी केली ही सगळी माहिती मी देणार. सहकार चळवळ राज्यात ठेवायची की नाही? ही चळवळ नष्ट करण्याचा प्रयत्न आहे. विधान भवनात उद्या मी जाणार आहे. यावेळी सभापतींना खुलासा करण्याची विनंती करणार आहे. सहकार क्षेत्रातील घोटाळे बाहेर काढणार आहे, असं प्रवीण दरेकर यांनी सांगितलं.

किती आमदार फुटणार ते आधी ठरवा

राज्यात मविआचा जनतेला वीट आला आहे. भाजपच्या बाजूने सध्याचे वातावरण आहे. भाजपचे 25 आमदार फुटणार की 50 आधी ते ठरवा. शिवसेनेत कमालीची अस्वस्थाता आहे. कधीही एक गट बाहेर पडेल हे सांगता येत नाही, असा दावा त्यांनी केला. मात्र, शिवसेनेतील या अस्वस्थतेचा फायदा घेणार नाही, असं सांगतानाच या अस्वस्थतेचा विस्फोट येत्या काही दिवसातच होणार असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला.

शिवसेनेच्या खात्यांना फक्त 13 टक्के निधी

शिवसेनेच्या खात्यांना 13 टक्के निधी मिळालाय. 60 टक्के निधी राष्ट्रवादीला मिळाला आहे. विकासांसाठी पैसे मिळत नाही. मग विकास कसा होणार? असा सवालही त्यांनी केला. मुस्लिम आरक्षणाबद्दलची यांची भूमिका पाहा. मंदिरांची, तिर्थस्थळांची अवस्था काय ते पाहा, अशी टीकाही त्यांनी केली.

संबंधित बातम्या:

एमआयएम ही भाजपची बी टीमच, आघाडी नाहीच, CM Uddhav Thackeray यांनी एमआयएमचा प्रस्ताव धुडकावला

Shivsena MIM Video : ‘एमआयएम’च्या प्रस्तावानं शिवसेनेची गोची? जलील म्हणतात, मग मी अस्पृश्य का? दानवे म्हणतात, मुस्लिमांचा द्वेष नाही!

येत्या काही दिवसात मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दिसेल, उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; हिंदुत्वावरून भाजपला घेरलं

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.